भारतातील जगप्रसिध्द आर्ट गॅलरी म्हणजे “जहागिर आर्ट गॅलरी काळाघोडा" मुंबईचे नाव आहे, या ठिकाणी एकदातरी आपल्या कलाकृतीचे प्रदर्शन व्हावे असे अनेक नामवंत कलाकारांचे ध्येय असते. या गॅलरीविषयी लिहावे म्हणजे अडाणीपणाचे ठरेल अर्थात ते सर्वज्ञात आहे. मुंबईचे वैभवाची जी ठिकाणे आहेत त्यातील एक अग्रक्रमाने उल्लेख करावा असे नाव म्हणजे ही आर्टगॅलरी आहे.
दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी संध्याकाळी मी व सुबोध शाक्यरत्न या गॅलरीत गेलो. ते म्हणजे श्रीमती मेश्राम या मंत्रालयातील प्रसिद्धी व माहिती विभागातील मैत्रीणीने प्रसिद्ध फोटोग्राफर वैखारी यावालीकर यांचे फोटोचित्राचे प्रदर्शन पाहण्याची शिफारस केली. कलेविषयी कुतुहल असल्यामुळे आम्ही तडक गॅलरी गाठली. सुरवातीला आत गेल्यावर डाव्या हाताला गेलो तर त्या ठिकाणी केरळची नऊ एकत्र चित्रकारांची वेगवेगळ्या शैलींची चित्र होती. सर्व चित्रकारांना त्यांच्या चित्रांविषयी संवाद साधला असता त्यांनी त्यांची थिम सांगितली.
दुसऱ्या हॉलमध्ये सत्यापात या प्रसिद्ध कलावंतांचे चित्रांचे प्रदर्शन बघितले सत्यापालचा चेहरा व वेशभुषाच सांगत होती की कलावंत काय ताकदिचा असेल तसेच झाले त्यांनी अतिशय मनमोकळेपणाने आपल्या कलेविषयी सांगितले जगभर फिरलेला हा माणूस भारतातील आदीवासी जमातींमध्ये जाऊन राहिलेला आहे. अगदी राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड, पं. बंगाल, बिहार, त्रिपुरा, मेघालया विषेशत: बस्तर छत्तीसगड या ठिकाणी जाऊन आदिवासी जीवनाचे कलेचे अंतरंग समजून चित्रांची चिम उभी केलेली आहे. गेल्या चार दशकापासुनचा त्यांचा हा प्रवास अहोरात्र सुरू आहे. त्यांचे २२ सोलो प्रदर्शन आणि १५० हून अधिक ग्रुप शोज भारतात व जगभरात झालेले हा आहेत. केरला ललीतकला अकॅडमीचे अध्यक्ष व सेक्रेटरी राहून चुकलो आहेत. तर जवळ जवळ १७ पुस्तके त्यांच्या नावे आहेत. डॉ. अजय शेखर, डॉ. सी. एस. जयराम, डॉ. सी. बी. सुधाकरण, डॉ. अशरफी एस. भगत अशा मान्यवर कलासमिक्षकांनी त्यांचविषयी लिहले आहे.
खरंतर वेळेअभावी आम्हाला सत्यापाल यांचा निरोप घ्यावा लागला. तर पुढची टेरेस गॅलरीवर द फ्रेम लाईफ इन लाईट अँड शॅडो फोटोग्राफी प्रदर्शनाला भेट दिली. खरंतर एक जिवंतपणा या फोटोमध्ये दिसत होता. मला वाटलं कोणीतरी प्रौढ स्त्री फोटोग्राफर असेल परंतु तसे काही नव्हते, चौकशी केली तेव्हा एक चुणचुणीत मुलगी म्हणाली मीच आहे.. तिच्याकडे बघून मी आवाकच झालो, एवढया छोटयाश्या वयात तिने हे दाखवलेल कलेतील कसब म्हणजे आश्चर्यकारकच म्हणावे लागेल. प्रत्येक फोटोचा जिवंतपणा या प्रदर्शनाचे वैशिष्टय होते. अगदी शेतकरी निरागस बाळ आई, बिडी ओढणारा कामगार, हताश झालेला कामगार तिने प्रत्येक फोटोत महाराष्ट्राची परिस्थिती चित्रीत केलेली दिसते. महिला असेल हे सर्व या फोटोत त्यांचे चेहऱ्यावरील सुरकुत्या स्पष्टपणे चित्रीत होत्या म्हणजे प्रचंड जिनियसपणा त्या चित्रांत अवतरतो खरे तर ही सर्व चित्र ही स्पष्टपणे सांगत असतात. लोकांनी या कलावंताच्या गॅलरीला भेट देऊन आस्वाद घ्यावा अशी भावना व्यक्त करत आम्ही गॅलरी सोडली.
98208 55101
0 टिप्पण्या