Top Post Ad

ह्यांनी त्यांच्या संस्था खोके घेऊन उभ्या केल्या......


उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. फुले-आंबेडकरांनी भीक मागितली असे वक्तव्य करताना चंद्रकांतदादांनी गोळवलकर, हेडगेवार यांचे नाव घेतले नाही. याचाच अर्थ गोळवलकर आणि हेडगेवारांनी खोके घेऊन स्वतःच्या संस्था उभ्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असा खोचक टोला लगावत प्रकाश आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. 
  फुले, आंबेडकरांनी लोकांकडून पैसे घेऊन शाळा, शिक्षणसंस्था उभ्या केल्या, असे चंद्रकांतदादा म्हणाले. पण असे वक्तव्य करताना त्यांनी गोळवलकर आणि हेडगेवारांचे नाव घेतले नाही. याचाच अर्थ गोळवलकर आणि हेडगेवारांनी लोकांकडून पैसे न घेता आजच्या शब्दात सांगायचे झाले तर, खोक्यांनी पैसे घेतले आणि स्वतःच्या संस्था उभ्या केल्याची कबुली दिली आहे, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.

 या फुले शाहु आंबेडकरांच्या राज्यात वारंवार महापुरुषांचा अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून वारंवार महाराष्ट्राला अपमानित करण्याचे काम यांचे चालू आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांनी भीक मागितली असे विधान केले मात्र त्यांना ठाऊक नसेल १८६९ साली टाटा उद्योग समूहाचा वार्षिक उलाढालीचा आकडा हा २० हजार होता. तर पूना कमर्शियल इन कॉन्ट्रॅक्टींग या कंपनीचा वार्षिक उलाढालीचा आकडा होता २१ हजार रुपये आणि या कंपनीचे सर्वेसर्वा होते महात्मा ज्योतिबा फुले.महात्मा फुले स्वत: उद्योगपती होते मोठमोठी कामे ते करत असत. आणि त्यातून मिळालेल्या पैश्याने त्यांनी समाज सुधारणेचे काम केले. लोकमान्य टिळकांना एका खटल्यातून सोडवण्यासाठी रूपये १०,००० इतकी रक्कम महात्मा फुले यांनी दिली होती  कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोर शिकविल आणि या सनातन्यांच्या छाताडावर थयाथया नाचविल कर्मवीरांनी तर शिक्षणाच्या कामासाठी स्वताच्या पत्नीचे दागिने विकले पण मुलांना शिकवीले - माजी मंत्री छगन भूजबळ


डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी अभिनेते दिलीप कुमार यांची ऐतहासिक भेट !
स्थळ - अशोक हॉटेल - औरंगाबाद.
घटना क्रं.1.
दिलीपकुमार -   आपण बांधत असलेल्या मिलिंद कॉलेजसाठी मी आपणास काही रक्कम देणगी म्हणून देऊ इच्छितो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर -  तुमच्या सिनेमा सृष्टीतील लोकांना चारित्र्य नाही. त्यामुळे मी तुमची देणगी स्वीकारून माझ्या विध्यार्थ्यांना तुमचा आदर्श देऊ इच्छित नाही. त्यामुळे मी तुमची देणगी स्वीकारू शकत नाही.
खास बाब -       माईसाहेब आणी बाळू कबीर ( सविता कबीरांचा भाऊ ) या दोघांचीही इच्छा होती की, डॉ. बाबासाहेबांनी दिलीप कुमारची देणगी स्वीकारायला हवी होती.
बाळू कबीर -        आपण दिलीप कुमार यांनी देऊ केलेली रक्कम स्विकारायला पाहिजे होती.
डॉ. बाबासाहेब -   तू मूर्ख आहेस, मी या देणगीसाठी माझ्या तत्वासोबत तडजोड करू शकत नाही मग भले ही माझ कॉलेज बंद पडलं तरी चालेल.
संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासात.   - डॉ. सविता आंबेडकर.

घटना क्रं.2.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणी पट्ठे बापूराव.
भेटीची तारीख -      10 सप्टेंबर 1927, मुबंई.
पट्ठे बापूराव -        बॅरिस्टर, बाबासाहेब मी तुह्माला पूर्ण चार खेळाचे पैसे मदत म्हणून देण्यास आलो आहे. आपण माझ्या मदतीचा स्वीकार करावा.
डॉ. बाबासाहेब -       कलेच्या नावाखाली बायका नाचविणाऱ्या या माणसाचा पैसा माझ्या उदात्त कार्यास नको असे बोलून त्यांना जाण्यास सांगतात हिरमुसलेले पठ्ठे बापूराव निघून जातात.

