प्राथमिक शिक्षण घेत असतांना दसरा ते दिवाळी हा आपल्या शेतकरी शेतमजुरांचा सर्वात मोठा सण आहे असे समजले होते. कारण शेतातून शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या घरात येणाऱ्या हिरवेगार पिकांची सुरवात दशऱ्या पासून सुरू होते.मूग,उडीत, चवळी, काकडी,वायके,हायब्रिड ज्वारी बाजरी,सोयाबीन कापूस अनेक पिकाची घरात रास लागते. त्यामुळेच सर्वांच्या घरी अतिशय आनंदाचे वातावरण निर्माण झालेले असते.म्हणूनच शेतकरी शेतमजूर आनंदाने म्हणतो इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो.बळी राजा म्हणजेेे शेतकरी राजा हे समजायला लागले होते.तेव्हा डोळ्यासमोर गावांतील मोठा शेतकरी ज्यांच्याकडे जास्त शेतजमीन आहे तो शेतकऱ्यांचा आणि शेतमजुरांना बळी राजा वाटत होता. तो सर्व मजुरांना अन्न धान्य तरच देतच होता त्याचं बरोबर सर्व मजुरांना नवीन कपडे घेऊन देत होता.धोतर जोडी,खमीज, कुर्ता,टोपी आणि शेला तर बायकोला लुगडे चोळी,मुलामुलींना नवीन कपडे घेऊन देत असल्यामुळे गांवात त्यांच्या नावांची खूप चर्चा होत होती.सर्वांना आनंद देणारा सदन शेतकरी म्हणजे गरीब शेतमजुरांच्या साठी बळीराजा होता. साधारणपणे ज्यांच्याकडे जास्त नांगर धरायला माणसं लागतात त्यालाच मोठे पाटील देशमुख शेतकरी म्हटले जात होते.ग्रामीण भागातील लोक आणि शहरी भागातील असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर आजही दिवाळी साजरी करतांना बळी राजा कोण होता कोण्या जाती धर्माचा होता यांच्याशी काही घेणे देणे नाही.पण तो शेतकऱ्याचा राजा होता एवढेच त्यांना माहिती आहे.
साधन शेतकरी म्हणणे आजवर टिकले यातच बळीराजाचे सारे गुण आले. बळीराजा हा एक सर्वार्थाने कर्तृत्ववान राजा होऊन गेला. तो प्रजाहितदक्ष, शूर, पराक्रमी तर होताच पण दानशूरही होता. त्याचे राज्य सर्वार्थाने बहुजन हिताय बहुजन सुखाय होते. राज्यात सर्वांची सर्वांगीण प्रगती झाली पाहिजे, अन्यथा बळीराजाची कीर्ती अशी दिगंत झाली नसती.अशा ह्या बळीराजाच्या भटा ब्राम्हणांनी त्यांच्या सोयी नुसार त्याला गोष्टी, कथा पुराणांमध्ये लिहून ठेवल्या होत्या.त्याकाळी लिहणारे हेच!.वाचणारे ही हेच!. आणि सांगणारे ही हेच! होते आणि आज ही आहे.कारण मराठा, ओबीसी इतर मागासवर्गीय आजही त्यांच्या शब्दा बाहेर नाही.त्यातील खरे खोटे तपासणे खूपच अवघड आणि कठीण होते कारण त्यांनी लिहून ठेवलेल्या कथा,गोष्टी शंभर टक्के देवांनी सांगितल्या आहेत असे समजावे लागे. त्या विरोधात बोलणे,विचारणे म्हणजे मोठा अधर्म समजला जात होता. ज्यांना लिहता वाचता येत नाही असे अशिक्षित अज्ञानी लोक रामायण,महाभारत, पांडवप्रताप, राक्षस, दानव दैत्य यांच्या कथा तोंडपाठ लोकांना झणझणीत मसाला घालून सांगतात. हीच मौखिक परंपरेने चालत आलेल्या. कीर्तनात, चातुर्मासात, पारायण कथां सांगितल्या जात होत्या. ही वाडवडिलोपार्जित परंपरा रीतीरिवाज सुरू आहेत.
