Top Post Ad

महाराष्ट्र धर्म आणि लोककल्याणकारी योजनांची आघाडी

      महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने निर्माण झालेले राज्य आहे महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेकांचे योगदान आहे.  महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा 1 मे 1960 रोजी प्राप्त झाला. राज्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संपन्न वारसा आहे. देशातील सर्वांत प्रगत पुरोगामी, सुधारणावादी राज्य असलेल्या आपल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन दोन वर्षाहून अधिक कालावधी पूर्ण झाला आहे. या कालावधीत राज्यातील महाविकास आघाडी  सरकारने जनसामान्यांच्या हितासाठी स्विकारलेली धोरणे, घेतलेले निर्णय महत्त्वाचे ठरले असून या निर्णयांमुळे महाराष्ट्रात मोठया प्रमाणात विकास घडून आला आहे. म्हणूनच साऱ्या देशाचे लक्ष महाराष्ट्राकडे आहे.

समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर अथक निरंतर चालत राहण्याची महाराष्ट्राची परंपरा आजही कायम आहे. महाविकास आघाडी सरकारचा बहुतांश कालावधी कोविड विषाणूचा अतिशय नेटाने, नियोजनबध्दरितीने मुकाबला करण्यात गेला. मात्र या विषाणूच्या आक्रमणाला न जुमानता या सरकारने वेगवेगळया आघाड्यांवर अधिक जोमाने काम करण्यास सुरुवात केली. कोरोना प्रतिबंधक लसीमध्ये महाराष्ट्र अव्वल ठरले आहे. सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करत राहू, आणि सर्वांगिण विकासाच्याबाबतीत महाराष्ट्राला देशात क्रमांक एकचे राज्य बनवू.” या दृढ निश्चियाने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी व विकासासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले.

            विविध क्षेत्रांसाठी नवनवीन योजना नुसत्या आणल्याच नाही, तर राबवूनही दाखविल्या. गडकिल्ले संवर्धन, प्राचीन मंदिराचा जीवर्णोध्दार देशाला दिशादर्शक असे इलेक्ट्रिक वाहन धोरण, पर्यटन व्यवसायातून रोजगाराच्या संधी निर्माण करून लोकांमध्ये आत्मविश्वास जागविण्यात हे शासन यशस्वी ठरले. शेतकऱ्यांना  कर्जमुक्ती देणारी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना यशस्वीपणे राबविली. चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापूरसारख्या नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना केंद्राचे निकष बाजूला ठेऊन अधिकाधिक मदत करण्यात आली. गेल्या दोन वर्षात कोरोना काळात गरिबांचे पोट भरणारी शिवभोजन थाळी अनेक गरजूंना आधार बनली. सर्वसामान्य माणूस, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, व्यापारी आदी घटकांना आधार देत एकजूटीने, एकदिलाने काम करून सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची पताका डौलाने फडकवणारे हे सरकार सर्व कसोट्यांना खरे ठरले. कोरोनाच्या संकट काळात राज्य शासन विविध घटकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले. या आपत्तीकाळात विकासकामांना खिळ न बसवता त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला. सोबतच आरोग्य यंत्रणा बळकट करण्यात आली.

कोकण विभागात दोन वर्षात भरीव कार्य उभे राहीले, अगदी मोजकेच सांगायचे झाले तर, रत्नागिरी जिल्हयात श्रीक्षेत्र गणपतीपूळे विकासासाठी 102 कोटी खर्च, गोव्याच्या धर्तीवर आरेवारे तसेच गुहागरच्या सागर किनाऱ्यांवर बिच शॅकला मान्यता, मांडवी गावालगतच्या मिऱ्या बंदरावर 160 कोटीच्या बंधाऱ्यास पर्यटन केंद्राच्या स्वरुपात बांधल्याने रत्नागिरीच्या आकर्षणात वाढ, काताळ शिल्पांचे जतन करून त्यापर्यंत पर्यटक जावेत यासाठी विशेष नियोजन, हापूस, काजूसाठी विशेष धोरण, शीतगृहांची निर्मिती. ठाणे जिल्हयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे नवी मुंबईतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची  उभारणी, ठाणे आणि मुलूंड या दोन शहरांना जोडणाऱ्या कोपरी पुलाच्या दोन मार्गिका सुरु, अंबरनाथ मधील प्रसिद्ध शिवमंदिराचा कायापालट व मंदिराच्या परिसराचा विकास, ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला परिसरात साकारणार नौदलाचा इतिहास. कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातीन दुर्गाडी किल्ला परिसराचा विकास, नवी मुंबईपासून मुंबई-एलिफंटा-जेएनपीटी अशा विविध मार्गांवर वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथे प्रवासी जेट्टी उभारण्यात आली आहे, 

