मुंबई- गाढवाचं लग्न या अजरामर वगनाट्यासह आपल्या कलाकृतीने नाट्यक्षेत्रात आपल्या कलेचा ठसा उमटविणारे राष्ट्रपती पदक पुरस्कार प्राप्त वगसम्राट दिवंगत दादू सरोदे - इंदुरीकर यांच्या ४२ व्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या जन्मगाव इंदुरी (पुणे जिल्हा ) येथे सोमवार दिनांक १३ जून रोजी सकाळी ११ वाजता अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे .
वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर . जेष्ठ साहित्यिक अर्जुन डांगळे , दादू इंदुरीकर यांचे द्वितीय पुत्र राजू दादू इंदुरीकर , गाढवाचं लग्न फेम दिवाणजी वसंत अवसरीकर ,वंचितचे नेते वसंतराव साळवे , विठ्ठलराव शिंदे ,बबनराव ढोरे ज्योतीताई शिंदे यांच्यासह कलाक्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत .
दादू इंदुरीकर यांच्या जन्मशताब्दी वर्षात येणाऱ्या या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी कलाक्षेत्रातील व इंदुरीकर यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने सदर कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वगसम्राट दादू इंदुरीकर प्रतिष्ठानचे संस्थापक सरचिटणीस अशोक सरोदे - इंदुरीकर व आयोजन समितीने केले आहे
0 टिप्पण्या