शेतकरी कोणत्याही जातीचा असो, नेहमीच दया दाखविणारा दानशूर असतो. कारण दानशूरपणा हा बळीराजाचा मोठा गुण होता. त्याने जे मांगेल ते देईन असे म्हटले. वामनाने तीन पावले भूमी मागितली. बळीराजाने होय म्हटले. वामनाने पहिल्या पावलाने स्वर्ग व दुसऱ्या पावलाने पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल ठेवायला जागाच उरली नाही तेव्हा बळीराजाने आपल्या डोक्यावर पाय ठेवायला सांगितला. वामनाने त्याप्रमाणे करून बळीला पाताळात गाडला. अशी गोष्ट, कथा भारतात प्रसिद्ध झाली आहे. परंतु आजच्या विज्ञानयुगात ही कथा वाचतांनाच असत्य वाटते,आणि ऐकतांना ही शंभर टक्के खोटी वाटते.कारण वामन हा बटू ब्राम्हण बनून आला. त्याने विशाल रूप घेऊन एक पाय जमिनीवर दुसरा आकाशात ठेवला सर्वच व्यापले तर तो उभा कुठं होता?. मनुवादी विचारधारेच्या ब्राह्मणांना असे प्रश्न विचारायचे नसतात.ही शिकवण लहानपणा पासून वाड वडिलोपार्जित परंपरा रीतिरिवाजानी दिली आहे.म्हणूनच आजचे उच्चशिक्षित डॉक्टर, सर्व क्षेत्रातील इंजिनिअर, प्राध्यापक, वकील,साहित्यिक, विचारवंत सत्य असत्य यांचा शोध घेण्याची हिंमत करीत नाही. तर असंघटित कष्टकरी अशिक्षित अज्ञानी मजूर,शेतमजूर कामगार विनाअट वाड वडिलोपार्जित परंपरा रीतिरिवाजाची अंमलबजावणी करतात.
बळीराजाने सर्व पृथ्वी आपल्या अंमलाखाली आणली होती. याचा अर्थ त्याची ताकद विलक्षण होती व ती इतर साऱ्या राजांनी मान्य करून त्याचे मांडलिकत्व तरी स्वीकारले किंवा पराभव तरी स्वीकारला. प्रत्यक्षात दोन्ही गोष्टी घडल्या असणार परंतु त्याचा तपशील उपलब्ध नाही व असला तरी फार महत्त्वाचा नाही. ज्यावेळी अशा गोष्टी म्हणजे आपले राज्य दुसऱ्याला देणे घडतात त्यावेळी दहशत, भीती, रक्तपात ह्या गोष्टी अटळ असतात. कुणीही आपली गोष्ट हौसेने वा विनाकारण दुसऱ्याच्या हाती देत नाही व दास्य पत्करत नाही.वर्णव्यवस्था देवांच्या आणि दैत्यांच्या दोघांच्याही राज्यांत होती. रावण दैत्य होता तसा ब्राह्मणही होता. असुर वा दैत्य हे समूहाचे नाव आहे आणि तसेच देव हेही. देवांतही सारे वर्ण होते. देव म्हणजे ब्राह्मणच होता असे बिलकुल नसावे.आर एस एस प्रणित मोदी ब्राम्हण किंवा देव नाही,तसाच राम मंदिरा साठी राम रथ यात्रा काढणारा लालकृष्ण अडवाणी आणि तेव्हाचा उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कल्याण सिंग ब्राह्मण नव्हते त्याच्या हातून जे करून घेण्याचे योजनाबद्ध नियोजन होते ते आर एस एस प्रणित सर संघचालक यांनी करून घेतले म्हणूनच आज अनेक राज्यात व केंद्रात त्यांचे मनुवादी मनुस्मृती विचारांचे राज्य देशावर आहे.
