Top Post Ad

भीमा कोरेगाव विजयस्तंभ परिसरातील जागा बळकवण्यासाठी....

 माळवदकर यांच्या कुटुंबातील एका सदस्याने भीमा कोरेगाव युद्धावर एक पुस्तक लिहिले असून विविध वृत्त वाहिन्यांना मुलाखती देऊन भीमा कोरेगाव युद्ध झाले नाही तर ती चकमक होती यासह अनेक मुद्दे मांडले आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यात त्यांना त्यांची मते मांडण्याचा अधिकार आहे...हे प्रकरण न्याय प्रविष्ट तसेच मी स्वतः प्रतिवादी असल्याने मला अधिक बोलता येणार नाही.. तुमच्यासाठी हे नवीन आहे..भीमा कोरेगाव विजयस्तंभ व त्या परिसराची जागा वाचावी असे ज्यांना प्रामाणिक वाटत आहे व जे तन,मन, व धन देऊन काम करू इच्छित आहे त्यांनी आपले नाव, तालुका,शहर, व जिल्हा 9702845000 या व्हॉटस् अप नंबरवर पाठवावा...जयस्तंभ व त्या परिसराची जागा ताब्यात घेण्यासाठी समोरची मोठी यंत्रणा काम करीत आहे तुम्ही आपसातील मतभेद विसरून आता तरी हा विषय गंभीर घ्या ही विनंती...विजय तेव्हा ही आपलाच होता व आता ही आपलाच होणार आहे फक्त तुम्ही साथ द्या..(फुकटे सल्ले देणारे..तुम्हाला शुभेच्छा...तुम्ही चांगले काम करीत आहात..आम्ही सोबत आहोत...अशा फेसबुके यांचे या लढाईत काम नाही..त्यांनी व्यक्त होऊ नये शेपूट घालून गप्प बसावे...)

दादाभाऊ अभंग
अध्यक्ष- भीमा-कोरेगाव विजयस्तंभ संरक्षण व संवर्धन समिती (रजी)

रोहन माळवदकर (विजयस्तंभ स्मारकाच्या रखवालदाराचा बेईमान वंशज) संघाच्या गोटात 
आणि "आनंद दवेच्या " जिभेतील ऍस्पी फुत्कार
      भारतीय भुप्रदेशांत अनेक जातीच्या विषारी सापाच्या प्रजाती अस्तित्वात आहेत. विशेषतः मन्यारी, घोंनस,कोब्रा प्रजाती ह्या जीवघेण्या म्हणून ओळखल्या जातात . पण दक्षिण आफ्रिकेच्या जंगलातील Asp ऍस्प जातीचा लाल रंगाचा छोट्या चणीच्या दीड फूटलांबीच्या Asp चे वैशिष्ट्ये असे की,"तो त्याच्या अंगातून सतत रसायन युक्त विष बाहेर फेकत असतो.एव्हढेच नव्हे तर तो जिथे वास्तव्यास असतो  तिथे कुठलीच वनस्पती उगवत नाही.त्याच्या त्या वैशिष्ट्यपूर्ण गुणांनामुळे द. आफ्रिकन लोकं Asp चे वास्तव्य चटकन ओळखतात.तशाच एका विदेशी प्रजातीं पैंकी ब्रा.म.संघाचा आनंद दवे असायला हवा.  
  
