उरण जेएनपीटी मधून निघणारी वाहने मोठ्या प्रमाणात ठाणे मार्गे गुजरात कडे रवाना होत असल्याने सिडकोच्या हद्दीतील मोकळ्या जमिनीचा आढावा घेतला यावेळी राजदान फाटयाजवळील 100 हेक्टर जागा तसेच अन्य काही जागांची शिंदे यांनी पाहणी केली. या जागांचे सपाटीकरण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. त्यानंतर जेएनपीटीने उभारलेल्या अद्ययावत पार्कींग लोटची देखील शिंदे यांनी पाहणी केली. तसेच जेएनपीटीच्या वतीने एक्स्पोर्ट साठी त्यांच्या सीएफएस म्हणजेच सेन्टरलाईज फ्रेट सेन्टर मध्ये जाण्यापासून अडवू नये अशी विनंती करण्यात आली. मात्र सीएफएस केंद्रातून बाहेर पडणाऱ्या वाहनांना वेगवेगळ्या रंगांचे स्टिकर्स लावून त्यांचे सिडको, जेएनपीटी आणि नवी मुंबई आणि रायगड पोलीस यांच्या माध्यमातून नियमन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या साऱ्या यंत्रणांची एकत्रित टीम तयार करून टप्प्याटप्प्याने ही वाहने रात्री 11 ते 6 या वेळेत सोडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
ठाणे शहराच्या सुरुवातीला खारेगाव टोलनाक्यालगतच्या दोन्ही बाजूच्या जमिनीची देखील शिंदे यांनी पाहणी केली. या जमिनीवर भराव टाकून त्यानंतरच त्या पार्कींग लॉट म्हणून वापरता येणे शक्य असल्याने शक्य तेवढ्या लवकर या जागेचे सपाटीकरण करण्याचे निर्देश त्यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त आणि एमएसआरडीसीला दिले.
मुंबई नाशिक महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने त्याठिकाणी सोनाळे आणि दापोडा या दोन गावातील जागांची पाहणी करून या जागा पार्कींग लॉटसाठी उपलब्धता तपासण्यात अली. तसेच मनोर भिवंडी मार्गावरून गुजरात कडून मोठ्या प्रमाणात वाहतूक ठाण्याकडे येत असल्याने भिवंडी ग्रामीण क्षेत्रातील पार्कींग साठी उपलब्ध होऊ शकतील आशा संभाव्य जगाची पाहणी श्री. शिंदे यांनी केली. येत्या काही दिवसात या जागा तयार झाल्यानंतर अवजड वाहनांच्या पार्कींग लॉट साठी त्या वापरल्या जातील यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन लोकांना दिलासा मिळू शकेल.
0 टिप्पण्या