ब्राम्हण हा सर्वच ठिकाणी असतो.देवांकडील ब्राह्मण देवांच्या बाजूने भाजपा विश्व हिंद परिषद,समिती, बजरंग दल शिवसेना इत्यादी, दुसऱ्या बाजूने बहुजन समाज पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, काँग्रेसचे विविध गटाचे पक्ष ( ममता,केजरीवाल,पटनायक) दैत्यांच्या बाजूने उभे राहिले. शुक्राचार्य बळीच्या बाजूने उभे राहिले व वामनाला दान देण्यास त्यांनी प्राणपणाने विरोध केला. झारीतील शुक्राचार्य हा वाक् प्रचार तेव्हापासूनच आला. दान देण्यासाठी ज्या झारीने वामनाच्या हातावर उदक सोडायचे त्या झारीच्या मुखाशीच हा शुक्राचार्य म्हणे जाऊन बसला आणि गंमत अशी की असे दान त्यामुळे बळीराजा देऊ शकला नाही! याचा अर्थ असा की शुक्राचार्यांनी आपले काम चोख केले. असे अडथळे निर्माण केले की बळीराजाला हा व्यवहार करताच येऊ नये. याचा अर्थ स्पष्ट आहे: बळीच्या दैत्य समूहांतील ब्राह्मण बळीराजाच्या बाजूने होते! बळी हा उत्कृष्ट प्रशासकही होता. त्याच्या राज्यात कायदा व सुव्यवस्था उत्तम राबविल्या जात होत्या, इतक्या की शेतकरी कनवटीला सोने बांधून सहज फिरू शकत असत. याचा अर्थ बळीच्या राज्यात शेतकरी धनवान होते असा होतो. धनवंतांचा राजाही धनवानच असणार.
शेतकरी म्हणजे कोण? तर वर्णव्यवस्थेतील वैश्य. बळीच्या काळी शूद्र हा वर्ण होता की नाही याची खात्री पटणे अवघड आहे पण शेतीचे काम वैश्यांकडे असे यात शंका नाही. वैश्यांनी शेती व व्यापार उदीम करावा असे अपेक्षित असे. हे कुणालाही कळेल की उत्तम उत्पादन व त्याची उत्तम रीतीने केलेली विक्री यांतून धनप्राप्ती होते. बळीचा व्यापाराला विशेष पाठिंबा असल्याशिवाय कनवटीला सोने बांधण्याची स्थिती आलेली असू शकत नाही. बळी राजा हा शेतकरी राजा होता, त्यामुळेच सर्व शेतकरी शेतमजूर सुखा समाधानाने एकत्र राहून सर्व व्यवहार करीत होते म्हणूनच ते सर्व आनंदात राहत होते. म्हणूनच दिवाळी हा शेतकऱ्यांचा मोठा सण साजरा केला जात होता.शेतकरी सुखी तरच सर्व सुखी असा अलिखित नियम होता.आज या वाड वडिलोपार्जित परंपरा रीतिरिवाज शैक्षणिक आर्थिक दृष्ट्या नष्ट होतांना दिसत आहेत, मोदी प्रणित अदानी अंबानी चे अच्छे दिन साजरे होत आहेत. बळी राजा शेतकरी राजा,निसर्गाकडे डोळे लावून बसला आणि निसर्गाने ही मोठी हानी करून ठेवली,कोरोना महामारीच्या लॉकडाऊन मुळे सर्वांंचे आर्थिक दिवाळे निघाले असल्यामुळे वाड वडिलोपार्जित परंपरा रीतिरिवाजात दिवाळी कशी साजरी करावी ही सर्वांचीच समस्या आहे.तरी वाड वडिलोपार्जित परंपरा रीतिरिवाज नुसार दिन दिवाळी गाई म्हशी ओवाली साजरी होणारच यात तिळमात्र शंका नाही.सण उत्सव,जत्रा यात्रा उत्स्पुर्तपणे साजरी करण्याची वाड वडिलोपार्जित परंपरा रीतिरिवाजात आहेच. त्याच दिवाळीच्या वाचकांना हार्दिक शुभेच्छा!!!.
सागर रामभाऊ तायडे,
९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.
0 टिप्पण्या