2014 पासून युवा क्रांती संघ संचालित तळा तालुक्यात करिअर डेव्हलपमेंट सेंटर कार्यरत आहे. तिथे विद्यार्थ्यांना स्वतःच्या career planning बद्दल मार्गदर्शन त्या त्या क्षेत्रातल्या तज्ञांकडून करणे. भारतात व भारता बाहेर उपलब्ध असलेल्या संधींची माहिती देण्यात येत आहे. अशाच प्रकारचे कायमस्वरूपी सेंटर मुंबईतही असावं असं अनेकांचा आग्रह होता. त्या नुसार ठाणे येथे करिअर डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात येत आहे. या सेंटर मध्ये 1. दहावी, बारावी, पदवी नंतर उपलब्ध असलेल्या संधी ह्या बद्दल माहिती दिली जाईल, तज्ञांकडून या संदर्भात मार्गदर्शन केलं जाईल. 2. परदेशात उलब्ध असलेल्या संधी ह्या बद्दल माहिती दिली जाईल. तसेच परदेशातल्या निरनिराळया विद्यापीठात प्रवेश घेण्यासंबंधी माहिती दिली जाईल. प्रवेश परीक्षा इत्यादीची माहिती दिली जाईल. 3. Motivational कार्यक्रम आयोजित केले जातील. 4. प्रवेशासाठी लागणारे सर्व प्रमाणपत्रे कशी व कुठून उपलब्ध होतील व ते मिळवण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. एक दिवसाच्या चर्चा सत्रात सेमिनार मध्ये विध्यार्थ्यांना फारसा फायदा होतांना दिसत नाही. हे सेंटर कायमस्वरूपी असेल. अशी माहिती सेंटर समन्वयक आयुष्यमानिनी वीणा कांबळे, वसुधा भस्मे, ज्योती रंगारी, ऍड.मधुकर लांडगे यांनी दिली आहे तर सेंटरची संकल्पना मांडणी व मार्गदर्शन सुनील कदम करणार असून अधिक माहितीकरिता बुद्ध विहार, जेतवन परिसर, पवारनगर, लास्ट बस स्टॉप पवारनगर, ठाणे (वेस्ट) ४०० ६१०. या ठिकाणी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या