अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दरवर्षी लाखों धम्म बांधव पवित्र दीक्षाभूमिला अभिवादन करण्यासाठी येत असतात. परंतु या वर्षी नागपुर महानगरपालिकेचा वैक्सीनेशन झालेल्या व्यक्तिंनाच दीक्षाभूमिच्या आत जाण्याची अनुमति आहे व इतर व्यक्तीना नाही, असे कारण सांगून नागपूर पोलीस प्रशासन व मनपा आरोग्य विभागामार्फत धम्म बांधवांना दिशाभूमिच्या आत जाण्यास मनाई करण्यात येत होते. नागपूर मनपाच्या या षडयंत्रा विरोधात बहुजन मुक्ती पार्टी च्या वतीने ताबडतोब आंदोलन करण्यात आले.
दीक्षाभूमि कड़े जानाऱ्या रस्तात पोलीस प्रशासनाच्या पहारा असलेल्या ठिकाणी प्रारंभी बहुजन मुक्ती पार्टी चे कार्यकर्ते गेल्यावर त्यांना वैक्सीनेशनचे कारण सांगून अडविण्यात आले. पोलिसांना नागपूर मनपाच्या लिखित आदेशाच्या प्रतची मागणी केली असता पोलीस अधिकारी तशी प्रत देवु शकले नाही. त्यामुळे कार्यकर्ते जास्त आक्रमक झाले व मनपा महापौर विरोधात घोषणा देवू लागले. परीस्थिती बिघडल्याचे पाहून पोलीसांनी सगळ्या कार्यकर्त्यांना व इतर नागरिकांना दीक्षाभूमि परिसरात प्रवेश करु दिला. सदर आंदोलन बहुजन मुक्ति पार्टीच्या त्रिशला ढोले, प्रमोद भगत यांचे नेतृत्वाखाली अनिल नागरे, सचिन सोयाम, सुनील नारनवरे, सुभाष मोहोड, उत्तमप्रकाश शहारे, विनोद बंसोड, सुरेंद्र बोरकर ,अशोक घोरपड़े आदि कार्यकर्त्यांनी केले.
0 टिप्पण्या