महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (जन्म: ११ एप्रिल १८२७; मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९०), इतर नावे: महात्मा फुले, ज्योतिबा फुले, हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाज नावाची संस्था स्थापन केली; शेतकरी आणि अस्पृश्य व बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी केली. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. मुंबई च्या जनतेने त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली होती. ही पदवी त्यांना इ.स. १८८८ या साली मिळाली. महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
२४ सप्टेंबर १८७३ रोजी, त्यांनी आपल्या अनुयायांसह, सर्व जातीतील लोकांना समान हक्क मिळवण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यात सर्व जाती धर्मातील लोकांनीं एकत्रित येऊन उत्पीडित वर्गाच्या उन्नतीसाठी काम केले. [१]'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.
- एप्रिल ११ इ.स.१८२७ जन्म (कटगुण, सातारा)
- इ.स. १८३४ ते १८३८ पंतोजींच्या शाळेत मराठी शिक्षण.
- . इ.स. १८४० नायगावच्या च्या खंडोबा नेवसे पाटील यांच्या सात वर्षाच्या सावित्रीबाई नावाच्या कन्येशी विवाह.
- इ.स. १८४१ ते १८४७ मिशनरी शाळेत माध्यमिक (इंग्रजी) शिक्षण.
- इ.स. १८४७ लहुजी वस्ताद साळवे दांडपट्टा तालीम व इतर शारीरिक शिक्षण आणि क्रांतिकारक विचार.
- इ.स. १८४७ टॉमस पेन कृत “राईट ऑफ मॅन” या ग्रंथाचे मनन.
- इ.स. १८४८ उच्चवर्णीय मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत झालेला अपमान .
- इ.स.१८४८ शूद्रातिशूद्रांसाठी मुलींची शाळा.
- इ.स. १८४९ शिक्षणदानाचे व्रत घेतल्याने पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासह करावा लागलेला गृहत्याग.
- इ.स. १८४९ मराठी प्रकाशनांना अनुदान देण्याची मागणी करणार्या सुधारकांच्या सभेला दिलेले संरक्षण.
- इ.स. १८५१ चिपळूणकरांच्या वाड्यातील व रास्ता पेठेतील मुलींच्या शाळांची स्थापना.
- नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण कार्याबद्दल सरकारी विद्याखात्याकडून सत्कार.
- इ.स. १८४७ थॉमस पेन यांच्या 'राईट ऑफ मॅन' या ग्रंथाचा अभ्यास.
- इ.स. १८४८ मित्राच्या विवाहप्रसंगी निघालेल्या मिरवणुकीत उच्चवर्णीयांकडून अपमान झाला.
- इ.स.१८४८ भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी काम सुरू केले.
- सप्टेंबर १७ इ.स.१८५१ भिडे वाड्यात व रास्ता पेठेत मुलींच्या शाळेची सुरुवात.
- इ.स.१८५२ पूना लायब्ररीची स्थापना.
- मार्च १५ इ.स.१८५२ वेताळपेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा सुरू केली.
- नोव्हेंबर १६ इ.स.१८५२ मेजर कॅन्डी यांच्याकडून शैक्षणिक कार्यासाठी ब्रिटिश सरकारतर्फे विश्रामबाग वाड्यात सत्कार.
- इ.स.१८५३ 'दि सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ महार मांग ॲन्ड अदर्स' स्थापन केली.
- इ.स.१८५४ स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी.
- इ.स.१८५५ रात्रशाळेची सुरुवात केली.
- इ.स.१८५६ जोतिबांवर मारेकरी घालून हत्येचा प्रयत्न झाला.
- इ.स.१८५८ शाळांच्या व्यवस्थापन मंडळातून निवृत्ती घेतली.
- इ.स.१८६० विधवाविवाहास साहाय्य केले.
- इ.स.१८६३ बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली.
