- मुर्ती 7 दिवसाच्या घरगुती बुध्द उत्सवासाठी घरातील बुध्द मूर्ती वापरणे. नसेल तर नवीन खरेदी करणे.
- बुध्द महाउत्सवाच्या पहिल्या मंगल दिनाच्या दिवशी कोणत्याही वेळेला घरात बुध्द मुर्ती ज्या ठिकाणी आहे,तेथून घरातील अन्य पसंतीच्या कोणत्याही (उत्तर, दक्षिण, पुर्व व पश्चिम या दिशा न पाहता) ठिकाणी प्रतिष्ठित परव्यक्तींच्या मंगल हस्ते प्रतिष्ठापना करणे.
- बुध्द मुर्ती जवळ कोणत्याही प्रकारची फळे, सुजाता खीर अन्य गोड पदार्थ व इतर कोणतेही अन्न ठेवू नये.
- बुध्द मुर्ती समोर मेणबत्ती/उदबत्ती लावणे, पंचारती करू नये. हळद, कुंकू, गुलाल, अष्टीगंध,अबीर,इबीत इत्यादी व तत्सम घटकांचा वापर करू नये. निळीचा तर अजिबात वापर करू नये. कमळाचे फुल/ अन्य फुले वाहने,पिंपळाची पाने वाहने.
- बुध्द मुर्ती ज्या रूममध्ये आहे ती रूम लायटिंग व अन्य शोभेच्या साहित्याने सजवणे. वविशेषता : बुध्द मुर्तीच्याचारी बाजूला पसंतीप्रमाणे आकर्शक सजावट करणे. तसेच बुध्द मुर्तीची प्रतिष्ठापना करणेसाठी देश, विदेशातील कोणतीही बुध्द विहारे, दीक्षाभूमी, चैत्यभूमी व स्तूप सारख्या प्रतिकृती असल्या तरी चालतील.
- बुध्द उत्सव काळातील 7 दिवस घराबाहेर पंचशील ध्वज फडकावणे, घराबाहेर लायटिंग/धम्म संस्कृतीची ओळख सांगणारा आकाश दिवा लावणे. दररोज सकाळी घराबाहेर रांगोळीने अंगण सजवणे.
- बुध्द उत्सव काळातील 7 दिवस सकाळ व संध्याकाळी त्रिसरण, पंचशील, वंदना घेणे./शक्य असेल, तर धम्मदेसनाचे आयोजन करणे. (सात दिवसापैकी एक दिवस तरी धम्म देसनाचे आयोजन करणे )
- बुध्द उत्सवातील पहिल्या मंगल दिनी सुजाता खीरच करणे. घरात वंदनेला येणार्यांना सुजाता खीर देणे. कोणी नाहीच आले, तर शक्य तितक्या शेजारी यांना सुजाता खीर देवून आपल्या सणाचा प्रसार करणे.
- अ) बुध्द उत्सव काळात 7 दिवस घरात मांसाहारी जेवण करू नये. ब) बाहेरून मांसाहारी जेवण करून घरी येवू नये. क) धूम्रपान व मद्यपानाचे व्यसन कोणी करत असेल तर 7 दिवस ते व्यसन करू नये. ड) उत्सवाच्या काळात कोणत्याही प्रकारचा उपोसथ करू नये. इ) बुध्द उत्सवाच्या काळात या सणाच्या अमर्यादित नातेवाईक व सर्व बहुजनांना मंगलकामना देणे. त्यासाठी तोंडी,प्रत्यक्ष भेटून,व्हॉटस् अॅप,फेसबुक, इन्स्टाग्राप, ट्विटर, ईमेल, दुरध्वनी चाही वापर करावा.
- घरगुती बुध्द उत्सव काळात देश व जगातील धम्म संस्कृती व संस्कार ग्रंथ, आंबेडकरी साहित्य,अन्य महामानवांचे समातावादी व अंधश्रध्दामुक्त साहित्याचे वाचन करून घरातील वर्शावासाची परंपरा अखंड ठेवावी.
- बुध्द उत्सव काळात धम्मदेसनाचे विशय अंधश्रध्दा निर्मुलन तसेच धम्म संस्कृती व संस्कार,गौतम बुध्द, सम्राट अशोक राजा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह देश व जगातील धम्म प्रसारक व प्रशंसक व धम्म गुरूंचे धम्मासंबंधी कार्य व कर्तुत्व संबंधी असावेत.
- बुध्द उत्सव सणाच्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी करणे. शुभ्र पांढरे वस्त्रांना प्राधान्य देणे.
- बुध्द उत्सव या घरगुती सणामध्ये सहभागी होवून सणाचा मंगलमय आनंद व्दिगुणीत करणेसाठी सासरी असलेल्या आपल्या विवाहित मुलींना (असतील तर) माहेरी बोलावून घेणे. तसेच घरातील अन्य सदस्य परगावी असेल त्यांनाही बोलावून घेणे. नातेवाईकांना निमंत्रित करणे.
