Top Post Ad

हा तर शिवाजीराजांचे कर्तृत्त्व नाकारण्याचा डाव


अखंड देश गुलामीच्या अंध:कारात चाचपडत असताना स्वयंप्रकाशी छत्रपती शिवरायांनी स्वकर्तृत्वावर तो अंध:कार भेदण्यास सुरूवात केली. स्वत:चे व मावळ्यांचे रक्त आणि घाम सांडून गुलामीचा अंध:कार नष्ट करत स्वातंत्र्याचा, स्वराज्याचा तेजस्वी प्रकाश निर्माण केला. त्यांनी हे सारं वैभव स्वत:च्या धडावरील स्वत:च्याच डोक्यात असणार्या मेंदुच्या आणि मनगटाच्या जोरावर केले. या कामी त्यांना असंख्य मावळ्यांनी साथ दिली. शहाजी राजे, जिजामाता यांनी मार्गदर्शन केले. बाकी भवानीने तलवार दिली, कुठल्या गुरूने मार्गदर्शन केले वगैरे-वगैरे सब बकवास आहे. या गोष्टी पसरवणे म्हणजे शिवरायांच्या कर्तृत्त्वाला, पराक्रमाला नाकारणे आहे. त्यांच्या शौर्याला, धैर्याला व चाणाक्ष बुद्धीमत्तेला संकुचित करून अवमानित करणे आहे.

शिवरायांना भवानी मातेने तलवार दिली ही निव्वळ लोणकढी थाप आहे. शिवरायांच्या असीम उंचीला मर्यादित करणारी आहे .याचा अर्थ असा होतो की जर भवानी मातेने तलवार दिलीच नसती तर शिवाजी महाराज हे स्वराज्य निर्माण करू शकले नसते. ती तलवार त्यांच्याकडे होती म्हणूनच ते पराक्रम गाजवू शकले. जो काही पराक्रम गाजवला तो त्या तलवारीनेच. त्यात महाराजांचे काहीच योगदान नाही. असाच याचा अर्थ होतो. म्हणजे तलवार प्रकरणाआडून शिवाजीराजांचे चरित्र आणि चारित्र्यच नाकारले जात आहे. हे जाणिवपुर्वक घडवले जाते पण ते देव-धर्माच्या आड दडून. देव आणि धर्म दडण्यासाठी अशा जागा आहेत की तिथे कोणी शोध घेत नाही. तिथे कोणी संशय घेतला किंवा चिकित्सा केलीच तर त्याचा आवाज धर्मद्वेष्टा, नास्तिक म्हणून बंद करता येतो. समाजमन त्याच्या विरोधात वापरता येते. प्रसंगी अशाच आंधळ्यांच्या माध्यमातून तो आवाज समुळ नष्ट करता येतो. म्हणूनच अशा गोष्टींना देव-धर्माच्या बुडाशी लपवले जाते. देवत्त्वाच्या, धार्मिकतेच्या बेगडी चढवल्या जातात. शिवाजी राजांना भवानीमातेने तलवार दिली असे सांगितले जाते.

शिवरायांचा काळ सोळाव्या शतकातला. 1630 ते 1680 हा त्यांचा कार्यकाळ पण त्याच्याही आधीपासून जगातल्या काही देशात बंदूका, तोफा अस्तित्त्वात होत्या. भारतावर आक्रमण केलेल्या मोघल, पोर्तुगिजांनी व इंग्रजांनी या प्रगत युद्ध साहित्याचा वापर केला आहे.16 व्या शतकात जर काही देशात तोफा आहेत, बंदूका आहेत तर भवानीमातेने शिवाजी महाराजांना तलवारीऐवजी शंभर तोफा, हजार-पाचशे बंदूका दिल्या असत्या तर ? याशिवाय 16 व्या शतकातच एक विमान येते काय ? तुकाराम महाराजांना घेवून जाते काय ? तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला विमानात बसून जातात काय ? हे जर खरे असेल तर आमच्या देवी-देवतांच्याकडे त्या काळात विमानेही होती. मग असे असेल तर भवानी मातेने शिवरायांना पाच-पंचवीस विमाने दिली असती तर त्यांनी जगावर राज्य केले असते. अपुरी साधने, अपुरे मनुष्यबळ यामुळे त्यांना संपूर्ण महाराष्ट्रावरसुद्धा सत्ता निर्माण करता आली नाही. महाराष्ट्रातला खुप मोठा भाग स्वराज्यात नव्हता. तो मोघल, आदिलशहा व निजामशहा यांच्या ताब्यात होता. जर भवानीमातेने त्यांना तोफा, बंदूका, विमान दिले असते तर अख्या जगाचा इतिहास बदलला असता. बर यातल्या तोफा, बंदूका जगातल्या इतर देशात अस्तित्त्वात होत्या. विमानाचा शोध उशिरा लागला तो 1903 साली लागला. पण त्या क्षणी आमच्या देवांच्याकडे विमान होतेच ना ? मग आमच्या देवतांनी या गोष्टी शिवाजी राजांना का दिल्या नाहीत ?
