Top Post Ad

शहापूर येथे १७ ऑक्टोबरला विधी सेवा शिबीर आणि शासकीय सेवा, योजनांचा महामेळावा

मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती न्या. ए. ए. सय्यद यांच्या हस्ते होणार महामेळाव्याचे उद्घाटन

ठाणे: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने रविवार दि. १७ ऑक्टोबर रोजी शहापूर तालुक्यातील सापगाव येथे विधी सेवा शिबीर आणि शासकीय सेवा, योजनांचा महामेळावा घेण्यात येणार आहे, असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव मंगेश देशपांडे आणि ठाण्याचे निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कळविले आहे.

या महामेळाव्याचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ न्यायमूर्ती तथा राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती ए. ए. सय्यद यांच्या हस्ते होणार आहे. राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव दिनेश सुराना, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ठाण्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष अनिल पानसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील.

शहापूर तालुक्यातील सापगाव येथील अन्नपूर्णा लॉन्स शेरेपाडा येथे सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. याठिकाणी शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात येणार असून त्याद्वारे परिसरातील नागरिकांना शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यात येणार आहे. या महामेळाव्याच्या ठिकाणी लसीकरण सत्राचे देखील आयोजन केले जाणार आहे. नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा. लसीकरणासाठी येताना आधारकार्ड सोबत आणावे, असे आयोजकांमार्फत कळविण्यात आले आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com