... राज्यात सत्ता बदल होताच आपले पुनर्वसन होईल अपेक्षेत असलेल्या व सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असलेल्या अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉक्टर रेशमी शुक्ला यांना पुण्यातील महानगर दंड अधिकारी न्यायालयाने चपराक दिली आहे मुंबई पोलिसांकडे तसेच सायबर पोलिसांकडे दाखल असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात शासनाने परवानगी नाकारल्याने शुक्ल यांना दिलासा मिळाला पण पुणे पोलिसात दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत मात्र न्यायालयानेच पुन्हा तपासाचे आदेश दिल्याने शुक्ला यांची पंचायत झाली आहे अर्थात उच्च न्यायालयात त्यांना दाद मागता येईल पण राज्यात परत येण्याच्या मनसुब्याना त्यांना तूर्तास आवर घालावा लागणार आहे
शुक्ला या राज्य पोलीस दलातील 1988 च्या तुकड्यातील सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत विद्यमान पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्यापेक्षाही त्या वरिष्ठ असून त्या पुन्हा राज्यात आल्या तर राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक व मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी त्यांची नियुक्ती होऊ शकते 2019 मध्ये सत्ता बदल झाला नसता तर कदाचित यापूर्वीच मुंबईच्या पोलीस आयुक्त झाल्या असत्या असे पोलीस दलात बोलले जाते आताही त्याच दिशेने त्यांची वाटचाल सुरू असतानाच न्यायालयाने त्यांना धक्का दिला आहे शुक्ला या तशा धडाडीच्या व कठोर अधिकारी म्हणून कधीच प्रसिद्धी नव्हत्या परंतु महिला अत्याचारा विरोधात त्यांनी उभारलेली आघाडी असो वा 2008 च्या मुंबईवरील हल्ल्यात केंद्र सरकारच्या समन्वयक अधिकारी म्हणूनच त्यांची कामगिरी चर्चेत राहिली
दक्षिण विभाग सांस्कृतिक केंद्राच्या संचालक राहिलेल्या शुक्ला या मूळच्या उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज मध्ये पूर्वीचे अलाहाबाद पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाऱ्या शुक्ला 24 व्या वर्षी आयपीएस अधिकारी बनल्या अधीक्षक तसेच उपायुक्त असा बराचसा कालावधी त्यांनी नागपुरात घालवला आहे राष्ट्रपती पदक तसेच महासंचालकाच्या विशेष चिन्हाच्या मानकरी ठरलेल्या शुक्ला या देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर खरे तर प्रकाश झोतात आल्या मीरा बोरवणकर यांच्यानंतर रेशमी शुक्ला पुण्याच्या दुसऱ्या महिला पोलीस आयुक्त ठरल्या
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा तसेच महाराष्ट्र विघातक कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये त्यांनी पुणे पोलीस आयुक्त असताना सर्वाधिक प्रकरणे नोंदवली तिथून त्यांची बदली राज्याच्या गुप्तचर आयुक्त म्हणून झाली राज्यात महाविकास आघाडी सरकार आले आणि त्यांच्या मागे शुक्ल कष्ट सुरू झाले तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या आदेशानुसार शुक्ला यांची कार्यपद्धती असल्याचे लपून राहिलेले नाही त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने राज्य गुप्तचर आयुक्त पदावरून उचल बांगडी केल्यानंतर त्यांनी केंद्रीय प्रतिनियुक्तीवर जाणे पसंत केले आजही त्यांच्यावर फोन टॅपिंग प्रकरणी मुंबई दोन तर पुण्यात एक गुन्हा दाखल आहे
पत्रकार सागर बबिता ईश्वर कांबळे
0 टिप्पण्या