5 मार्च 1666 रोजी शिवाजीराजे आग्रा भेटीस निघाले. ते 25 मे 1666 ला आग्य्रास पोहोचले. म्हणजे त्यांना आग्य्रास पोहोचण्यासाठी जवळ-जवळ 82 दिवस (3 महिने) लागले. त्यांच्याकडे जर विमान असते तर तासा-दोन तासात पोहोचले असते. तुकाराम महाराजांना विमान न्यायला त्याच काळात येते तर भवानी मातेने शिवरायांना विमान द्यायला हवे होते. कारण शिवाजीराजे रयतेसाठी झुंजत होते. विमानाची खरी गरज शिवरायांना होती. आमच्या देवांच्याकडेही तोफा, बंदूका निर्माण करण्याची ताकद नव्हती का ? आमचे देव पण मागासलेलेच होते काय ? पोर्तुगिजांना व इंग्रजांना तोफा-बंदुका निर्माण करता येत असतील, त्याचा वापर ते युद्धात करत असतील तर आमच्या देवांच्याकडेही हे असायला हवे. भवानीमातेने तलवारी ऐवजी युद्धतंत्राचे हे प्रगत साहित्य शिवरायांना द्यायला हवे होते. काही भामटे शिवाजीराजे हे शिव शंकराचा अवतार होते असे सांगत आहेत. तसे समाजात रूजवत आहेत. त्यासाठी शिवरायांची मंदिरं बांधून आरत्या करत आहेत. त्यांना भगवान म्हणत आहेत. त्यांना चार हात जोडत आहेत मग शिवरायांना तर या गोष्टी काय अवघड होत्या ? त्यांनी लढाईत अखंड हयात घालवली त्यापेक्षा त्यांना तिसरा डोळा उघडून मोघलाई नष्ट करता आली असती, जाळून भस्मसात करता आली असती. शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. त्यांना मोघलाई-आदिलशाही समुळ नष्ट करता आलीच नाही. औरंगजेबाचे साम्राज्य संपवता आले नाही. मग आमच्या शिव-शंकरापेक्षा औरंगजेब ताकदवान होता काय ? आमच्या महादेवाला औरंगजेब भारी पडला असेच म्हणावे लागेल ? वरील सर्व प्रश्न चिकित्सक मनाला पडल्याशिवाय राहत नााहीत.
शिवरायांचे मोठेपण, कर्तृत्व नाकारण्यासाठी त्यांना अवताराच्या यादीत अडकवणे, त्यांना देवीने तलवार दिली म्हणून ते स्वराज्य निर्माण करू शकले असे भासवणे. हा पाताळयंत्री खटाटोप आहे. जे लोक ही हरामखोरी करत आहेत तेच लोक तुकारामांचा खूनही लपवत आहेत. विमान आले आणि सदेह वैकुंठाला गेले असे सांगून त्यांचा मुडदा पाडला हे सत्य दडपत आहेत. तुकारामांच्या पुर्वी अनेक संत झाले, महात्मे झाले. तुकारामांचे समकालीन संत रामदासही होते. म्हणजे संत ज्ञानेश्वर, मुक्ताई, एकनाथ, जनाई, रामदास यातल्या कुणालाच विमानात बसवून सदेह वैकुंठाला नेले नाही की कैलासातही नेले नाही. हा योग एकट्या तुकारामांच्या नशिबातच होता काय ?

