राष्ट्रनिर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती...
चीफ कॉर्डिनेटर - डॉ. हर्षदीप कांबळे सर (IAS).
6 डिसेंबर महापरिनिर्वाणदिनानिमित्त दर वर्षी पहाटे 6 वाजता , आपल्या समितीतर्फे भीमांजली हा कार्यक्रम राबविण्यात येत असतो. या कार्यक्रमामध्ये संगीत वाद्यांच्या स्वरलहरींद्वारे बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात येते .बाबासाहेब अभ्यासात , राजकारणात , समाजकारणात , जसे प्रकांडपंडित होते तसेच त्यांना चित्रकला , शिल्पकला व संगीतामध्येसुद्धा विशेष रुची होती. त्यांच्या ह्या विशेष आवडीमुळे त्यांना संगीतलहरींद्वारे आगळी वेगळी आदरांजली अर्पण करण्याचा समितीचा प्रयत्न असतो.
भीमांजली कार्यक्रमामध्ये जगभरातील प्रसिद्ध असे वाद्यकलाकार आपली कला डॉ. बाबासाहेबांच्या स्मृतींना अर्पण करत असतात. याही वर्षी भीमांजली कार्यक्रम सकाळी 6 वाजता रवींद्र नाट्यमंदिर (दादर) येथे होणार आहे. या कार्यक्रमामध्ये जाण्यायेण्यासाठी आपण आपल्या कल्याण डोंबिवली टीम तर्फे समितीचे सुपर कॉर्डिनेटर रवींद्र गुरचळ सर (रविभाऊ) यांच्या सुचनेनुसार बस ची व्यवस्था केली आहे. बसने येण्याजाण्यासाठी आपण प्रत्येकी 100 रु नाममात्र फी घेणार आहोत. त्यात आपल्याला सकाळच्या नाश्ता उपलब्द होईल. तरी सर्व धम्मबांधवांना विनंती आहे की भीमांजली कार्यक्रमास आपण ज्यास्तीत ज्यास्त संख्येने उपस्थित राहावे व बाबासाहेबांच्या स्मृतींना वंदन करावे.बसने येण्यासाठी खाली दिलेल्या नं वर संपर्क करणे. त्यानुसार बसेस चे नियोजन करता येईल.
संपर्क
निलेश कांबळे - 9594297628 पवन भिसे- 8652072402
0 टिप्पण्या