1972चा काळ कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेली तरुण मुले एकत्र येऊन महाराष्ट्र मध्ये दलित महिलावर होत असलेल्या अन्याय अत्याचार यावर विचार विनिमय करून एक संघटना स्थापन करण्याचे ठरविण्यात आले.त्या तरुणांना मध्ये थोर विचारवंत, साहित्यिक, कवी, असे उदा. राजा ढाले, नामदेव ढसाळ, ज. वि. पवार, भास्कर अंबावडे, अविनाश महातेकर, दयानंद म्हस्के, अशी बरीच मंडळी महाराष्ट्र मध्ये दलित महिलावर वास्त्यावर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराच्या बातम्यावर बोलत असताना सर्वांचे रक्त सळसळायचे आणी त्याच जोशावर एक संघटना स्थापन करण्याचे ठरले. त्या संघटनेचे नाव दलित पँथर या संघटनेची पहिली छावणी बाप्टिस्ट रोड येथे स्थापन करण्यात आली. त्यानंतर भास्कर अंबावडे यांनी दुसरी छावणी कुर्ला येथे स्थापन करावी अशी सूचना मांडली, आणी सर्वानुमते ठरले. कुर्ला येथे सभेचे आयोजन केले
राजा ढाले, ज वि पवार, अविनाश महातेकर, नामदेव ढसाळ अशी सर्व मंडळींच्या उपस्तितीत भास्कर अंबावडे यांना सभेचे अध्यक्ष स्थान देण्यात आले. प्रथम स्टेजवर सर्व नेते मंडळींचे पुष्पहार देऊन स्वागत करण्यात आले. नंतर छावणी प्रमुख म्हणून सदाशिव खरात यांचे नाव जाहीर करण्यात आले, आणी सोबत असलेल्या फोटो मध्ये काळी पॅन्ट आणी दाडी असलेले अनंत काळे यांची निवड करण्यात आली. अनंत काळे हे लडवय्ये होते. ते पोलीस मध्ये होते. सभा, मोर्चा, दंगली मध्ये ते पुढे असायचे, त्यामुळे पोलीस च्या लाठी, अश्रूधुर याचा मारा प्रथम यांच्यावर व्हायचा, आणी पोलीस यांना पकडून यांच्यावर केसेस टाकायचे, परंतु पोलीस मध्ये असून नोकरीची परवा न करता सर्व केसेस स्वतः वर घयायचे, असे ते डॅशिंग अनंत काळे होते. तरी त्यांनी 8ते 9वर्ष पोलीस मध्ये नोकरीं केली, नंतर त्यांना पोलीस मधून काडून टाकण्यात आले. त्यांनी नोकरीची पर्वा न करता चळवळीत सक्रिय राहिले. नंतर ते BMC मध्ये कामाला लागले. अशा प्रकारे पँथरचे कार्यकर्ते होते.
पँथर सुवर्ण महोत्सव निमित्त मी म्हणजे विक्रांत तोरणे, छावणी प्रमुख सदाशिव खरात यांची फोन वर भेट घेतली. तेव्हा त्यांनी हो फोटो पाठवला. त्यावेळी माझे वय 14 होते. मी माझ्या मित्रांसोबत पँथर चळवळी मध्ये सक्रिय होतो. अगदी अलीकडे राजा ढाले यांनी स्थापन केलेल्या मास मूव्हमेंट या संस्था मध्ये ही आम्ही सक्रिय असायचो.हल्ली हल्ली ज वि पवार यांच्या सोबत भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी यांच्या सोबत कार्यरत आहोत. आणी त्यावेळचे दलित पँथर चे छावणी प्रमुख सदाशिव खरात हे बदलापूर मध्ये आंबेडकर चळवळी मध्ये कार्यरत आहेत. आता ते 70व्या वर्षात पदार्पण करत आहेत. कोणाला त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर 7208539661 विक्रांत तोरणे या नंबर वर फोन करा. त्यांचे अनुमती घेतली नसल्यामुळे त्यांचा नंबर दिला नाही.
0 टिप्पण्या