अमूक वेळेत मालमत्ता कर भरल्यास त्यात सूट मिळेल अशा जाहीराती करून ठाणेकरांना मोठा दिलासा दिला असल्याचे सांगण्यात येत असले तरी ठाणे महानगर पालिका हा कर मागच्या दाराने सर्वसामान्य नागरिकांकडूनच वसूल करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. मालमत्ता कर भरण्यास दिरंगाई करणाऱ्या ठाणेकरांना आता दर दिवशी दोन टक्के दराने व्याज आकारणी करून ठाणे महानगर पालिका सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातूनच ही तूट भरून काढत आहे. कळवा प्रभाग समितीमध्ये होत असलेल्या या प्रकाराचे सविस्तर वृत्त प्रजासत्ताक जनताच्या अंकात प्रकाशित करण्यात आले होते. यानंतर आता पुन्हा एकदा कर माफीयांचा भयानक प्रकार समोर आला आहे. कोपरी प्रभाग समितीत मालमत्ता कर माफिया सक्रिय झाल्याची माहिती प्रजासत्ताक जनताच्या हाती लागली आहे. ठाणे महानगर पालिकेच्या मालमत्ता कर वसुली विभागात कोपरी प्रभाग समितीत कर माफिया सक्रिय झाल्याचा संशय बळावत आहे. मालमतेला कर लावण्यासाठी मनमानी वसुली या कर्मचारी यांच्यामार्फत केल्याने कोपरीतील सर्वसामान्य माणूस हैराण झालेला आहे. कोपरी प्रभाग समितीत कर विभागात मोठी अनागोंदी आणि सावळागोंधळ माजलेला आहे. कोपरी प्रभाग समिती करविभागातील कर्मचारी हे मनमानी कारभार करीत आहेत. मालमता कारवार पालिकेचा आर्थिक डोलारा सांभाळला जात असतानाही स्वतःहून मालमत्ता कर लावण्यास येणाऱ्या कोपरीवासियांकडून कर आकारणी करण्यासाठी हवी तेवढी रक्कम घेतात. तर मालमत्ता धारकांना देण्यात येणारे कर पावती हि देखील मूळ प्रत न देता त्याची नक्कलप्रत ही रहिवाशांना देण्यात येते. मूळप्रत न देण्यामागची कारण काय? असा सवाल आता कोपरीवासी उपस्थित करीत आहे. दुसरीकडे कोपरी परिसरात असलेल्या खाजगी मालमत्ताचा कर आपल्या नावावर लावून घेण्यासाठी प्रभाग समितीतील कर विभागाचे कर्मचारी हे लोकांकडून लाखो रुपयांची मागणी करून नावावर कर लावून देतो असे सांगून वसुली करीत आहेत. या कोपरी प्रभाग समितीच्या कर माफियांवर कुणीतरी अंकुश लावेल काय? कर विभागात असलेले अधिकारी जी जी गोदेपुरे आणि त्यांचे सहकारी जितेंद्र जीवतोडे, सचिन आरगडे यांच्यासह अन्य लोक हे कोपरी प्रभाग समितीत कर विभागात अनागोंदी माजवलेली आहे.
तर कळवा प्रभाग समितीमध्ये २ हजार ८२७ अशी एकूण रक्कमेचे मालमत्ता देयक ठाणे महानगर पालिकेने दिले. ते देयक भरण्यास ठाण्यातील कळवा प्रभाग समितीमध्ये गेले असता ३ हजार ६११ अशी रक्कम भरण्यास कर लिपीकाने सांगितले. याबाबत कर लिपिकाला विचारले असता आम्हाला काही माहिती नाही. तुम्हाला ही रक्कम भरावीच लागेल .तुम्ही कर देयक भरण्यास उशीर केला असल्याने त्यावर व्याजाची रक्कम अधिक झाली आहे. ही रक्कम मुळ करदेयकात नमूद करण्यात आलेली नाही. मात्र प्रत्यक्षात कर देयक भरण्यास गेले असता संगणकावर मिळणाऱ्या बीलात ही रक्कम जमा करण्यात येते. प्रत्येक दिवशी दोन टक्के या दराने दिरंगाईबाबत ही रक्कम वाढली आहे. ही रक्कम भरल्यानंतर त्याबाबत संबंधित अधिकाऱ्याला विचारणा केली असता आम्हाला वरून तसे आदेश आहेत. असे सांगण्यात आले. दर दिवशी दोन टक्के दिरंगाई आकाराबाबत काही अध्यादेश आहेत का? याबाबत मात्र अधिकाऱ्यांनी कानावर हात ठेवले. अशा तऱ्हेने ठाणे महानगर पालिका सावकारापेक्षाही अधिक दिरंगाईच्या नावाखाली व्याज वसूल करीत असल्याचा आरोप रेहमान चेऊलकर यांनी केला आहे. याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास अधिकारी वर्ग टाळाटाळ करीत आहेत.
0 टिप्पण्या