खास बाब -       अत्यन्त अडचणीचे वेळी चालून आलेली मदत नाकारल्यामुळे सोबत असलेले कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरावर नाराज होतात व तसे बोलून दाखवितात. डॉ बाबासाहे आपल्या कार्यकर्त्यावर खवळून उठतात त्यांचा चेहरा रागाने लालबुंद होतो नजरेत आग उतरून येते संतप्त डॉ. बाबासाहेब घोगऱ्या आवाजात म्हणतात -  तुम्हा लोकांना लाज नाही वाटत? नितिमत्ता व स्वाभिमान नावाची चीज तुमच्यात आहे की नाही? महाराच्या बायका नाचवून हा बाबण पैसे कमवतो व तुह्मी मला असे पैसे घेण्यास सांगता?  " माझे सत्याग्रही उपासी झोपले तरी बेहत्तर मी असा पैसा घेणार नाही. "


देवगोंडा ज्योतीगोंडा पाटील नावाचा त्यांचा आज्जा. मोठ्ठा घरंदाज आसामी. त्या काळात तो डोक्याला मोठ्ठा रुमाली फटका बांधीत असे म्हणून लोक त्याला रुमाल गोंडा पाटील म्हणत. 

एकदा न्यायनिवाड्याकरीता नांदणी मठाचे मठाधिपती असणाऱ्या या देवगोंडा पाटलांना बोलवण्यात आले. न्यायनिवाडा झाला. समेटाची कागदपत्रे तयार झाली. त्या वेळी वडिलधाऱ्या माणसाने देवगोंडा पाटलास सही कराय सांगितले. देवगोंडा मोठा माणूस पण निरक्षर. पाटलाला नामुष्की वाटली. तो घरी आला. 

मोठा मुलगा पायगोंडा शेतात काम करत होता. त्याला शेती बंद कराय सांगितलं व आष्ट्याच्या शाळेत शिकायला पाठवलं. शिकायची ठिणगी पेटली ती इथ. 

पायगोंडा जैन चतुर्थ समाजातून सातवी पास होणारा सातारा जिल्ह्यातला पहिला माणूस ठरला. तो महसुली खात्यात नोकरीला लागला. नोकरीनिमित्त पायगोंडा कराडात राहू लागला. आपल्या पोरांबरोबर भाड्याच्या ब्राह्मणाच्या घरात तो मांगाच्या पोरांना शिकवत असे. पायगोंडा सधन होता. ऐतवड्यात आंब्याची बाग काढली होती. 

त्याला चार मुलं आणि दोन मुली झाल्या. तात्यासाहेब कोल्हापूर संस्थानात वकिल झाला. बळवंतराव मेट्रिक होवून अबकारी खात्यात लागला. बंडेद्र पोलीस खात्यात लागला. आणि चौथा सधन पाटील “भाऊराव” होता. 

मनात आणलं असतं बॅरिस्टर होवून लाखांची फी जमवू शकला असता. वडिलकिच्या पुण्याईवर जाहगिरदार झाला असता. शेती करत गावगाडा हाकत बसला असता. बायकोला सोन्याने मढवू शकत असता. 

पण भाऊराव “कर्मवीर” झाला...
शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील आणी धनाढ्य शेठ -

शेठ -    जर तुह्मी कॉलेजला शिवाजी महाराज यांच्या नावाच्या जागी माझे नाव देणार असाल तर मी हवी तेवढी देणगी देतो.
भाऊराव पाटील -       एक वेळ बापाचे नाव बदलेन पण कॉलेजला दिलेले शिवाजी महाराजांचे नाव बदलणार नाही.

याला म्हणतात -  स्वाभिमान! 

वेळ पडली म्हणून स्वतःच्या पाटल्या मोडून पुस्तके व रसद पुरवली रमाईंनी पण बहुजनांच्या शिक्षणाला विरजण लागू दिले नाही हॉस्टेल आणि शाळा चालूच ठेवली ,नवऱ्याने संविधाना सारखी शिदोरी ह्या स्वतंत्र भारताला हाताच्या ओंजळीने बहाल केली ,आयुष्यभर सुटात आणि बुटात राहिलेल्या स्वराजबिंड निर्माण करून जगलेल्या बाबासाहेबांचा इतिहास  तपासून बघा यांचे बाप आजोबा जेव्हा लंगोटात गाव भर उंडरत हुते तेव्हा बाबासाहेब थ्री पीस सूट मध्ये असायचे.

रयत शिक्षणसंस्थे मध्ये जेव्हा ग्वालियरचे राजघराणे आले कर्मवीरांची शिक्षण संस्था पाहण्यास, त्यातील एका बाईने भाऊरावांच्या पत्नी लष्मीबाईना विचारले, तुम्हाला किती मुलं आहेत तर लक्ष्मीबाईंचे उत्तर होते १८८ आणि त्या राजघराण्यातील बाईला जे कळायचं ते कळले, तिची श्रीमंती लक्ष्मीबाईंच्या समोर कवडीमोल झाली, लोकांच्या लेकरांना स्वतःचा लेकराप्रमाणे उदरात घेऊन वाढवून शिक्षण दिले कर्मवीर भाऊराव पाटलांनी ,अंगावर मणभर सोन मोडून रयत सारखी शिक्षण संस्था उभा केली, आणि  ह्या थोर कार्याची जाण या संघोट्या भीकाऱ्यांना कशी कळेल.

