Top Post Ad

मुंबई महापालिकेला, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, इतर महापालिकेला प्रभाग का ?

    ही तर निवडणुकीची थट्टाच - राज ठाकरे

नाशिक :   प्रभागांची तोडफोड करून आपल्याला हवे तसे प्रभाग करणे योग्य नाही. लोकांनी एकाऐवजी तीन-तीन बोटं का दाबायची? कायदे वेगवेगळे का? २-३-४ प्रभाग हा खेळ कसला? उद्या २-२ आमदारांचा, खासदारांचा प्रभाग करणार आहेत का? मुंबई महापालिकेला, ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेला प्रभाग नाही, इतर महापालिकेला प्रभाग का? यांच्या फायद्यासाठी हे आहे का? आम्ही आमचे मार्ग अवलंबू, पण आता लोकांनी विरोध करावा, लोकांनी कोर्टात गेलं पाहिजे, निवडणूक आयोगाकडे गेलं पाहिजे, निवडणूक आयोगानेही याची दखल घ्यावी, असे स्पष्ट मत शहराच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडले. राज्यशासनाने घेतलेल्या बहुसदस्यीय प्रभाग रचनेबाबत त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. महाविकासआघाडी सरकारने घेतलेल्या प्रभाग रचनेच्या निर्णयावर त्यांनी टीकास्त्र सोडले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, कुठलाही नगरसेवक काम करू देत नाही, प्रभागामध्ये कामे होत नाहीत. उद्या लोकांनी ठरवलं नगरसेवकाला भेटायचं, तर कोणत्या नगरसेवकाला भेटायचं? यांनी निवडणुकीची थट्टा करून टाकली आहे गृहीत धरणं सुरू आहे, त्याविरोधात लोकांनी कोर्टात जावं, आम्ही बोललं की राजकीय वास येतो. चार प्रभाग होते, त्याचे तीन का, दोन होते त्याचे चार प्रभाग का, सरकारने नेमका आपला उद्देश सांगावा. गेल्या दहा वर्षांपासून हा खेळ सुरू आहे. आपण फक्त उघड्या डोळ्याने बघत राहायचं का?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

किती वैयक्तिक पातळीवर जायचं कळत नाही, साप काय बेडूक काय, सगळा बेडूक करून टाकलाय कानफाटात काय मारू वगैरे, कुठल्या पदांवर आपण बसलोय हे ध्यानात ठेवायला हवं. हे सगळेच जण एकमेकांना फोन करून सांगतात की काय कळत नाही, की आपण मुख्य प्रश्न बाजूला ठेवून या विषयांवर बोलू.. मूळ प्रश्नांवर दुर्लक्ष करण्यासाठीच हे सुरू आहे काय? टीव्ही, न्यूज चॅनलवरही तेच, असंही ते म्हणाले. सरकारच्या कोरोनाच्या लाटा थांबतच नाहीत. टोलवरून आम्ही आंदोलनं केली, अनेक टोल बंद झाले. सरकार आणि विरोधक येतात तेव्हा त्यांना तुम्ही प्रश्न विचारा. शरियतसारखा कायदा आणा, त्याशिवाय सुधारणार नाहीत. त्याचं कारण म्हणजे भीती नाही उरली कशाची? माजी गृहमंत्र्यांना ईडी बोलावते, ते जात नाहीत, ते ईडीला येडा समजतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com