  एक तर छत्रपती शिवरायांनी कष्टाने अठरापगड जातीच्या मावळ्यांच्या मदतीने रक्ताच्या आहुत्या देऊन निर्माण केलेले रयतेचे राज्य उणे पुरे 39-40 वर्षेच टिकवले.17 नोव्हेंबर 1713 ते 1818 अशी 104 वर्षे 44 दिवस पेशव्यांची निरंकुश सत्ता.त्यांच्याच सत्तेतील 14 जानेवारी 1761 च्या पाणीपतातील नामुष्की युक्त हार फुकाचा विजयात रूपांतरित केली.कालचे रोहन माळदकरांचे204 वर्षांनी भीमा कोरेगांवच्या लढाईच्या अनुषंगाने लिहिलेली अनैतिहासिक पुस्तिका आणि त्या दवे नावाच्या ऍस्पने केलेली त्याची पाठराखण अन त्याचा विषारी फुत्कार म्हणजे त्याला संघीय किनार आहे.जे अनैतिहासिक आहे,जे अवैज्ञानिक आहे त्याच्या कुलीन इतिहासकार व लादलेल्या सांस्कृतिक दहशतवादाच्या आधारे वास्तवात उतरवण्याचा प्रयत्न करणे.जो वैभवशाली ईतिहास, बहुजनांतील शूर-वीरांच्या गाथा त्या असत्य व विस्मरणांत टाकणे.त्या साठी ओबीसीच्या भुजबळ-अमोल कोल्हे असोकी हा अगदीच नगण्य माळवदकर असो, त्यांना हताशी धरून असत्य पेरण्याचा प्रयत्न वारंवार झाला सुद्धा.  

     जसा या देशाचा राजधर्म बौद्ध धर्म व बौद्ध संस्कृती ई स.पूर्व 528 ते ई.स.नंतर 712 पर्यंत 1240 वर्षें अव्याहतपणे चालली.तो धर्म पुढे 12व्या शतकापर्यंत(मोगल आगमनापर्यंत) टिकून राहिला, ते चिरसत्य वैदिक संस्कृतीने मोडण्याचा प्रयत्न केला,तो असफल झाला.तसेच अनेक ऐतिहासिक घटनांची वास्तव नोंद न घेता वैदिकांचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी ऐतिहासिक सत्याची अदला-बदल केली गेली   

(1)  जसे विद्येच्या आद्य देवतेची जागा सावित्रीबाई फुले ऐवजी अशिक्षित ,अनपड सरस्वतीला बहाल केली.(2) 23 जानेवारी 1664 ला माँ जिजाऊनी सतीची चाल बंद करूनही 1829 साली बंगालचे राजाराम मोहन रॉय यांच्या खात्यांत ते श्रेय टाकून रॉयना जिजाऊच्या जागी बसवले. 
 (3) पुरंदरचा (भिवरी-किकरी) उमाजी नाईक (बेरड)आद्य क्रांतीकारक (1841) असूनही एक (13 वर्षीय) सैन्य कारकून  वासुदेव बलवंत फडके याला नाईकांच्या जागी बसवले. 
 (4) आदिवासी शूर झलकारीबाईच्या जागी झाशींची राणी बसवली. 
 अश्या अनेक ऐतिहासिक चौर्य कर्म करण्याच्या संवयी वैदिकांना जडलेल्या होत्या.ते कांही काळापर्यंत टिकले अन झाकूनही गेले. 

   पण19व्या शतकांत महात्मा फुले नांवाच्या थोर क्रांतीकारी ईतिहासकाराने व पुढे बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकर नांवाच्या महाज्ञानसुर्याने या अनैतिहासिक गोष्टींचा जगासमोर पर्दाफाश केला. तेंव्हा प्राचीन बौद्ध धम्म संस्कृती आणि  शेकडो ऐतिहासिक वास्तव समोर आले. हीच सनातनी, संघ आणि आनंद दवे सारख्या ऍस्पची अडचण ठरतेय.म्हणून ईतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या " रूढ " संवयी पुन्हा पुन्हां डोकें वर काढताहेत .माळवदकर सारखा एक सामान्य (रखवालदार) प्यादा हाताशी धरुन त्यांच्या समर्थनार्थ ऍस्प जसा रसायनयुक्त विष शरीरातुन फेकतो तसा दवेच्या जिभेतून विषारी फुत्कारी वक्तव्य बाहेर पडले. 

