नागसेन कांबळे या घुसखोराला एड.बाळासाहेब आंबेडकरांनी हटकले म्हणून काही लोक रडारड करत आहेत. मुंबईत चैत्यभूमीवर राबणाऱ्या कार्यकर्त्यांना नागसेन कांबळे हे काय प्रकरण आहे ते चांगलं माहीत आहे. महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती नावाची बोगस समिती स्थापन करून या व्यक्तीने बरेच दिवस लोकांना भ्रमात ठेवले. हि समिती नक्की काय करायची माहीत नाही पण शिवाजी पार्कवरच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांना वाचवण्याचं काम मात्र हि समिती करायची. वर्षानुवर्षे चैत्यभूमीवर सेवा, सुविधांचा बोजवारा उडालेला असताना या व्यक्तीने कधीही समन्वय समितीच्या बैठकीत त्याविरोधात आवाज उठवला नाही.
कदाचित अधिकाऱ्यांना देखील स्वतःची कातडी वाचवण्यासाठी ही व्यक्ती हवी होती. मागील अनेक वर्ष महापरिनिर्वाण दिनीं मुख्यमंत्री किंवा ईतर कोणी व्हीआयपी बाबासाहेबांना वंदन करायला यायचे तेव्हा तेव्हा हा व्यक्ती मधे घुसून थेट त्या व्हीआयपीच्या बाजूला उभा राहून, बसून वंदना घ्यायला सुरवात करत असे. त्या व्हीआयपीना सुद्धा हि व्यक्ती कोण हे माहीत नसल्यामुळे अनेकदा या व्यक्तीने दिलेल्या सूचनेप्रमाणे या सेलिब्रिटी आणि नेते मंडळी वंदन करत.असत. हि व्यक्ती शरीराने आडदांड असल्यामुळे अशी घुसखोरी करणे त्याला जमत आले. एकदा बुद्धवंदना सुरु झाली कि लोकांना थांबवणे, बाहेर काढणे नसे आणि या दिवसाचं औचित्य राखण्यासाठी याच्याशी वाद सुद्धा घालता येत नसे. त्याने यावर्षी (२०२२) सुद्धा तोच कित्ता गिरवण्याचा प्रयत्न केला पण यावेळेस बाळासाहेबांनी त्याला रोखलं. कदाचित बाळासाहेबांनी सुद्धा गेले काही वर्ष या व्यक्तीला मार्क केलं असावं. त्यामुळेच नागसेन कांबळेने भंतेंना बाजूला करून स्वतः वंदना सुरु करण्याआधीच त्याला मागे केलं.
२०१६ मुंबईतल्या काही कार्यकर्त्यांनी या व्यक्तीला स्मारकात जाण्यापासून रोखले होते. मुंबईत परेल - नायगाव भागात एक जुने बुद्ध विहार होते. मुंबईच्या मानाने विस्तीर्ण अश्या जागेवर हे बुध्दविहार वसलेले होते.आज ते बुद्धविहार काहीशे फुटांच्या जागेत गुंडाळले गेले असून बाकीच्या जागेवर housings सोसायटी झाली आहे. या सोसायटीत कोण कोण राहत हे समजलं तर कदाचित मुंबईकरांना बुद्धविहार आक्रसण्याचे कारण समजेल आणि त्याच्याशी नागसेन कांबळेच्या काय संबंध आहे ते सुद्धा समजेल. असे अनेक स्वंघोषित नेते समाजात आहेत. समाज गप्प बसून सहन करतो म्हणून ते मोठे होतात.
या घटनेचा पूर्ण व्हिडियो उपलब्ध आहे. तो पाहिला कि या व्यक्तीच घुसखोरी करण्याचं कौशल्य लक्षात येत. व्हीडीओ पाहण्याकरिता https://m.facebook.com/story.php?story_fbid=5494643383997948&id=100003570225921&mibextid=Nif5oz
0 टिप्पण्या