भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये केलेल्या धर्मातंरास ६६ वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी स्मारक समितीमध्ये वाद उफाळला आहे. दिक्षाभूमी परिसरात राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यावरून हा वाद उफाळला असून दिक्षाभूमी परिसर राजकीय मंच झाल्याची टीका करीत भारतीय बौद्ध महासभेने (दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया) येत्या ५ ऑक्टोबर रोजी नागपुरात प्रथमच राष्ट्रीय अधिवेशन बोलावले आहे .या धम्मक्रांति सोहळ्यानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाला देशाच्या काना-कोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी उपासक उपासिकानी उपस्थित रहावे. असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष मा. चंद्रबोधी पाटिल व भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी कार्याध्यक्ष अॅड. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूरच्या दिक्षा भूमिवर केलेली धम्म क्रांति त्या धम्मक्रांति ला आज ६६ वर्षे होत आहे. ज्या धन्नक्रांति मुळे देशामध्ये पून्हा बौध्द धम्माचे धम्मचक्र प्रर्वतनास सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेबांनी दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि त्या सोसायटीच्या माध्यमातून धम्मदिक्षेचा कार्यक्रम नागपूरला घेण्यात आला. भगवान गौतमबुद्धांची आणि डॉ. बाबासाहेबांचे विचार, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे दि बुद्धीस्ट सोसायटी ऑफ इंडियाचा मुख्य उद्देश्य आहे. गेल्या ६६ वर्षा मध्ये देशाच्या काना कोपऱ्यामध्ये विविध धम्म प्रशिक्षण शिविरे श्रामनेर शिबिरे, उपासक उपासिका शिबिरे, अशी २४ प्रकारांच्या शिबिरांचा माध्यमातून बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक निर्माण करून त्यांचा मार्फत हजारो शिलबद्ध कार्यकर्त्यांचे जाळे पसरविलेली आहे.
त्यां माध्यमातून संपूर्ण देशातील वंचित, शोषित, ओबीसी, आदिवासी समाजाला विषमतेच्या अवस्थेतून आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. नागपूरच्या दिक्षा भूमिच्या स्मारक समितीच्या वतिने होत असलेले कार्यक्रम धम्माचे होतांना दिसुन येत नाही. दिक्षा भूमि राजकिय मंच झालेला आहे. त्यामुळे ६६ वर्षांनी बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांति पुन्हा गतिमान करण्या साठी दि. भारतीय बौद्ध महासभा ५ ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनी प्रथम दिक्षाभूमि वरून बिगुल वाजविणार आहे. त्यासाठी दिक्षाभूमि जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विभागाच्या मैदानात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तमान आंबेडकरी जनतेला करण्यात आले आहे.
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास दिक्षभूमी स्मारक समितीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निमंत्रण दिल्यावरून भारतीय बौद्ध महासभेने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनीच स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून ६६ वर्षांपूर्वी नागपूरला १४ आक्टोंबर १९५६ रोजी दिक्षा भूमीवर केलेल्या धम्मक्रांती मुळे देशामध्ये पुन्हा बौध्द धम्माचे धम्मचक्र प्रर्वतनास सुरुवात झाली आहे. त्या धम्मक्रांतीला गौतम बुद्धांचा शांतीच्या करुणेचा, समतेचा, विचाराचा देशामध्ये प्रचार आणि प्रसार होत आहे. भगवान गौतम बुद्धांची आणि डॉ. बाबासाहेबांचे विचार, बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणे हा भारतीय बौद्ध महासभेचा मुख्य उद्देश्य आहे.
गेल्या ६६ वर्षा मध्ये भारतीय बौद्ध महासभा देशभरात विविध धम्म प्रशिक्षण शिविरे श्रामनेर शिबिरे, उपासक उपासिका शिबिरे, अशी २४ प्रकारांच्या शिबिरांचा माध्यमातून बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक निर्माण करून त्यांचा मार्फत हजारो कार्यकर्त्यांचे जाळे पसरविलेली आहे. त्यांचा माध्यमातून संपूर्ण देशातील वंचित, शोषित, ओबीसी, आदिवासी समाजाला विषमतेच्या अवस्थेतून आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. मात्र नागपूरच्या दिक्षाभूमी स्मारक समितीच्यावतीने होत असलेले कार्यक्रम धम्माचे होतांना दिसून येत नसून दिक्षा भूमी राजकिय मंच झालेला आहे असा आरोप भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांनी केला. त्यामुळे ६६ वर्षांनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनी प्रथमच दिक्षाभूमी जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विभागाच्या मैदानात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर व राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटिल यांनी केले
0 टिप्पण्या