  1 जानेवारी 2018 ची भीमा-कोरेगांव ची दंगल भिडे-एकबोटे-दवे आदी प्रवृत्तीने  पूर्वनियोजित घडवली खरी, पण तिचे पडसाद जेंव्हा जागतिक स्तरांवर उमटायला लागले तेंव्हापासून भीमा-कोरेगांच्या लढाईच्या निमित्ताने पेशवाईच्या अत्त्याचारी कहाण्या, आणि त्यांचा खोटा ईतिहास पुढे येताना दिसतोय म्हंटल्यावर माळवदकराच्या माध्यमातून ऐतिहासिक सत्त्यावर, तळपणाऱ्या सूर्याकडे तोंड करून थुंकण्याचा केलेला हा क्षुद्र प्रयत्न. 
    ब्रिटिश सरकारने भीमा-कोरेगांव च्या लढाईनंतर 26 मार्च 1921 रोजी भव्यदिव्य विजयीस्तंभाचा शानदार पायाभरणी समारंभ अत्यंत उत्साहात संपन्न झाला .बंदुकीच्या फैरी अन तोफांची राजसलामी देण्यात आली. 1822 रोजी त्या विजयस्तंभाचे काम पूर्ण झालें. 

     1 जानेवारी 1927 रोजी बॅरिस्टर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महान इतिहास तज्ञाने ग्रँड डफ व अन्य भारतीय- ब्रिटिश ईतिहास कारांच्या इतिहासाचे वाचन केल्यानंतर भीमा कोरेगांवास भेट दिली याचा अर्थ काय? 
  1941 ते 1946 व आजही महार रेजिमेंटच्या कॅप बॅजवर भीमा कोरेगांवच्या विजयी स्तंभाचे प्रतीक लावण्यात आले होते तेंव्हा  भारत सरकारचे पुरातत्व खात्याने हे का मान्य केले? 
   या माळवदकर वंशजांनी आत्ता जे पुस्तक लिहून जो दावा केला आहे त्याचा पूर्वज विजयस्तंभाची देखभाल करणारा रखवालदार होता. विजयीस्तंभास एकूण 12 एक्कर जमीन दिली होती. यांच्याच पूर्वजांनी ती जमीन गिळंकृत केली. हडप केली. खोटें महसुली दस्ताऐवजा द्वारे मालकी हक्कांमध्यें सुद्धा ही जमीन लावून घेतली. 

   पुढे आंबेडकरी कार्यकर्त्यांनी, ईतिहास संशोधकांनी ही मूळ दस्ताऐवज काढून तहसीलदार हवेली,उपविभागीय  दंडाधिकारी हवेली जिल्हा पुणें यांच्या न्यायालयात जेंव्हा दाद मागितली तेंव्हा त्या 12 एक्कर जमिनीचा निकाल विजयस्तंभाचे स्मारकाच्या बाजूने लागला.पुढें विभागीयआयुक्त पुणे यांनी पण तो निकाल कायम ठेवला.सध्या हे प्रकरण मा.उच्च न्यायालय मुंबई येथे न्याय प्रविष्ट आहे.तेथे पण निकाल स्मारकाच्या बाजूने लागणार याची 1000%खात्री या माळवदकर नावाच्या लुटारूस भनक, चाहूल लागल्याने त्याने हे पुस्तक आनंद दवे आदींचे हस्तक बनून जाणीवपूर्वक लिहिण्याचा अयशस्वी प्रयत्न केला आहे. 
  माझा त्या माळवदकरला प्रश्न आहे की, (1) तुम्हीं स्मारकाचें रखवालदार माळवदकर यांचे नात्यांने कोण आहात?
 (2) भीमा-कोरेगांवच्या लढाई मध्यें पराजय झाल्यानंतर शनिवार वाड्यावरील पेशव्याचा भगवा ध्वज काढून इंग्रजांनी त्यांचा युनियन जॅक शनिवारवाड्यावर फडकावला या जागतिक इतिहासातील नोंदी खोट्या आहेत हे तो सिद्ध करून दाखवेल का?. 
 (3)स्मारक रखवालदार माळवदकर हा जमीन हडप करणारा, लुटारु बोगस,बेईमान आहे हे महसूल न्यायालयाने नोंदवलेले निष्कर्ष मान्य आहेत का? 
(4)  (A) माळवदकर यांच्याकडे ऐतिहासीक पुरावे आहेत का? 
 (B) एकूण किती सिद्धनाक झाले या बाबतचे ज्ञान आहे का? खरड्याच्या लढाईतील निजाम विरुद्ध मराठे ( 1795) सिद्धनाक दुसरा  हा मराठयांच्या  बाजूनें लढला हे तरी माहीत आहे? 
 (5) ते ईतिहास संशोधक आहेत काय? 
 (6) असल्यास संशोधनाची मान्यता मिळाली आहे की नाही त्या बाबतचे शोधनिबंध (Thesis Theory ) घोषित केले आहेत काय? 
 ( 7) या पैंकी कांहीच दस्ताऐवज, पुरावें, अभिलेखे नसतील तर त्यांच्या वंशजांनी हडप केलेल्या जमिनीच्या निराशेतून हे पुस्तक लिहिण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि यांच्या पाठीमागे संघ/सनातनी हात असण्याची दाट शक्यता तर आहेच पण एका नागवंशीय शूर जमातीचे शौर्य पुसण्याचा पुसटसा प्रयत्न आहे. 

