ठाणे : सर्वोच्च न्यायालयाकडून १५ डिसेंबर २०१९ नंतर आठ वेळा राज्य सरकारच्या वकिलांना मागासवर्गीय आयोग निर्मितीबाबत सांगण्यात आले. मात्र, त्याची महाविकास आघाडी सरकारने दखल घेतली नाही. या काळात १५ महिने खोटं बोलून राज्य सरकारचे मंत्री मोर्चे काढत होते. केंद्र सरकारकडे बोट दाखवत खोटं बोलण्याची मंत्र्यांमध्ये स्पर्धा सुरू होती. काही मंत्री, तथाकथित विचारवंत यांच्यामार्फत इको सिस्टीम तयार केली गेली. त्यातून अपप्रचार करण्यात आला.राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी आघाडी सरकारच आहे अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढविला.
केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील म्हणाले कि शिवसेनेच्या खासदारांना वाटतं ही हे सरकार कधी पडतंय. ते खासगीत देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करतात, असे विधान त्यांनी आपल्या भाषणात केले आहे. यामुळे वातावरण पेटण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कपिल पाटील यांनी आपल्या भाषणातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक करताना म्हटले कि, ‘शिवसेनेचे खासदार अनेकवेळा भेटतात. त्यांच्या खासगीतील चर्चा, कमेंट्स आहेत, त्यांनाच असं वाटतं की हे सरकार कधी पडतंय. अशा प्रकारची भावना त्यांची झाली आहे. आणि एक गोष्ट ते अतिशय जबाबदारीने उल्लेख करतात की जेव्हा आम्ही देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे जात होतो, आम्हाला त्यांच्याकडून कुठल्याही कामाला कधीच नकार आला नाही. कधीच त्रास झाला नाही. ही काम करण्याची पद्धत या मुख्यमंत्र्यांची होती’, असे कपिल पाटील म्हणाले.
संजय कुटे यांनी सांगितलं कि देवेन्द्र फडणवीस ओबीसींचे नेतृत्त्व करत आहेत. देवेंद्र फडणवीस हे ब्राम्हण आहेत असे वाटत नाही. सर्वसमावेशक काम करणारे नेतृत्त्व आहे. फडणवीस म्हणाले कि मला वाटत मी अजूनही मुख्यमंत्री आहे. त्याला समोरून उत्तर आलं मला वाटतच नाही कि मी मुख्यमंत्री आहे. यावरून कपिल पाटील म्हणाले तुम्हाला कसं वाटणार तुम्ही मुख्यमंत्री आहात कारण शरद पवार हेच मुख्यमंत्र्यांचं काम करतात.
0 टिप्पण्या