राज्यात इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा या राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेतल्या जातात. राज्यात एकाच दिवशी या परीक्षा घेतल्या जात असून या वर्षी परीक्षेसाठी मागील काही दिवसांपासून हालचाली सुरू होत्या. पूर्वी २० फेब्रुवारी राेजी परीक्षा आयाेजित केली होती. मात्र काही तांत्रिक कारणामुळे या परीक्षा लांबवण्यात आल्या. या परीक्षांसाठी परीक्षा परिषदेने सर्व जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून इयत्ता पाचवी व आठवीच्या विद्यार्थ्यांची माहिती मागवली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन परीक्षा केंद्र निश्चित करण्यात आले आहेत.
दरम्यान, राज्यातील ५,७०७ परीक्षा केंद्रांवर बुधवार, २० जुलै रोजी एकाच वेळी या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यासाठी केंद्रावर विद्यार्थ्यांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कळवण्यात आले आहे. याशिवाय २० जुलै रोजी परीक्षा केंद्र असलेल्या शाळांना सुटी द्यावी,मात्र कार्यालयाने कामकाज सुरू राहील याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्य परीक्षा परिषदेने दिल्या आहेत.
0 टिप्पण्या