Top Post Ad

राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार


सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून भाजपचा डाव असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप

मोहित कंबोज महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या झाले आहेत का?

राष्ट्रवादीचा आणखी एक बडा नेता जेलमध्ये जाणार असे ट्विट भाजपाचे नेते मोहित कंबोज यांनी केल्याने पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले आहे. सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून हे ट्विट करण्यात आले होते. त्यामुळे आता हा नेता कोण? अशी चर्चा सुरु झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचा हा तिसरा नेता कोण असणार? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. विशष म्हणजे, मोहित कंबोज यांनी हे ट्विट अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच केल्याने याची अधिक चर्चा होत आहे. त्यांचे हे ट्विट दबाव निर्माण करण्यासाठी तर नाही ना? असा प्रश्नही राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.

अडीज वर्षांपूर्वी अजित पवारांनी देवेंद्र फडणवीसांसोबत जात राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. पहाटेच शपथविधी उरकून अजित पवार आणि फडणवीसांनी नवे सरकार स्थापन केले होते. यानंतर लगेचच अजित पवारांविरोधातील सिंचन घोटाळ्यात तपास यंत्रणांनी क्लिनचिट दिली होती. यामध्ये या घोटाळ्याशी अजित पवारांचा काहीही संबंध नसल्याचे म्हटले होते. यावर मोठा गौप्यस्फोट अडीज वर्षांनी झाला आहे. अजित पवारांना तपास यंत्रणांनी क्लिचिट दिलेली असली तरी तो अहवाल उच्च न्यायालयाने स्वीकारलेला नाही, असे समोर आले होते. यामुळे अजित पवारांविरोधात सिंचन घोटाळ्याप्रकरणी टांगती तलवार कायम आहे. 

मोहित कंबोज हे महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या आहेत का? असा प्रश्न आता सोशल मीडियावर चर्चिला जात आहे.  सोमय्या-कंबोज या दोघांनी कोण कधी जेलमध्ये जाणार हे कसं कळतं, दोघे नेते कोणत्या चौकशी यंत्रणांचे एजंट आहेत? असे सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपस्थित केलेत. हे सवाल उपस्थित करताना कंबोज यांच्या आरोपांकडे लक्ष देऊ नका, ते महाराष्ट्राचे नवे सोमय्या आहेत, अशी कमेंट पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील यांनी दिली

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाकडून (BJP) सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजपा नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपाचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मूख्य व्यवसाय झाला आहे परंतु लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, दहशत, भय आणि भूक या सर्व गोष्टी घेऊन केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे.त्यांना कधी ना कधी त्यांची जागा पाहायला मिळणार आहे. इंग्रजांनी हुकूमशाही कारभार केला त्याला जनता घाबरली नाही आता स्वंतत्र भारतात भाजपा इंग्रजांच्या पावलावर पाऊल टाकत त्याच पद्धतीने कारभार करू पहात पण ते आता शक्य नाही.

महाविकास आघाडीचे सरकार (MVA) पाडतानाही भाजपाकडून याच पद्धतीचा अवलंब केला. भाजपाने कारवाईच्या कितीही धमक्या दिल्या तरी महाविकास आघाडीचे नेते अशा धमक्यांना घाबरणार नाहीत. विरोधी पक्ष या नात्याने आम्ही जनतेचे प्रश्न मांडत आहोत त्यावर सरकारकडे उत्तर नाही म्हणून विरोधकांचा आवाज बंद करण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांच्या नावाने धमक्या देऊन विरोधकांना घाबरवण्याचे राजकारण केले जात आहे. ईडी सरकारची उलटी गिनती सुरु झाली असून जनतेचे प्रश्न आम्ही उपस्थित करत राहू असं पटोले यावेळी म्हणाले.

सत्तेत येताच आमदारांची दादागिरीची वक्तव्ये, अतिवृष्टी काळात शेतकऱ्यांना न झालेली मदत, महाविद्यालय प्रवेशाचा उडालेला गोंधळ, महिलांवरील वाढते अत्याचार, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अशा मुद्द्यांवरुन महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन तापण्याची शक्यता असतानाच भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करुन राज्याच्या राजकारणात चर्चेला नविन विषय दिला. मलिक-देशमुख-राऊतांबरोबर राष्ट्रवादीचा खूप मोठा नेता तुरुंगात जाणार, असा दावा करताना कंबोज यांचा रोख अजित पवार यांच्याकडे होता. सिंचन घोटाळ्याची 'ती' फाईल पुन्हा ओपन होणार असल्याचं सूतोवाच त्यांनी केलं. त्यांच्या ट्विटनंतर अधिवेशनाच्या चर्चेची दिशाच पार बदलून गेली. परंतु यानिमित्ताने मोहित कंबोज यांची जोरदार चर्चा सुरु आहे. ते महाराष्ट्राचे नवे किरीट सोमय्या झाले आहेत का? अशी चर्चा प्रामुख्याने सोशल मीडियावर सुरु आहे.

भाजपचं सरकार सत्तेत आल्यानंतर किरीट सोमय्या फारसे सक्रिय नसतात. पण भारतीय जनता पक्ष जेव्हा जेव्हा विरोधी पक्षात काम करतो तेव्हा तेव्हा सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर किरीट सोमय्या आरोपांची राळ उडवतात. एकेक नेता पकडून त्यांच्यावर भलेमोठे आरोप लावतात. कागदपत्रे असल्याचा दावा करतात. संबंधित यंत्रणेकडे चौकशीची मागणी करतात. महाराष्ट्राला सोमय्यांचा अशा पद्धतीचा परिचय आहे. आता भाजपमधले मोहित कंबोज देखील सोमय्यांच्याच वाटेवर आहेत का? असा प्रश्न अनेकांना पडलाय. कंबोज यांच्या गेल्या ६ महिन्यांच्या कार्यपद्धतीवर नजर टाकली तर बऱ्याच गोष्टी लक्षात येतील. 

 सहा महिन्यांपूर्वी मोहित कंबोज यांनी शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यावर २५ लाख रुपये घेतल्याचा आरोप केला. नंतर मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेवर आरोप करत ठाकरे सरकारला देखील लक्ष्य केलं. पुढे काही दिवसांत नवाब मलिक आणि मोहित कंबोज यांच्यात जोरदार सामना रंगला. त्याला कारण ठरलं होतं, शाहरुख पुत्र आर्यन खानची ड्रग्ज केस... यावेळी एकामागोमाग एक पत्रकार परिषदा घेऊन कंबोज यांनी मलिकांवर आरोपांची राळ उडवली होती. कंबोज यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर मलिकांना पत्रकार परिषद घेऊन ते आरोप कसे खोटे आहेत, हे सांगावं लागायचं. त्यांचं ईडी तसेच एनसीबी कनेक्शन समोर आणण्याचा प्रयत्न मलिक यांनी केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com