ठाणे जिल्हयातील पोलीस दलाच्या बळकटीकरणाअंतर्गत 5 कोटी 88 लाख 21 हजार रुपये इतक्या निधीतून 147 वाहने देण्यात आली आहेत,  स्मार्ट सिटी प्रकल्पात ठाणे जिल्हा अग्रेसर. ठाणे स्मार्ट सिटीचा समावेश देशातील 100 शहरांमधून 10 शहरामध्ये झाला आहे. रायगड जिल्हयात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी 406 कोटींची प्रशासकीय मान्यता तसेच इतर शासकीय बाबींची पूर्तता झालेली असून लवकरच महाविद्यालयाचे बांधकामही प्रत्यक्षात सुरू होईल. यावर्षी 100 विद्यार्थ्यांची पहिली तुकडी सुरु झाली आहेविभागीय क्रीडा संकुलाची उभारणी, जलवाहतूक, रस्ते वाहतूकीसाठी विविध प्रकल्प कार्यान्वित, औद्योगिक विकासात रायगड जिल्हा अग्रेसर. ऑक्सीजन हब म्हणून नावलौकीक, नैसर्गिक आपत्तीच्या काळात वीजामुळे होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभारण्यात येणाऱ्या नव्या 82 निवारा शेडमध्ये वीज प्रतिरोधक यंत्रे बसविण्यात येणार, रायगड जिल्हयातील मोठीजूई, बोरली, राजापूरी आणि आवास अशा 4 ठिकाणी चक्रीवादळ निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.

पालघर जिल्हयात उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे ऑक्सीजन निर्मितीच्या प्रकल्पाचे लोकार्पण, चिकूसाठी स्वतंत्र संशोधन केंद्र, जव्हार पर्यटन क्षेत्र विकासासाठी विशेष विकास कार्यक्रम, आदिवासी विकासासाठी विविध योजना कार्यान्वित. विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप ,डहाणू-बोर्डी किनाऱ्यावर पर्यटन विकास, पालघर जिल्हयात प्रशासकीय इमारतीची उभारणी. एकाच क्षेत्रात सर्व शासकीय कार्यालये, मौजे टेंभोडे येथे 16 एकर जागेमध्ये राष्ट्रीय दर्जाचे जिल्हा क्रिडा संकुल विकसित करण्यात येत आहे. कोकण विभागाची अशी भलीमोठी यादी देता येईल.
आज महाराष्‌ट्र दिनानिमित्ताने एवढेच की, महाराष्ट्राने सतत ‘महाराष्ट्र धर्म’ जोपासला. लोककल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीमधील महाआघाडीमुळेच साऱ्या देशाचे ‘आशास्थान’ महाराष्ट्र बनले आहे. प्रेरक इतिहासाचा शिव वारसा घेऊन उज्वल भविष्याकडे झपाट्याने निघालेल्या माझ्या महाराष्ट्राला मानाचा मुजराच हवाच!

----------
विभागीय माहिती कार्यालय,
कोकण भवन, नवी मुंबई


----------------------------

*मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नागरिकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा*

*कितीही अडचणी येऊ द्यात महाराष्ट्र धर्माची पताका विश्वात फडकविणारच*
*राज्यातील सौहार्द, सामंजस्याचे वातावरण बिघडू देऊ नका*
*एकत्र येऊन महाराष्ट्रासमोरची आव्हाने परतवून लावूत*
कितीही अडथळे आणि संकटं येऊ देत, महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही आणि हे करतांना महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकाविल्याशिवाय राहणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस शुभेच्छा दिल्या आहेत.आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान जर कुणी करीत असेल तर येथील स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे .

आमचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे.दोन वर्ष तर देशावरच कोरोना विषाणूचे संकट होते, पण याही आव्हानात्मक परिस्थितीत शेती, उद्योग - गुंतवणूक यामध्ये महाराष्ट्राने स्वतःला आघाडीवर ठेवले. शिवभोजनसारखी थाळी मोफत देऊन, तसेच दुर्बल, असंघटित वर्गाला आर्थिक सहाय्य करून सामाजिक भान ठेवले आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली. आरोग्य असेल किंवा सुशासन, पर्यावरण असेल किंवा नागरी विकास, महाराष्ट्राने उचललेल्या ठोस पावलांचे देश तसेच जागतिक पातळीवर पण कौतुक झाले. संकटातच खरी परीक्षा होते असे म्हणतात, त्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात नैसर्गिक आपत्ती किंवा विषाणूच्या आक्रमणात प्रशासनानेअगदी तळागाळापासून अतिशय धीराने आणि हिमतीने काम केले, त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडा उचलून सर्वांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न फिके पडल्याचे दिसते.

महाराष्ट्राचा इतिहास लढवय्यांचा आहे मग मोगलांच्या आक्रमणाला थोपविणारे छत्रपती शिवराय, औरंगजेबाला ललकारणाऱ्या ताराराणी असोत किंवा सामाजिक सुधारणांसाठी आयुष्य पणाला लावणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले असोत. या सर्वांनी आणि त्यांना आदर्शवत मानणाऱ्या अनेकांनी जात पात धर्म याचा विचार न करता महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत केली. या भूमीचे सुपुत्र असलेल्या महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना म्हणणे केवळ एक पुस्तक नाही तर देशातील प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी एक अनमोल देणगी आहे.

आज दुर्देवाने स्वार्थ आणि महत्वाकांक्षेपोटी महाराष्ट्रामधील जात धर्मांतील सलोखा संपवून सामाजिक क्रांतीच्या या तमाम महापुरुषांचे विचार मातीस मिळविण्याची कामगिरी सुरू आहे. महाराष्ट्र हा सामाजिक सलोखा, संयम आणि सारासार विवेकबुद्धीने वागणारा म्हणून ओळखला जातो. एखाद्या राज्याची प्रगती म्हणजे काही केवळ किती गुंतवणूक तिथे आली आणि किती रस्ते झाले असे नाही. महाराष्ट्राने पर्यावरणासारख्या मूलभूत आणि संवेदनशील विषयवार जगाचेही लक्ष वेधले आहे. आरोग्याची पुढील काळातली आव्हाने लक्षात घेऊन आधुनिक वैद्यकीय पायाभूत सुविधांचे नियोजन केले आहे. खेडी, शहरे स्वच्छ असावीत, सर्वांना व्यवस्थित नळाने पाणी मिळावे, सर्वसामान्यांना घरे मिळावीत, शहरांचे आराखडे हे पुढील काही वर्षांच्या विकासाचा अदमास घेऊन तयार करावेत, विकेल तेच पिकेल असे ठरवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करणे, सौर ऊर्जेचा वापर, महिलांच्या सुरक्षेसाठी शक्ती कायद्याच्या माध्यमातून गुन्हेगारांवर वचक या गोष्टींवर आम्ही केवळ भरच दिलेला नाही तर अंमलबजावणी सुरू केली आहे.

संघराज्य व्यवस्थेचा आम्ही सन्मानच करतो. विकासासाठी उत्तुंग झेप घेण्याची दुर्दम्य इच्छा आमच्यात आहे. राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देण्याचे कर्तव्य आम्हाला पार पाडायचे आहे आणि पार पाडतही आहोत.मला खात्री आहे की, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील माझे तमाम बंधू आणि भगिनी हे ज्यासाठी महाराष्ट्र ओळखला जातो त्या परस्पर सौहार्द, बंधुभाव आणि एकोप्याचे वातावरण कलुषित होऊ देणारे सगळे प्रयत्न हाणून पाडतील.माझे सर्वांना,अगदी विरोधी पक्ष आणि संघटना यांना देखील कळकळीचे आवाहन आहे की, मनात विद्वेष न ठेवता महाराष्ट्राचा देशातच नव्हे तर जगात डंका वाजविण्यासाठी एकत्र येऊन महाराष्ट्राची पताका हातात घेऊ यात...........

मा. मुख्यमंत्री यांचे जनसंपर्क अधिकारी,
मुख्यमंत्री सचिवालय, सहावा मजला, मंत्रालय, मुंबई - ४०००३२.
दूरध्वनी : कार्यालय - ०२२ २२०२ ४९०१,



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com