कंगना रौनात आणि विक्रम गोखले या कलाकारांनी आपल्या विधानाने भारतीय जनतेच्या भावना दुखावल्या आहेत त्यांच्या विरुद्ध देश द्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी लेखी तक्रार त्यांनी आज नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये मराठी साहित्य मंडळ मार्फत केली आहे. ठाण्याचे जेष्ठ साहित्यीक डॉ जयप्रकाश घुमटकर यांनी आज नौपाडा पोलीस स्टेशन मध्ये आपले सहकारी ज्येष्ठ लेखक विनोद मूळे, ठाणे जिल्हा अध्यक्ष मराठी साहित्य मंडळ आणि ज्येष्ठ कवयित्री ललिता गवांदे , राष्ट्रीय उपाध्यक्षा मराठी साहित्य मंडळ आणि प्रफुल गवांदे यांच्या समवेत जाऊन या दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे
देशामध्ये सर्व जातीचे, धर्माचे , पंथांचे, लोक गुण्यागोविंदाने राहत असताना एक कुडमुडी नटी कंगना राणावत हीने स्वातंत्र्य भिख म्हणून मिळाले आहे, असे नुकतेच विधान केले आहे, आणि देशामधील वातावरण गढूळ केले आहे, हे तिने सवंग प्रसिद्धी मिळण्यासाठी केले आहे,त्यामुळे भारतीय नागरिकांचा, आणि स्वतंत्र्यामध्ये बलिदान केलेल्या असंख्य स्वातंत्र्यसैनिकांचा घोर अपमान केला आहे. तसेच एक गुणी कलाकार विक्रम गोखले यांनीही तिच्या सुरात सूर मिसळला आहे त्यामुळे आदरस्थानी असलेले विक्रम गोखले हे आजपासून चक्रम गोखले झाले आहेत, असे म्हटल्यास वावगे होणार नाही अशी प्रतिक्रिया घुमटकर यांनी दिली.
0 टिप्पण्या