या अर्थाने विचार केल्यास बाकीचे संत तुकारामांच्या पात्रतेचे नव्हते की काय ? तुकारामांना खुप खुप छळणारा आणि नंतर त्यांचा शिष्य होणारा भट तुकारामांच्या बरोबर विमानातून का गेला नाही ? तो आपल्या गुरूबरोबर का गेला नाही ? या प्रश्नांची उत्तरे काय आहेत ? बोगस आणि बकवास भाकडकथा रचून लोकांना मुर्ख बनवणारे या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे देवू शकतील का ? देव-धर्माच्या आड दडून समाजाला कुठवर लुटायचे, फसवायचे ? त्यांचे मानसिक आर्थिक, प्रसंगी शाररीक शोषणही कुठवर करायचे ? रोज नव्याचा शोध घेणार्या जगाने ही हरामखोरी उघडी पाडली आहे. अशा षडयंत्राच्या जोरावर समाजावर सत्ता गाजवणार्या लोकांची मुस्काडं विज्ञानाने फोडली आहेत. तरीही त्यांचा तोच-तोच खेळ सुरू आहे. देव-धर्माच्या आड लपून समाजाला मुर्ख बनवत आहेत, गुलाम बनवत आहेत. या नालायकांनी कितीही प्रयत्न केेला तरीही हे बोगस भांडवल त्यांचा धंदा फार काळ चालू देणार नाही. या सगळ्या उचापती आता बंद कराव्यात. शिवाजीराजांना भवानीने तलवार दिली आणि तुकारामांना विमानाने सदेह वैकुंठाला नेले म्हणणे म्हणजे लोणकढी थाप मारणे आहे. अशा थापा आता चालणार नाहीत. लोक शहाणे होतायत. स्वत:चे डोके वापरताहेत. जे मुर्ख असतील त्यांना हे पटत असेल म्हणून अख्खा समाज मुर्ख नाही. याचे भान ठेवावे लागेल.

  • जर शिवाजी महाराज हे इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय पण परग्रहावरही राज्य केले असते !" -- लॉर्ड माउंटबँटन, इंग्लंड. "भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांप्रमाणे लढा ! -- नेताजी सुभाषचंद्र बोस. "नेताजी, तुमच्या देशाला स्वातंत्र्यासाठी कुठल्या ‘हिटलर‘ची गरज नाही, तर तुमच्याच देशात जन्माला आलेल्या शिवाजी महाराजांच्या इतिहासाची गरज आहे !" -- अॅडॉल्फ हिटलर . "शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही, तर शिवाजीमहाराज ही आजच्या तरूण पिढीसाठी उर्जा आहे; जिचा वापर हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी होऊ शकतो !" -- स्वामी विवेकानंद. "जर शिवाजी महाराज आमच्या देशात जन्माला आले असते तर आम्ही त्यास ‘सुर्य‘ संबोधले असते !" -- बराक ओबामा, अमेरिका. "जर शिवाजी महाराज अजून १० वर्षे जगले असते, तर इंग्रजांना पुर्ण हिंदुस्थानचा चेहरा सुध्दा पाहता आला नसता !" -- इंग्रज गव्हर्नर. "काबुल पासुन कंदहार पर्यंत माझ्या तैमुर खानदानाने मोघली सत्ता निर्माण केली. इराक, इराण, तुर्कस्तानच्या कित्येक नामांकित सरदारांना माझ्या तैमुर खानदानाने पाणी पाजलं ! पण हिंदुस्थानात मात्र आम्हाला शिवाजी महाराजांनी रोखलं ! सर्व शक्ती मी शिवाजी महाराजांना पराभव करायला खर्च केली पण शिवाजी महाराज काही माझ्या हाती नाही आले ! या अल्लाह ! दुश्मन दिया भी तो कौण दिया? सिवा_भोसला जैसा दिया. अपने जन्नत के दरवाजे खुले रखना खुदा क्योंकि दुनिया का सबसे बहादुर योध्दा और दिलदार दुश्मन तेरे