महार" नावाचा अर्थ फक्त महात्मा फुले यांनी त्यांच्या "गुलामगिरी" या पुस्तकात उत्तम प्रकारे स्पष्ट केला आहे. .....जेव्हा पुष्यमित्र शुंग (परशुराम) यांनी भारतात राहणार्या बौद्ध लोकांवर हल्ला केला तेव्हा बाकीचे सर्व पुष्यमित्र शुंग (परशुराम) समोर पराभूत झाले परंतु काही बौद्ध लोक परशुरामाशी 21 वेळा लढले. ...21 वेळा लढलेल्या याच शूर पुरुषांना पुष्यमित्र शुंगाने "महार" असे नाव दिले होते... "महा" म्हणजे मोठा आणि "अरि" म्हणजे शत्रू, महारी (महार) म्हणजे ब्राह्मणांचा सर्वात मोठा शत्रू....आणि महारांचे मुख्य राज्य "महार-रत्था" (आता - महार-राष्ट्र) होते. इतका मोठा इतिहास महात्मा फुलेंनी सांगितला आहे.महात्मा फुले यांना त्यांच्या वडिलांनी घरातून हाकलून दिले, तेव्हा महात्मा फुले यांनी त्यांचे वडील गोविंदरावांना सांगितले, "बाबा, या देशाचा इतिहास बदलण्याची हिंमत कोणात असेल तर ती फक्त "महार" मध्ये आहे..कारण तोच समाज जागृत आहे, बाकी सगळे इथे झोपले आहेत. त्यामुळे तुम्ही मला घराबाहेर काढले तरी मी त्यांना शिकवेन.आणि ज्या प्रकारे महात्मा फुले म्हणाले होते, त्याच पद्धतीने या देशाचा इतिहास एका महारांनी बदलला आहे. ज्यांचे नाव बाबासाहेब आंबेडकर होते. .....
बा ज्योतिबा!
"चातुःवर्णाच्या घाण्याला बांधलेली जनावरे,
शोषित वेठबिगार, चाकरीवंत गुलाम,
बळीच्या बक-याप्रमाणे मुकाट चितेवर जाणा-या सती
अन् बालपणीच केस कापून विद्रूप केलेल्या विधवा."
इथल्या विषारी समाजव्यवस्थेचा बळी ठरलेली,
आपल्या उध्वस्त आयुष्याची सतराशे शहाण्णव ठिगळं सावरुन
विझलेल्या डोळ्यांनी वाट पाहत होती ही माणसे,
विद्रोही वेदनांची आग ओकणा-या... एका तळपत्या सूर्याची.
अन् ... या अंधारलेल्या दिशांतून बा ज्योतिबा...
तू साकार झालास एका दिपमान प्रज्ञाज्योतीसारखा.
आपलं जाडंभरडं उपरणं सावरुन तू कंबर कसलीस...
अन्... मानवतेच्या राजमार्गात येणारे भिक्षुकशाहीचे विषारी काटे
मुळासकट फेकून दिलेस तू.
दुनीयेने बहिष्कृत केलेल्या जिवांना तू जवळ केलेस,
अन्... वादळाच्या तडाख्यात सापडलेल्या दिशाहीन तारुंना
एक भरभक्कम किनारा मिळाला.
स्वतःचा माळी समाज कवटाळत न बसता...
तू 'सत्यशोधक समाज' निर्माण केलास. त्याचवेळी...
आता दिशा उजाडत आहेत याची साक्ष पटली.
विसाव्या शतकात मंदिरे खुली होत नसताना,
अठराव्या शतकात तू आपला हौद खुला केलास.
त्याचवेळी मानवतेच्या लढ्यातला सेनापती म्हणून...
बा ज्योतिबा, तुला मी मनापासून सलाम केला.
तू धर्ममार्तडांची पिठे उध्वस्त करुन,
हातात शेतक-यांचा आसूड घेतलास
अन्... भविष्यकाळातल्या आंबेडकरांसाठी एक दैदिप्यमान दिपस्तंभ झालास.
आजकाल कुठलातरी नतद्रष्ट गांगल ...
तू ओढलेल्या आसूडाचा वचपा काढण्यासाठी
आपली बालीश जीभ सैल सोडू पाहत आहे.
पण बा ! आज प्रत्येक दलित, पिडीत, शोषित जीव
आपल्या ओशाळलेल्या आयुष्याला लाथ मारुन,
खंबीरपणे सूर्याच्या प्रदेशाकडे आगेकुच करीत आहे.
हे मुक्तीयुध्द असेच चालू राहील निरंतर, उषःकाल होईपर्यंत.
म्हणूनच बा ज्योतिबा तू बेफिकीर रहा!
म्हणूनच बा ज्योतिबा तू बेफिकीर रहा!
- विवेक मोरे मो. ८४५१९३२४१०
( क्रांतीबाच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या क्रांतिकारक स्मृतीस विनम्र अभिवादन!)
0 टिप्पण्या