महात्मा ज्योतिराव फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील ही आमचं आदर्श स्थान आहे. पण त्यांच्याबद्दल बोलणारा बेजबाबदार माणूस पाहिला नाही. मी स्वत: विधानसभेच्या विधानमंडळात 55 वर्ष पाहिली. अनेक राज्यपाल पाहिले. पण यावेळी असा माणूस राज्यपाल म्हणून आला आहे, तो सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्यावर वादग्रस्त विधान करत आहे. त्यांना लाज वाटली पाहिजे, महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षण, शाळा असो यासंबंधी कार्य केले आहे. महात्मा फुले यांचं नाव देशभरात आदराने घेतलं जात. पण, अशा व्यक्तींने ज्ञानदानाचे कार्य केले त्यांनी त्यांची टिंगलटवाळी केली. अशा माणसाला राज्यपालपदी राहण्याची आवश्यकता नाही, 'या मोर्च्याच्या माध्यमातून केंद्र सरकारला विनंती करतो की, या राज्यपालांची लवकरात लवकर हकालपट्टी करा. आज लोक शांततेनं आहे. ही हकालपट्टी वेळीच झाली नाहीतर हा महाराष्ट्र रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजप नेत्यांचा जोरदार समाचार घेतला आहे. 'बऱ्याच वर्षांनंतर एवढा मोठा मोर्चा महाराष्ट्राने आणि देशाने पाहिला असेल. ज्यावेळी या मोर्चाची घोषणा केली तेव्हा काही जणांनी तुम्ही या मोर्चात चालणार का, असं मला विचारलं. मी तेव्हाच सांगितलं होतं की, केवळ मोर्चात चालणार नाही तर मी आणि लाखो महाराष्ट्रपेमी हे महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालणार आहोत. हे चालणं प्रतिकात्मक आहे. आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी आपल्याला डिवचलं, त्यांच्या छाताडावर चालण्याची हीच ती वेळ आहे,' 'आज सर्व पक्ष एकवटले आहेत, फक्त महाराष्ट्रद्रोही वेगळे आहेत. राज्यपाल हटवा, ही आमची मागणी आहे. खरंतर भगतसिंह कोश्यारी यांना मी आता राज्यपाल मानतच नाही. त्या खुर्चीचा मी सन्मान करतो. मात्र तिथे कोणीही बसावं आणि कोणालाही टपल्या माराव्यात, हे सहन केलं जाणार नाही. केंद्रामध्ये बसणाऱ्यांच्या घरी काम करणाऱ्या माणसाला कुठेतरी पाठवून द्यायचं, हे चालणार नाही. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे दूत असतात. मात्र ते छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, महात्मा फुलेंबद्दल, सावित्री फुलेंबद्दल अवमानकारक बोलत आहेत,' अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, संयुक्त महाराष्ट्रानंतरचा हा सर्वात मोठा लढा आहे. आता बेळगाव महाराष्ट्रात आणल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असा निश्चयही यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्राच्या दैवतांचा अपमान करण्याचे काम राज भवनातून भगतसिंह कोश्यारी यांच्यापासून सुरु झाले आणि नंतर भाजपाच्या नेत्यांनी सातत्याने तेच काम सुरु ठेवले. भाजपा नेते सातत्याने महापुरुषांचा अपमान करत आहेत यावर जनतेत प्रचंड चीड आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले यांनी शिक्षण संस्थांसाठी भीक मागितली असे उद्गार काढून महापुरुषांच्या अपमानाचा कळसच गाठला. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून सीमावादाच्या प्रश्नाने डोके वर काढले असून सीमेवरची गावं शेजारच्या राज्यात जाण्याची मागणी करत आहेत. महापुरुषांचा अपमान, सीमावाद या प्रश्नावर महाराष्ट्रद्र्योह्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा हा मोर्चा आहे. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र स्थापनेचा मंगल कलश आणला तेव्हापासून महाराष्ट्र एकसंध रहावा यासाठी प्रयत्न करण्यात आले पण ईडी सरकार मात्र महाराष्ट्राचे तुकडे करू पहात असून आम्ही ते कदापी होऊ देणार नाही, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.
बहुचर्चेत महाआघाडीचा हल्लाबोल मोर्चा शांततेत पार पडला. शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस समाजवादी पक्ष, शेकाप ,सीपीआय इत्यादी मित्र पक्षांच्या आघाडीचा महापुरुषांच्या अवमानाच्या विरोधात मोठा मोर्चा यशस्वी झाला .सभेचे सूत्रसंचालन विनायक राऊत यांच्याकडे होते. अनिल देसाई ,मिलिंद नार्वेकर ,चंद्रकांत खैरे अंबादास दानवे यांच्यासह फायरब्रॅॅन्ड नेत्या सुषमा अंधारेही विचारपीठावर विराजमान होत्या,
0 टिप्पण्या