तर 'खाजगी लोक क्रूझवरील एनसीबी छाप्यात कसे? कोणत्या अधिकाराने? भाजपचा उपाध्यक्ष व एक फसवणूकीचा आरोपी यात आरोपींना ताब्यात घेताना कसे दिसतात? यांच्या गाडीवर "पोलीस" पाटी कशी? एनसीबीने त्यांचे काम भाजपाला दिले आहे का?,' असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 'मुंद्रा पोर्ट ड्रगसाठा प्रकरणातून लक्ष हटवणे हे लक्ष्य होते का? गोव्यात, सँडलवूड ड्रग रॅकेट व सुशांत सिंह प्रकरणात भाजपचे ड्रग कनेक्शन पाहिले आहे. देशाविरुद्ध हे गंभीर षडयंत्र आहे. तरुण पिढीला उध्वस्त करण्याचा प्रयत्न आहे. सचिन सावंत यांनीही या प्रकरणी भाजपवर निशाणा साधला आहे. एनसीबी व भाजपमधील संगनमताची महाविकास आघाडी सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
३ ऑक्टोबरच्या कारवाईनंतर एनसीबीने स्वतःहून क्राइम रिपोर्टर्सना या कारवाईचे व्हिडिओ दिले होते. त्या व्हिडिओमध्ये हे दोन खासगी लोक अटक करताना स्पष्ट दिसत आहेत. के. पी. गोसावी या व्यक्तीने आर्यन खानची अटक झाल्यानंतर त्याच्यासोबत एक सेल्फी काढला होता. हा सेल्फी बराच व्हायरल झाला. त्यानंतर एनसीबीने ट्विट करुन के. पी. गोसावी अधिकारी नसल्याचे सांगितले. के.पी. गोसावीवर पुण्यामध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. त्याच्या फेसबुकवर तो खासगी हेर असल्याचे स्टेटस ठेवतो. के.पी.गोसावीचा एनसीबीशी काय संबंध आहे? हे आता समोर आले पाहिजे तसेच अरबाज मर्चंटला अटक करणारा मनिष भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष असल्याचे त्याच्या फेसबुक अकाऊंटवरुन दिसून आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, माजी मुख्यमंत्री अमित शाह आणि इतर भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत त्याचे फोटो आहेत. हा व्यक्ती कोण? हे एनसीबीने स्पष्ट करावे, अशी मागणी त्यांनी केली.
सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर देखील एनसीबीचे कार्यालय चर्चेत आले होते. त्यावेळी देखील बॉलिवूडला बदनाम करण्याचे पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले. एनसीबीच्या कार्यालयाबाहेर वृत्तवाहिन्यांचे कॅमेरे पद्धतशीरपणे लावण्यात आले. सेलिब्रिटींना त्यात दाखवून बॉलिवूड कसे नशेच्या आहारी गेले आहे, हे दाखविण्यात आले. आताही आर्यन खान प्रकरणात असाच प्रकार सुरु असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला. आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरण न्यायालयात आहे. त्यामुळे न्यायालयात याचा ऊहापोह होईलच असे नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले. मात्र पत्रकारांनी एनसीबीच्या माहितीवर बातमी देताना खोलात जाऊन एखाद्या प्रकरणाचा तपास केला पाहिजे अशीही भूमिका मांडली.
- एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे. त्याबरोबर सेल्फी काढणायत आली.
- तो सेल्फी व्हायरल झाला.
- सेल्फीतला व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही, असं सांगण्यात आलं मग हा व्यक्ती नक्की कोण?
- एनसीबीला उत्तर द्यावं लागेल.
- मनीष भानुशाली हा व्यक्ती आरोपींना घेऊन जात आहे. त्याचं प्रोफाईल भाजपचे उपाध्यक्ष असा उल्लेख आहे. त्याचे फोटो नरेंद्र मोदी, अमित यांच्यासह भाजप नेत्यांबरोबर आहेत. एनसीबीनं सांगावं त्यांचा आणि मनीष भानुशालीचा संबंध काय.
- काही फोटो एनसीबीनं जारी केलेत त्यात काही नशेचे पदार्थ दाखवण्यात आलेत.
- पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून दाखवण्यात आलेत पण हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफीसचे आहेत.
- गोसावी यांचा झोनल डिरेक्टरशी संबंध काय, एनसीबीनं उत्तर द्यावं मनिष भानुशाली यांचा संबंध काय
- खाजगी व्यक्तींनी ही कारवाई कशी केली, त्यांना काही अधिकार आहेत का भाजप बॉलीवूड, राज्य सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे.
- २१ तारखेला मनिष भानुशाली दिल्लीत काही मंत्र्यांच्या घरी होता.
- त्यानंतर २२ तारखेला गांधीनगर भागात होता.
- २१, २२ तारखेलाच गुजरातमध्ये ड्रग मोठ्या प्रमाणात सापडलं त्यामुळं २८ तारखेपर्यंत तो गुजरातमध्ये काय करत होता.
- कुठल्या मंत्र्यांना भेटला याचं उत्तर एनसीबीनं द्यावे.
आपण भाजपचे सामान्य कार्यकर्ते आहोत. मला त्या क्रूझवरच्या पार्टीत अमली पदार्थाचा वापर होणार असल्याची माहिती एका निनावी फोनद्वारे मिळाली होती, आपण क्रूझवर कुणालाच अटक केली नाही. मात्र त्या व्हिडिओत कसे काय दिसतो, हे आपल्याला माहिती नाही, असा दावा मनीष भानुशाली याने केला. भानुशाली हा मुलुंडचा रहिवासी आहे.
दरम्यान सध्या एनसीबी कोठडीत असलेले अरबाज मर्चंट याने बुधवारी वकिलांकरवी जामिनासाठी अर्ज केला. त्यासोबतच मर्चंट याने स्वतंत्र अर्ज करत कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध व्हावे अशी विनंती केली आहे. मुंबई पोर्ट ट्रस्ट, ग्रीन गेट, आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनल येथील २ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० ते रात्री ८.३० पर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध करून देण्याचे निर्देश द्यावेत आणि या संपूर्ण फुटेजचे रेकॉर्ड संरक्षित करून ठेवण्याची सूचना सीआयएसएफला देण्यात यावी, अशी विनंती मर्चंटच्या अर्जात करण्यात आली. याबाबत अॅड. तारक सय्यद यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्य महानगर दंडाधिकारी आर. एम. नेर्लिकर यांनी सीसीटीव्ही फुटेजची मागणी करणाऱ्या अर्जावर एनसीबीला नोटीस बजावली.
0 टिप्पण्या