आंबेडकरी चळवळीच्या लोकांनी आता एकत्र येणे गरजेचे आहे .धंदेवाईकांनी चळवळीला घेरले आहे. परंतु मला विश्वास वाटतो की आंबेडकरी चळवळीला येत्या काही वर्षात चांगले दिवस येतील, असा विश्वास रिपब्लिकन सेनेचे सरसेनानि आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केला. संविधान दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर बहुजन रिपब्लिकन विकास आघाडीच्या वतीने संविधान दिन सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात आंबेडकरी चळवळीतील अनेक पक्षाचे गट संघटना सहभागी झाले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आनंदराज आंबेडकर बोलत होते. यावेळी विद्याभूषण डॉक्टर प्रशांत पगारे, खरात गटाचे राजाराम खरात, जय भीम आर्मीचे संस्थापक अध्यक्ष नितीन भाऊ मोरे, आंबेडकर मोमी राष्ट्रीय अध्यक्ष रवी भाऊ गरुड, भीमसेनेचे प्रमुख गोपी मोरे ,शांतू डोळस आदी उपस्थित होते.
आनंदराज आंबेडकर पुढेे म्हणाले की सन 2014 नंतर देशातील जनतेला संविधानाचे महत्त्व अधिक पटलेला आहे .सर्व भारतीयांनी संविधानावरती विश्वास ठेवला पाहिजे ,काहीजण हिंदू राष्ट्र बनवण्याची भाषा करीत आहेत, परंतु हा गुन्हा असून त्याबाबतीत ते गुन्हे का नोंद केले जात नाहीत ,हे गंभीर बाब असल्याचं निदर्शनास आणून दिलं. सध्याची परिस्थिती लक्षात घेता गाफील राहून चालणार नाही असेही स्पष्ट मत आनंदराज यांनी व्यक्त केले..
देशावर अनेक संकटे आली ,राजीव गांधी हत्या, तामिळ प्रश्न , खलिस्तान दहा वर्ष आंदोलन, सैनिकांचे बंड आधी संकट आली पण ती सगळी थोपवून टाकण्यात भारतीय संविधानाची महत्त्वाची भूमिका होती, त्यामुळे हे संविधान अधिकच मजबूत असल्याचं त्यांनी पटवून दिले. जगातील सर्वात बलाढ्य म्हणून ओळखला जाणारा रशिया एका रात्रीत पत्त्याच्या पानासारखा कोसळून गेला, परंतु भारतात असं कदापी घडू शकले नाही .भारतीय राज्यघटना जरी टिळक गांधी यांनी दिली असती तरी आम्ही त्याचा सन्मान केला असता, कारण बाबासाहेब म्हणतात मी प्रथम भारतीय आणि शेवटी भारतीयच आहे ,संविधानाच्या प्रखर अंमलबजावणीसाठी आंबेडकरी चळवळीत चर्चा केली पाहिजे .यावेळी तानसेन ननावरे यांनी फुटी मागचा इतिहास सांगून यामागे नेमकं काय राजकारण झालं त्याची उपस्थितांना आठवण करून दिली .
जय भीम आर्मीचे नितीन मोरे म्हणाले की, शिवाजी पार्कवर महापरिनिर्वाण देशभरातून भीमसैनिक लाखोच्या संख्येने चैत्यभूमीवर येत असतात ,यावेळी विविध गटांचे स्टेज पाहून तिथूनच गटात राजकारण निर्माण होते म्हणून या महापरिनिर्वाण दिन एकच अभिवादनाचा स्टेज असावा, असे आव्हान त्यांनी आंबेडकरी चळवळी केले .
संविधान वाचवणे हे केवळ बौद्धांचीच काम आहे का? इतरांचे नाही का? असा सवाल रवी गरुड यांनी व्यक्त केला. आंबेडकरी चळवळी समोर मोठी आव्हाने उभे राहिले आहेत त्यामुळे आता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचं राजाराम खरात यांनी सांगितले. गायरान जमिनीच्या प्रश्नांवरती एका आंदोलनाची गरज असल्यासही प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी भीम गीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित आणि प्रचंड दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार तानाजी कांबळे यांनी केला रिपब्लिकन सेनेचे मनोज गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला.
0 टिप्पण्या