Top Post Ad

धर्मांतराला जबाबदार कोण ?

केरळमधील नाडर धर्मांतराची कथा ! 

         केरळमध्ये स्त्रियांना ‘उरोज कर’ द्यावा लागत असे. हा कर ठरविणारे उच्चजातीय पुरुष वेळप्रसंगी मर्यादाभंग करीत असत , हे वेगळ्याने सांगण्याची गरज नसावी. पाश्चात्य मूल्यव्यवस्था , वेशभूषा - राहणीमान यांच्याशी परिचय होण्यापूर्वी हे खपवून घेतले जात असे. 
      विशेषत: इंग्रजांनी शाळा चालू केल्यावर हा प्रश्न किचकट झाला. केरळातील नाडर समाज म्हणजे आपल्या कोंकणातील भंडारी समाजासारखा , ताडी- माडीपासून दारू बनवणारा ! ही नाडर समाजाने बनवलेली दारू ब्रिटिशांना खूप आवडायची. तिला ते ‘नेटिव जीन’ म्हणत असत. दारूचे शौकिन सांगतात की, जीन म्हणजे कडक दारू ! तर ही नेटिव जीन विकून केरळच्या भंडाऱ्यांकडे म्हणजे नाडर समाजाकडे पैसा आला. हाती पैसा आला की माणूस आपल्या मुलाबाळांना शिकवतो. नाडर समाजानेही तेच केले. 
      मग नाडर समाजाची मुले ब्रिटिशांच्या शैक्षणिक धोरणानुसार शाळेत जाऊ लागले , मुलीही शाळेत जाऊ लागल्या. शाळेत जाताना अर्थातच गणवेश वा किमान अंग झाकणारे कपडे घालून जावे लागे. मुली व मुले दोघेही शाळेत नाव नोंदवायचे. परंतु मुलगी तरूण झाली की शाळा सोडून देई, कारण उरोज उघडे ठेवून शाळेत जाताना तिला स्त्रीसुलभ लज्जा उत्पन्न होई. 

       सबब , नाडर समाजाच्या जात पंचायतीने नंबुद्री ब्राह्मणांना विनंती केली की, कृपया आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलींना उरोज झाकणारे कपडे घालण्याची परवानगी द्या ! नाडर समाज स्वखर्चाने आपल्या मुलींना कपडे घेणार होता. त्यांनी नंबुद्री ब्राह्मणांकडे कपड्याचा खर्च मागितला नव्हता ! परंतु ‘शूद्र’ नाडर समाजाकडे नेटिव जीन विकून पैसा आला होता. हे मनुस्मृतीच्या विरोधी कृत्य होते. त्यामुळे काही सनातनी नंबुद्री ब्राह्मणांना नाडर समाजाबद्दल  — म्हणजे आपल्या कोंकणांतील भंडारी सदृश्य समाजाबद्दल — खूप राग वाटत होता. दुसरे म्हणजे या ‘शूद्र’ नाडर समाजाची बालके आता शाळेत जात होती ! शाळेत जाणे हे शूद्र नाडरांचे काम नव्हे ! त्यामुळे या रागात भर पडली ! अशातच हे नाडर आता आपल्या मुलींना कपडे घालून शाळेत पाठवणार म्हणतात. झाले. सनातनी नंबुद्री ब्राह्मणांच्या संतापाचा तीळपापड झाला. म्हणून धार्मिक कारणास्तव या नंबुद्री ब्राह्मणांनी, “नाडर जात पंचायतीची ‘शाळकरी मुलींना कपडे घालू देण्याची विनंती’ अमान्य केली” ! त्यामुळे धर्मद्रोह होईल म्हणे ! सनातन्यांचा ‘धर्मद्रोह’ असाच असतो. 

     परंतु काही नाडर हट्टाला पेटले. त्यांनी कपडे घालून मुलींना शाळेत पाठवले. काही सनातन्यांनी हा ‘धर्मद्रोह’ अजिबात आवडला नाही. हा ‘धर्मद्रोह’ टाळण्यासाठी त्यांनी या तरुण मुलींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण केरळमध्ये वातावरण तंग झाले ! 
         ख्रिश्चन मिशनरी हा सर्व प्रकार बघत होते. ते म्हणाले की , ‘आमच्या धर्मात या. आम्ही तुमच्या मुलींना कपडे घालून शाळेत जाण्याची परवानगी देतो.’ यांवर विचार करण्यासाठी नाडर समाजाची जातपंचायत बसली. जातपंचायत केवळ पुरुषांची असते , हे लक्षात घ्या ! 
     नाडर जात पंचायतीचे रात्रभर चर्चा चालली. निर्णय होईना. पहाटेची सुर्यकिरणे दिसू लागली. ही रात्रभर चाललेली चर्चा एक जख्ख वृद्ध महिला लांबून कान देऊन ऐकत होती. दिवस उजाडत आला तरी चर्चेत काही निष्पन्न होईना म्हणून ती काठीच्या आधाराने लटपटत उभी राहीली व म्हणाली , ‘तुमची चर्चा संपायची तेव्हा संपू देत. मी हे असे उघड्या बोडक्या देहाने आयुष्य काढले आहे. परंतु माझ्या नातींनी असे आयुष्य काढू नये, असे मला वाटते. म्हणून मी ख्रिश्चन धर्मात जाऊन धर्मांतर करीत आहे.’ या वृद्ध महिलेच्या निर्णायक पवित्र्याने वातावरण बदलले. पुढे आलेल्या ख्रिश्चन धर्मांतरीतांच्या लाटेचा हा आरंभबिंदू होता ! 

       या समूहातील समस्त सभ्य स्त्री- पुरुष हो ! केवळ अंगात चोळी घालायला मिळावी , यांसाठी केरळमधील नाडर समाजाची वृद्ध महिला पहिल्यांदा ख्रिश्चन झाली ! नंतर नाडर समाजासह अनेक मागास जातींनी तिचे अनुकरण केले ! 
        मला सांगा , नाडर समाजाच्या या धर्मांतराला जबाबदार कोण ? ज्या धर्माला व धर्मगुरुंना आपल्या धर्माच्या महिलांनी चोळीदेखील घालू नये , असे वाटत होते तो धर्म व ते धर्मगुरु कोणत्या संस्कृतीच्या गावगप्पा मारीत आहेत ?धर्मांतराला जिम्मेदार कौन ?

        मग सांगा , नाडर समाजाच्या या धर्मांतराला जबाबदार कोण ? ज्या धर्माला व धर्मगुरुंना आपल्या धर्माच्या महिलांनी चोळीदेखील घालू नये , असे वाटत होते तो धर्म व ते धर्मगुरु कोणत्या संस्कृतीच्या गावगप्पा मारीत आहेत ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com