- एखादे बौध्द कुटुंब बुध्द महाउत्सव करणेस इच्छुक असून बुध्द मुर्ती नसेल तर इच्छुकांनी त्या कुटुंबाला मुर्तीदान करून उत्सव सण साजरा करणेस प्रोत्साहन द्यावे. घरगुती बुध्द उत्सवासाठी प्रतिमा वापरू नये.
- धम्मदेसनासाठी कोणत्याही धर्म व जातीच्या व्यक्तीला निमंत्रित करणे. पण त्या देसनाकारांना त्यांच्या समाजातील अंधश्रध्दा कोणत्या आहेत ते सांगणे सक्तीचे करणे. त्यांच्या समाजातील विज्ञानवादी कृती असेल तर ती देखील सांगितली तरी चालेल. कर्मकांड, दैविकवादावर बोलून देवू नये.
- सात दिवस समाजात अंधश्रध्दा कोणत्या आहेत ते ऐकून, वाचून बौध्दांनी अंधश्रध्दा आपल्या रोजच्या जीवन प्रणालीत असतील तर त्या काढून टाकून विज्ञानवादी होण्याचा प्रयत्न करणे. विज्ञानवादी होण म्हणजेच आदर्श व तथागतांना अभिप्रेत असलेल्या मूळ बौध्दांची ओळख निर्माण करण्यासारखे आहे.
- बुध्द उत्सवाच्या सष्टमी (6 वा दिवस) दिनी महामाया, भिक्खूणीमाता यशोधरा व राजकुमार राहूलच्या प्रतिमांनापुष्प वाहून वंदन करणे व त्याच दिवशी व 7 व्या दिनी रात्री त्या दोघांच्या अखिल मानव दु:खमुक्त व्हावे यासाठी केलेल्या स्वागतहार्य त्यागाच्या प्रित्यर्थ नटून थटून अलंकारित महिला व मुलांनी एकत्र येवून विविध पारंपारिक खेळ (झिम्मा,फुगडी वगैरे) खेळावेत. महामानवांची गाणी सादर करावीत, त्यांच्यासंबंधी उकाने सादर करावेत.
- बुध्द उत्सव हा बुध्द रथउत्सव आहे. तेव्हा सद्यस्थिती पाहून व शक्य असेल तर पहिल्या दिवशी आपल्या परिसरात बुध्द रथ उत्सवाने बुध्द मुर्तीचे प्रतिष्ठापना करावी व शेवटच्या 7 व्या दिवशीही बुध्द रथ उत्सवाने व वंदनेने बुध्द उत्सवाची सांगता करावी. (आर्थिक व संख्याबळ पाहून निर्णय घेणेचा आहे)
- बुध्द महाउत्सव या सणाच्या सांगतानंतर दुसर्या दिवशी सकाळी बुध्द मुर्ती आपल्या घरातील व्यक्तीच्या मंगल हस्ते मूळ ठिकाणी ठेवावी.
- बुध्द उत्सव हा सण घरगुती असलेने उत्सव बुध्द विहार व सार्वजनिक ठिकाणी साजरा करता येणार नाही.
- बुध्द उत्सव हा घरगुती सण असलेने विधी-पुष्प वंदन (पूजा नव्हे) साठी लामा, महाथेरो, थेरो, भिक्खू, बौध्दाचार्य व विधीकर्त्यांना निमंत्रित करता येणार नाही. कुटुंब सदस्य वा उपस्थित असेल तर उपासकांच्या मंगल हस्ते मेणबत्ती, उदबत्ती प्रज्वलित करणे. पुष्प वाहने.
- बुध्द उत्सव हा सण पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवूनच साजरा करणेचा आहे. कर्मकांड असता कामा नये.
- बुध्द उत्सवाच्या माध्यमातून बुध्दांचे धम्म विज्ञान आत्मसात करणेचे आहेत. बुध्द मुर्ती ही एक प्रातिनिधीक असते याचे भान ठेवावे. बुध्द उत्सव म्हणजे व्यक्ती पूजा अथवा अपेक्षापुर्ती पूजा नव्हे. तेव्हा कोणालाही मुर्ती समोर चमत्कारिक मागणी व अपेक्षा व्यक्त करता येणार नाही. आदर्शपुर्ती पूजा असली पाहिजे.
- विशेषत: आदर्श बौध्द कुटुंबांनी बुध्द उत्सव एकदा घरी साजरा करणेस सुरू केल्यानंतर तो बंद करावयाचा नाही.अन्य धर्माचे सण करता येणार नाहीत. बुध्द उत्सवाचा प्रसार करत पुढील वर्षाची अतुरतेने वाट पहावी.
9225806990,
संपादक दैनिक मुक्तनायक परिवार,कोल्हापूर,
0 टिप्पण्या