बुध्दीझमचा सम्यक क्रांती विचार हयातभर जोपासणारे आणि कीर्तीचा लोप होणे ही क्षुल्लक बाब आहे, पण प्रज्ञेचा लोप होणे ही गोष्ट भयंकर होय!असं जपणारे पॅन्थर नेते राजा ढाले यांचा 30 सप्टेंबर जन्मदिवस. हा दिवस मुंबई येथे कसा आणि कुठे साजरा करायचा यासंदर्भात नाशिक येथे प्रा डॉ इंदिरा आठवले यांचे अध्यक्षतेखाली 17 एप्रिल रोजी नाशिक आणि 22 मे रोजी मुंबई या ठिकाणी दोन बैठका संपन्न झाल्या. 12 जून रोजी मुंबई येथे आयोजित बैठकीमध्ये प्रा डॉ इंदिरा आठवले यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात येणार होती. परंतु काही अपरिहार्य कारणामुळे ही बैठक पुढे 3 जुलै रोजी झाली. तसेच पुढील बैठक.२४:जुलै रोजी, ठीक ११-००,वाजता प्रा.डॉ.इदिरा आठवले यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांचे कार्यालय, नाशिक जनरल पोस्ट ऑफीस, नाशिक जिल्हा परिषद इमारती शेजारी, नाशिक -त्र्यंबकरोड, नाशिक कालीदास कला नाट्यगृह मंदिरासमोर, नाशिक येथे आयोजित करण्यात आली आहे.
सर्वांना याद्वारे जाहीर निमंत्रण तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन ज्येष्ठ, पँथर कार्यकर्ते आयु. साराभाई वेळुंजकर, प्रा डॉ नितीन गांगुर्डे, प्रा,गुलाबराव अंबपकर कोल्हापूर, प्रा.यशवंतराव मोरे जळगाव, प्रा उत्तम कांबळे मुंबई,आयु.विवेक गायकवाड नाशिक, आयु बबन बनसोड , ॲड.सोमकुवर, नागपूर, आयु.पुडरिक बोढारे, अरुण निरभवने, दिलीप बनसोडे, मिलिंद बोरकर, सुभाष शिंदे, एमेस अंधेरिकर, मदन अहिरे आणि मुंबईतील मागील बैठकांचे मुख्य संयोजक आयु.राजेंद्र.खरात यांनी केले आहे.
सांध्यपर्वातील पँथर....राजा ढाले
https://www.prajasattakjanata.page/2022/07/blog-post_16.html
0 टिप्पण्या