शहरात बेकायदेशीरपणे होर्डिंग्ज लावून शहर विद्रुप करणाऱ्यांवर ठाणे महापालिकेच्यावतीने होर्डिंग्ज हटविण्याची कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले आहे. त्यानुसार ठाणे महापालिका भवन समोरील कचराळी तलाव सर्कल येथे बेकायदेशीरपणे लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर महापालिकेच्यावतीने कारवाई करण्यात आली. सदर होर्डिंग्जमुळे सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. यामुळे ठामपाच्या वतीने हे होर्डिंग्ज तात्काळ हटविण्यात आले. सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाचे उपायुक्त जी.जी. गोदेपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली (सहाय्यक आयुक्त सनियंत्रण व समन्वय) महेश आहेर यांनी अतिक्रमण विभागाच्या कर्मचा-यांसमवेत केली. यापुढेही महापालिकेच्यावतीने अनधिकृत होर्डिंग्जवरील कारवाई सुरूच राहणार असल्याचे आयुक्तांनी यावेळी नमूद केले. याबाबत महेश आहेर (सहाय्यक आयुक्त सनियंत्रण व समन्वय) यांनी स्वत: अज्ञातांविरुद्ध नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली आहे.
0 टिप्पण्या