     त्याला प्रसिद्धी मिळावी हा एक स्टंटबाजीचा क्षुद्र प्रकार आहे. त्याला माध्यमानी विशेष प्रसिद्धी देऊ नये .तो वैदिकांच्या रक्तातील गुण आहे.कारण ते अनैतिहासीक आहे बस्स एव्हढेच!

अनंतराव सरवदे, सें.नि. तहसीलदार, बीड. 2012022 

----------------------------------

रोहन माळवदकर भीमा कोरेगाव शौर्य स्थंभावर ठेवलेल्या रखवालदाराचे वंशज, राखायला दिलेली जागा हडप करण्याची कोशिस तर करत आहेतच, आणि आता  भिमा कोरेगाव युद्धावर शंका उपस्थित करत आहेत. की ते युद्ध पेशव्यांच्या विरोधात नव्हते, आणि त्यावेळी फक्त चकमक झाली होती युद्ध न्हवे.. मग त्या युद्धात तुझे पूर्वज पण लढले होते की रे..पेशव्यांच्या विरोधात..
युद्ध झालेच नाही म्हणणाऱ्या... इंग्रजानी बांधलेला विजयस्तंभ खोटा आहे का?  की टाईमपास म्हणून बांधला?
तुझ्या मनुवादी लेखणीने आमचा इतिहासाला काही फरक पडणार नाही 
वाईट तुझ्या गुलाम झालेल्या फुसक्या मेंदूच वाटतंय, की 
हजारो वर्षांपूर्वी नदीवर तरंगणारे दगडाचा सेतू  बांधलेला तुला मान्य आहे...
शेपटान आग लावणाऱ्या हनुमानाची काल्पनिक घटना तुला मान्य आहे?
पुरुषाच्या छातीतून,पोटातून, पायातून,कानातून जन्म झाला  या काल्पनिक गोष्टी तुला मान्य आहेत 
मग आमची फक्त 200 वर्षापूर्वीची युद्धची शौर्यगाथाची लढाई खोटी कशी काय ?
दोन हाना पण क्षत्रीय म्हणा यालाच म्हणतात रे.
1947 नंतर भिमा कोरेगाव विजयस्तंभावर झालेली तिरंग्याची आरास व महार रेजिमेंटचा लोगो तुझी झोप उडवीत आहे का?
कुणाला खुश करण्यासाठी आमचा इतिहास तुझ्या चरबट लेखणीने खराब करत आहेस.
पँथर सेना तुझं पुस्तक राज्यात जाळल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही 
या घटनेचा संघटना जाहीर निषेध करते...

बाप्पु सुर्यवंशी
पुणे जिल्हाध्यक्ष-  पँथर सेना

-----------------------------------------

भीमा कोरेगाव ची लढाई एनकेनप्रकारे दाबून टाकण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढले आहेत.त्यावर अनेक पुस्तके आली मात्र सत्य इतिहास पुसून काढता आला नाही.सध्या असेच एक पुस्तक आले असून त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे. प्रसार माध्यमांनी या पुस्तकाला मुद्दाम प्रमोट केले आहे.त्यावर जेष्ठ इतिहास अभ्यासक विचारवंत साहित्यिक प्राध्यापक हरी नरके यांनी या पुस्तक संदर्भातील राजकारणाचा खरपूस समचार घेतला आहे.

