ठाणे महापालिकेने जाहीर केलेल्या फेरीवाल्यांच्या यादीमध्ये ठाण्यातील पत्रकाराच्या नावाचा समावेश असल्याने याबाबत पालिकेने खुलासा करावा. मागील अनेक वर्षापासून सदर पत्रकार हा ठाण्यातील मोठा पत्रकार म्हणून मिरवत असून हा महानगर पालिकेत पत्रकारांना देण्यात येणाऱ्या अनेक योजनांचा लाभार्थी असल्याचेही निदर्शनास येत आहे. पत्रकार म्हणून महापालिकेचा लाभार्थी असताना पुन्हा फेरीवाला म्हणून ठाणे महानगर पालिकेच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी फेरीवाल्याच्या यादीत आपले नाव समाविष्ट करणाऱ्या या पत्रकाराची चौकशी झालीच पाहिजे असे सामाजिक कार्यकर्ते सुभाष ठोंबरे यांनी म्हटले आहे.
- अधिक माहितीसाठी
- सुभाष ठोंबरे
- +91 98202 99096
0 टिप्पण्या