फुले कुटुंबाची श्रीमंती ही जगापासून कधीच लपू  शकली नाही त्याकाळात महात्मा फुलेंच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल गोदरेजपेक्षा एक हजाराने अधिक होती, महात्मा फुल्यांनी जर व्यवसायच केला असता तर त्यांच्यावर चिखलफेक करणाऱे आज अजून बैलगाडीच्या चाकाला वंगनच लावत बसले असते, एक जवाबदारी म्हणून महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीमाई फुलेंनी, एवढया मोठंया शिक्षणांची दारे सर्वांकरिता खुली केली,  आयुष्यभर मंदिराच्या खारीक खोबरे खाणारा देवाचा दक्षिणा पेटीत पडलेलं दान स्वतःच्या किश्यात घालून जगणारे ,तेराव्याचे जेवण खाण्या करिता स्मशानात लोकांच्या मड्याची वाट बघणारे ,ह्याना युगपुरुषांचे विचार काय कळणार, 
सचिन आठवले,  सोलापूर    9545818191


ना. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक अयोग्य व निषेधार्ह आहे. पण या शाईफेकीची बातमी टिपणा-या पत्रकाराला अटक करण्याची मागणी त्याहून अधिक निषेधार्ह आहे. सदर पत्रकाराच्या अटकेसाठी आपण उपोषणास बसणार असल्याची धमकी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी दिली आहे. पाटील यांच्या या लोकशाही विरोधी कृत्याचा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र शब्दांत निषेध करीत आहे. पाटील यांनी आपले विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी. त्यांनी तसे न केल्यास लोकशाही मार्गाने आम्हाला पुढील आंदोलनाचा विचार करावा लागेल.-    

नरेंद्र विश्वनाथराव वाबळे      अध्यक्ष -मुंबई मराठी पत्रकार संघ 

संदीप सदानंद चव्हाण       कार्यवाह- मुंबई मराठी पत्रकार संघ


महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा सुरू केल्याचं बेताल वक्तव्य उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील याने केले आहे. चंद्रकांत पाटील याने या वक्तव्यातून त्याची बौधिक दिवाळखोरीच, आपल्या अडानचोटपणाचं दर्शन घडवले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याने महापुरुषांबद्दल त्यांचा असलेला अनादर, हिन भावना समोर आलेली आहे, अशी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रच्या मंत्रिमंडळात असणे योग्य नाही. ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने दि.10 डिसेंबर रोजी गंगाखेड तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी करण्यात आली. तमाम भारतीयांमध्ये चंद्रकांत पाटील विरोधात असंतोष पसरला आहे. तात्काळ त्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी अशी मागणी दिलेल्या निवेदनामध्ये करण्यात आली आहे. तात्काळ हा निर्णय न झाल्यास संघटनेच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष विकास रोडे, रोहिदास लांडगे, संतोष हानवते, अविनाश जगतकर, अनिकेत साबणे,अशोक व्हावळे, नरेंद्र भालेराव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


चिराग नगर, घाटकोपर  पोलीस ठाणे मध्ये चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात कायदेशीर जवाब नोंद झाला आहे आता त्यांच्या विरोधात FIR होण्यापासुन कोणीही थांबवू शकत नाही.adv नितीन सातपुते, adv दीपक जगदेव इतर adv यांनी मजबूत बाजू मांडली तसेंच सुनील थोरात, सुनील गायकवाड, शशांक कांबळे, विजय कांबळे,उपासक गायकवाड, सुशीला कापुरे, सिद्दाम्मा ताई, मनीषा उबाळे ताई, समाधान सभाकर,विठ्ठल जाधव,उत्तम गायकवाड,संदीप साळवे, अमित तांबे, दशरथ कांबळे, राजू यल्लाळ,  राकेश बनसोडे, प्रेम कांबळे, संजय यल्लाळ, प्रकाश भालेराव, सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.- अशोक कांबळे- राष्ट्रीय महासचिव भीम आर्मी


शिवरायांचा वंशज उदयन भोसले tv वर रडत होते.कोश्यारी ने शिवरायांचा अपमान केला म्हणून.
करोडो रूपयांची संपत्ती आहे.लाखो लोक त्यांच्या पाठीशी असतात. वंशज म्हणून सन्मान आहे.
खासदार आहेत. महाराष्ट्रातील प्रचंड ताकद असलेल्या मराठा समाजातून ते येतात. जातीय दबदबा देखील आहे. शेकडो आमदार या समाजातील महाराष्ट्रावर राज करतात.जातीय वर्चस्व राज्यात आहे. राजकीय,सामाजिक, आर्थिक सर्वच पाठबळ आहे. इतके पावरफुल असताना देखील ते हतबल होऊन रडत होते.
इथे यापैकी काहीच पाठबळ नाही.सामान्य युवक आहे.आणी तो थेट चंद्रकांत पाटलाला भिडतो.
धन्य आहेत ते बाबासाहेब !
ज्यांनी इतके बळ शक्तीविहीन समाजात भरलं.इतकी आग समाजात निर्माण केली आहे कि कुठलही पाठबळ नसलेल्या या समाजातील लेकरं स्वाभिमाना साठी कोणाचीही गचांडी धरू शकतात ! मग समोरचा मंत्री असो कि शंकराचार्य.

 


 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com