ठाणे शहरातील २०० हुन अधिक युवा धम्मबांधवांनी एकत्र येऊन शरणम फाउंडेशनच्या माध्यमातून महाकारूणी तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या २५६६ व्या जयंती निमित्ताने सोमवार दिनांक १६ मे २०२२ रोजी सायंकाळी ६.०० वाजता ठाण्यातील उपवन तलाव या ठिकाणी बुद्धा फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी वंदनीय भिक्खूसंघाच्या हस्ते संपूर्ण तलाव परिसरात दीपप्रज्वलन केले जाणार असुन त्यानंतर जागतिक शांततेसाठी सामुदायिक बुद्ध वंदना घेतली जाणार आहे. जगविख्यात गायक पावा यांचे संबुद्धा लाईव्ह (म्युझिकल मेडिटेशन) कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रमाला ठाणे शहरातील धम्म बांधवांनी व ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शरणम फाउंडेशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या