भीमा कोरेगाव : भुक्कड पुस्तक गाजवण्याचा मार्ग

भुक्कड पुस्तक गाजवण्याचा मार्ग: प्रा.हरी नरकेएखादे सामान्य चोपडे गाजवण्याचे १०१ मार्ग असे पुस्तक लिहायला हवे. एखादा वादग्रस्त विषय घ्यायचा, भडक आणि एकांगी विधानं करायची, मुद्रित व इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वादाला इंधन पुरवायचे की पुस्तक रातोरात गाजते. खपते. एखादी बोलक्या, संघटित, जागृत वर्गाची जात संघटना मदतीला आली की चांगभलं. सध्या भीमा कोरेगाव प्रकरणी हाच फ़ंडा वापरला जातोय. ज्या संघीय छावनीतल्या प्रमुख लेखक, संपादकांना भीमा नदीकाठचे भीमा कोरेगाव आणि पुण्यातील कोरेगाव पार्क यातला फरक माहीत नाही, ते किती महान संशोधक असणार त्याचा अंदाज सहज करता येईल. असे लेखक हे भाडोत्री असतात. खरे लेखक भलतेच असतात. बहुजन नावे पुस्तकावर छापण्यापूर्ती वापरली जातात. मूळ लेखक अतिशय धाडसी असे डरपोक असल्याने ते पुढे येत नाहीत.

दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग

पण हे लोक ओळखता येतात. मशीद म्हणू नका, वादग्रस्त ढाचा म्हणा हे आठवा. परवा एका वाहिनीवर हा पोरसवदा तथाकथित ‘इतिहासकार’ वाहिनीच्या अँकरला दम देत होता, लढाई म्हणू नका, ती एक किरकोळ चकमक होती, विजयस्तंभ म्हणू नका, जय स्तंभ म्हणा. असले भंपक दावे करणारा हा इसम काय बौद्धिक वजनाचा असेल ते सहज कळावे. पुढे बोलताना तो असेही बोलून गेला, ती लढाई नव्हतीच, चकमक नावाची लढाई होती! बोम्बला ! त्यांची पुढची मुक्ताफळ तर भन्नाटच होती. ते वदले,” पेशव्यांच्या काळात जातपात नव्हतीच. दलितांना अन्यायाची वागणूक मिळालेली नाही.” किती महान संशोधन!

ही किडे गुरुजींच्या आंब्याची किमया असणार. ते नाही का म्हणाले होते, जयपूरला १९८९ च्या मनु पुतळ्याच्या उदघाटन कार्यक्रमाला खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते, नी त्यांनी मनुचा गौरव केला होता.” (बाबासाहेबांचे त्यापूर्वी ३३ वर्षे आधीच ६/१२/१९५६ ला महापरिनिर्वाण झालेले होते!)

एक जात संघटना हे पुस्तक मोफत वाटणार आहे.
तर जात नेते म्हणाले, ही लढाई नव्हती कारण ती एकच दिवस चालली.
हाच निकष असेल तर मग पानिपतची लढाई किती दिवस चालली होती?
ते पुढे असेही म्हणाले की, “सैन्य अवघे पाच हजार विरुद्ध पाचशे होते, त्याला लढाई कशी म्हणणार?”
पावनखिंड जेव्हा बाजीप्रभूंनी लढवली नी जिंकली तेव्हा या लढाईत कमी सैन्य होते म्हणून ती लढाई ठरत नाही का?
हे पुस्तक गाजवण्याचे, बुद्धिभेदाचे, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे उद्योग आहेत.
त्यांना फार महत्व देऊ नका.त्यांना वादंगच हवंय. अनुल्लेखाने मारणे गरजेचे आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com