Top Post Ad

तथाकथित उच्चवर्णिय विद्यार्थ्यांचा मध्यान्ह भोजनावर बहिष्कार कायम

उत्तराखंडमधील एका सरकारी शाळेत मध्यान्ह भोजनावरून सुरु असलेला संघर्ष अद्यापही थांबत नाही. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, स्वत:ला उच्च जातीचे समजणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुनितादेवी या महिलेच्या हातचे जेवण खाण्यास नकार दिल्याचा प्रकार समोर आला होता. यावर शाळा प्रशासनाने सुनितादेवी यांच्या जागेवर दुसऱ्या भोजनदेवीची नियुक्ती केली होती. मात्र  तुम्ही जर आमच्या महिलेच्या हातचे जेवण खाण्यास नकार देत असाल तर आम्हीसुद्धा या उच्चवर्णीय समजणाऱ्या महिलेच्या हाताने बनवलेले अन्न खाणार नाहीत, असा पवित्रा अनेक विद्यार्थ्यांनी घेतला होता. हे प्रकरण शाळेतील व्यवस्थापन समितीने सामंजस्याने सोडवण्याचा प्रयत्न केला असला तरी या प्रकरणी अद्यापही जैसे थे परिस्थिती असल्याचे वृत्त पुन्हा एकदा द इंडियन एक्स्प्रेसने २१ मे रोजी प्रसारित केले आहे.


चंपावत जिल्ह्यातील या शाळेचे मुख्याध्यापक प्रेम सिंह यांनी शुक्रवारी सांगितले की, डिसेंबरमध्ये झालेल्या वादानंतर आता पुन्हा सुनीता देवी यांनी शिजवलेले अन्न 7-8 विद्यार्थ्यांनी खाण्यास नकार दिला आहे. मार्चच्या अखेरीस शाळेत माध्यान्ह भोजन पुन्हा सुरू झाले. मात्र ज्यांना डिसेंबरमध्ये पंक्तीनंतर काढून टाकण्यात आले होते. त्यांनी पुन्हा भोजनास नकार दिला आहे. याबाबत  डीएम आणि काही पोलिस अधिकार्‍यांनी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची नुकतीच बैठक घेतली आणि त्यांना जेवणावर बहिष्कार टाकणे थांबवण्याचा प्रयत्न केला. अधिकाऱ्यांनी स्वतः शाळेतच जेवण केले. तथापि, या ७-८ विद्यार्थ्यांनी भात खात नसल्याचे कारण देत जेवण करण्यास नकार दिला, या प्रकरणी मुख्याध्यापकांनीही आदल्या दिवशी पालकांची बैठक घेऊन. त्यांना ताकीद दिली की मुलांना शाळेतून काढून टाकले जाऊ शकते. गुरुवारी झालेल्या बैठकीदरम्यान, पालकांनी आश्वासन दिले की ते त्यांच्या मुलांशी अन्न खाण्याबद्दल बोलतील,
 
 उत्तराखंडच्या सरकारी शाळेत ज्या तथाकथित उच्चवर्णीय विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजनावर बहिष्कार टाकला असताना 23 डिसेंबर रोजी, चंपावत जिल्हा अधिकारी सीईओ आर सी पुरोहित यांनी तपासा दरम्यान जेवण बनवणाऱ्या सुनीता देवी यांना कामावरून काढून टाकले होते आणि पुढील आदेश येईपर्यंत नियुक्ती स्थगित केली होती. त्यानंतर या  ठिकाणी स्वत:ला  उच्चवर्णिय समजणाऱ्या महिलेची नियुक्ती केली होती. याचा निषेध करीत या स्वत:ला उच्चवर्णिय समजणाऱ्या महिलेच्या हातचे जेवण खाणार नाही असा पवित्रा इतर विद्यार्थ्यांनी घेतला असल्याने गावाची दोन गटात विभागणी झाली होती. याबाबत  चंपावतचे उपशिक्षणाधिकारी अंशुल बिश्त या प्रकरणी लक्ष घालत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.   शिक्षकांनी मुलांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र काही तोडगा निघाला नव्हता. अखेर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. धामी यांनी पोलीस उपमहानिरीक्षक (डीआयजी) कुमाऊँ नीलेश आनंद भरण यांना सुखीधांग येथील शाळेला भेट देऊन घटनेची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यास सांगितले होते.

 नियुक्ती करताना नियमांचे पालन करण्यात आले नसल्याचे आढळून आल्याने महिलेची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. मात्र सुनीता देवी या पदासाठी पात्र असल्याचा दावा चंपावत जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी दावा केला होता.  शाळेचे मुख्याध्यापक प्रेम सिंह यांनी सुनीतादेवी यांना कामावर ठेवले होते. त्यासाठी त्यांनी यापूर्वी पुष्पा भट्ट या उच्चवर्णीय समजणाऱ्या स्वयंपाकीणीची त्यांच्या स्तरावर नियुक्ती नाकारली होती. पुष्पा भट्ट यांना नियुक्ती पत्र दिले गेले नाही आणि संपूर्ण निवड प्रक्रिया स्वतः मुख्याध्यापकांनीच रद्द केली होती. अशी माहिती पुरोहित यांनी दिली होती.  परंतु सुनीता देवी महत्वाच्या पात्रता पूर्ण करणाऱ्या  इतर सर्वांपैकी एकमेव अर्जदार असल्याने त्यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली. परंतु काही विद्यार्थ्यांनी भोजन खाण्यास नकार दिल्याने हा वाद आता पुन्हा पेटणार असल्याचे दिसत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com