याप्रसंगी बोलताना विक्रांत चव्हाण यांनी सागितले की,केंद्रातील भा.ज.पा.सरकारने एकीकडे खोट्या विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारून दुसरीकडे महागाई वाढवून देशातील सर्व संवैधानिक संस्था ताब्यात घेऊन, सार्वजनिक संस्था विकून शेतकरीवर्ग व सामान्य देशोधडीला लावण्याचे पाप सरकार करित आहे,या जुलमी व अत्याचारी भा.ज.पा.सरकारच्या विरोधात देशातील सर्व शेतकरी संघटना व डाव्या आघाड्यांनी सोमवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी भारत बंदचे आवाहन केले आहे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने या बंदला जाहीर पाठींबा जाहीर केला असून ठाण्यातील काँग्रेस पक्षही या बंद मध्ये सामील होणार आहे, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणारा काँग्रेस पक्ष त्यांच्याच मार्गाने गांधीगिरी करत सर्वत्र बदंचे मध्ये सामील होऊन व्यापारी व इतराना बंद चे आवाहन करणार आहोत असे त्यांनी बोलताना शेवटी सांगितले.
0 टिप्पण्या