शहापूर : मागील वर्षी कोरोना काळात शहापूर तालुका आरोग्य अधिकारी यांच्या आखत्यारीत असलेल्या शिवाजीराव एस. जोंधळे कॉलेज आसनगाव येथील विलागिकरण केंद्रा (कोरोंटाईन सेंटर) मधील रुग्णांना वस्तू रूपाने, श्रम रूपाने सेवा पुरविण्याची कामे काही असंघटीत कामगारांनी केलेली आहेत. परंतु या असंघटीत कामगारांचा मोबदला (पेमेंट) आजतागायत दिला गेलेला नाही. एक वर्षापासून वारंवार या कामगारांनी डॉ. तरुलता धानके यांच्याकडे मागणी करून देखील त्यांना मोबदला तर दिला नाही. उलट त्यांना टोलवाटोलवीची तसेच असमाधानकारक उत्तरे दिली जात आहेत.
या असंघटीत कामगारांना न्याय व हकक मिळण्यासाठी गुरुवारी सत्यशोधक कामगार संघटनेचे शहापूर तालुका अध्यक्ष संजय भालेराव यांनी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांना निवेदनाद्वारे असंघटित कामगारांना न्याय देत त्यांची देयके तात्काळ द्यावी अन्यथा संघटनेकडून कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
काही असंघटीत कामगार ज्यांनी मागील वर्षी कोरोना काळात शिवाजीराव एस. जोंधळे कॉलेज आसनगाव येथील आपल्या आखत्यारीत असलेल्या विलगिकर केंद्रा (कोरोंटाईन सेंटर) मधील रुग्णांना काही वस्तू रूपाने, श्रम रूपाने उदाहरणार्थ रुग्णांची देखभाल करणे, सुरक्षा पुरविणे, दिवसातून तीन वेळा पूर्ण इमारत सॅनिटायझर करणे, शौचालय, स्नानगृह, वार्ड स्वच्छ करणे, चादरी धूने, वाळविणे, डॉक्टरांनी सांगितलेली सर्व कामे करणे, आयुर्वेदिक काढा पुरविणे, अंघोळीसाठी, पिण्यासाठी गरम पाणी पुरविणे, फळे, बिस्किटे देणे, पॉझिटिव्ह पेशंटचे गादया, चादरी जाळणे तसेच रुग्णांना नाष्टा, पिण्याचे पाणी, चहा, दूध व अंडी आणि दोन वेळचे जेवण यांचा पुरवठा करणे, टँकरने पाणी पुरविणे इतर सर्व कामे केलेली आहेत.
या असंघटीत कामगारांचा मोबदला देयके (पेमेंट) आजतागायत दिलेली नाहीत. वारंवार सदर कामगारांनी आपणाकडे मागणी करून देखील अजून त्यांना मोबदला मिळालेला नाही. सत्यशोधक कामगार संघटने मार्फत सदर असंघटीत कामगारांना न्याय मिळण्यासाठी ठाणे जिल्हा अपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, शहापूर तालुका आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा तहसिलदार निलिमा सुर्यवंशी तसेच आसनगाव कोरोंटाईन सेंटर प्रमुख तथा शहापूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. तरुलता धानके यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे असंघटित कामगारांना न्याय देत त्यांची देयके तात्काळ द्यावी अन्यथा संघटनेकडून कामगारांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे.
खालील प्रमाणे असंघटित कामगारांची देयके
- शरद सुदाम निचिते व प्रज्ञा शरद निचिते, मु. पाषाने तालुका शहापूर, जि. ठाणे (महाराष्ट्र डेअरी) यांनी नाष्टा, पिण्याचे पाणी, चहा, दूध व अंडी तसेच दोन वेळचे जेवण यांचा पुरवठा केला आहे. पुरविलेल्या जेवणाची देयके ऑगस्ट 2020 ते ऑक्टोबर 2020 या तीन महिन्याचे एकूण रक्कम रुपये 1021140/- (दहा लाख एकवीस हजार एकशे चाळीस रुपये मात्र) रक्कम येणे बाकी आहे.
- दत्ता रामभाऊ थिगळे व जयश्री दत्ता थिगळे आणि दर्शना दत्ता थिगळे, मु. आसनगाव, तालुका शहापूर, जि. ठाणे यांनी सेवा व सुरक्षा पुरविली असून त्यांची ऑगस्ट 2020 ते नोव्हेंबर 2020 या चार महिन्याची एकूण मजुरी रुपये 2,39,040/- ( दोन लाख एकोन चाळीस हजार चाळीस रुपये मात्र) रक्कम येणे बाकी आहे.
- पंढरीनाथ रामचंद्र पाटोळे , मु. आसनगाव तालुका: शहापूर, जि. ठाणे - (हर्षदा वॉटर सप्लायर) यांनी टँकरने पाणी पुरविले असून एक वर्षापासून थकलेले रुपये 1,36,800/- (एक लाख छत्तीस हजार आठशे रुपये मात्र) रक्कम येणे बाकी आहे.
0 टिप्पण्या