पास आ रहा है !" -- औरंगजेब (छत्रपति शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर नमाज पढताना काढलेले उदगार, संदर्भ- खाफिखानाची बखर) "उस दिन सिवा भोसला*ने सिर्फ मेरी उंगलियां नही काटी, बल्कि मेरी ताकद के घमंड को भी उतारा. मै अब निंद मे भी *सिवा भोसला से मिलना नही चाहता !" -- शाहीस्तेखान, संदर्भ- खाफिखानाची बखर. "क्या उस गद्दारे दख्खन से सिवा नाम का लोहा लाने के लिए एक भी मर्द नही है, इस दरबार में? लालत है ऐसी मर्दानगी पे !" -- बडी बेगम अलि आदिलशाह. १७ व्या शतकात युरोप खंडात "लंडन गॅझेट" नावाचं आघाडीचं वृत्तपत्र होतं. जेव्हा महाराज आग्र्यावरून सहीसलामत सुटले, तेव्हा या वृत्तपत्राने पहिल्या पानावर जी पहिली बातमी छापली होती आणि त्यात महाराजांचा Shivaji, The King of India असा उल्लेख केला होता ! वरील उदाहरणावरून मी नेहमी जाणिवपुर्वक छत्रपती शिवरायांचा आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे म्हणुन उल्लेख करतो, जागतिक दर्जाचे योद्धे म्हणून शिवरायांची ओळख आहे ती यामुळेच ! महाराजांनी त्यांच्या ३० वर्षाच्या आयुष्यात ज्या ज्या सेनानींचा पराभव केला त्यामध्ये फक्त २ च भारतीय, बाकी सर्वजण हे परकिय सरदार आणि त्या त्या देशाचे नामांकित सरदार होते ! ज्या शाहीस्तेखानाची बोटे महाराजांनी लाल महालात छाटली आणि त्याच्या मनात शिवाजी महाराज या नावाचा खौफ निर्माण केला, तो शाहीस्तेखान साधासुधा मामुली सरदार नव्हता. तर तो अबू तालिबानचा नवाब होता, तुर्कस्तानचा नवाब होता ! प्रतिऔरंगजेब म्हणुन ओळखणारा हा शाहीस्तेखान औरंगजेबाचा सख्खा मामा होता. त्याने प्रचंड मोठा पराक्रम करून मोघलांना मोठा बंगाल प्रांत जिंकुन दिला होता. पण एका रात्रीत महाराजांनी लाल महालात घुसुन त्याची बोटे छाटली आणि काही कळायच्या आत पसार झाले ! परिणामी शाहीस्तेखानाने त्यानंतर शिवाजी महाराज या नावाची इतकी भिती घेतली की शिवाजी महाराजांना आता मला स्वप्नात देखील भेटायचं नाही. असं त्याने औरंगजेबाला सांगितलं इतका खौफ या नवाबाच्या मनात निर्माण केला होता ! बेहलोलखान पठाण, सिकंदर पठाण, चिडरखाण पठाण इ. ज्यांना महाराजांनी रणांगणावर धुधु धुतलं, हे सर्व अफगाणिस्तानचे मातब्बर सरदार होते ! दिलेरखान पठाण, मंगोलियन सरदार, मंगोलिया देशाचा सर्वोत्तम योध्दा होता हा ! महाराजांनी याचा पराभव केला ! सिध्दी जौहर, सिध्दी सलाबत खान हे इराणी होते, इराणचे शुर सरदार होते ! महाराजांनी यांना रणांगणात पाणी पाजलं ! उंबरखिंडीत ज्याचा कोंडुन पराभव केला, तो कारतलब खान उझबेकिस्तानचा सरदार होता, म्हणजे आत्ताच्या रशियाचा ! या महाराजांच्या विजयाची नोंद साक्षात गिनिज बुकाने देखील घेतली. कमीत कमी सैन्याने जास्तीत जास्त सैन्याचा केलेला पराभव ! (१००० मावळे विरूध्द ३०,००० गनिम आणि या ३०,००० पैकी एकही जिवंत राहीला नाही. आणि १००० पैकी एक ही मावळा गमावला नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com