डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) हे मागील 2018 पासून भीमाकोरेगाव,विजयस्तंभ,जयस्तंभ बाबत काय करत आहे.? जनतेला पुराव्यासह 7/12 सह सांगत का नाही.?
भीमा-कोरेगाव,मौजा पेरणे,तहसील हवेली,जिल्हा पुणे, येथील तलाठी स्वप्नील सुरेश पटांगे,मंडळ अधिकारी किशोर रघुनाथ शिंगोटे,तहसीलदार हवेली, SDM हवेली, जिल्हाधिकारी पुणे,व विभागीय आयुक्त पुणे,यांचावर त्यांनी जाणीवपुर्वकआपल्या कर्तव्यात कसुर केल्यामुळे,अँट्रासिटीचा कलमा अंतर्गत फौजदारी गुन्हे मी दाखल करनारच. तमाम आंबेडकरी जनतेने सुध्दा,फौजदारी गुन्हे दाखल करावे.
भीमा-कोरेगाव मौजा पेरणे येथील स.न.1033 मध्ये,भोगवटदार म्हणून विजय स्तंभ,किंवा जयस्तंभ अशी नोंद न करता,जानुनबुजुन "जयस्तंभाकडे"अशी नोंद केलीच कशी.? त्यांनी जयस्तंभ अशी नोंद न करता, कडे असे का लिहिले. त्यांना काय 7/12 वर रस्ता दाखवायचे होते काय.? कडे या शब्दाचा अर्थ काय.?
खरी बदमासकी तलाठी व महसूल अधिकारी यानीच 7/12 मध्ये केली आहे,आणि भांडण लावन्याचे काम केले आहे.म्हणून अशा बदमाश तलाठी सह अनेक महसूल अधिकारी यांच्यावरच फौजदारी गुन्हे दाखल करावे,
ज्याअर्थी भारतातील,महाराष्ट्रातील, कुठल्याही 7/12 मध्ये भोगवटदार म्हणून एक तर जमीन मालकाचे नाव असते.किंवा महसूल सरकार,तलाव,झुडपी जंगल,नझुल सरकार,किंवा एखाद्या संस्थेचे नाव असते.विजयस्तंभ,
जयस्तंभ,अशाप्रकारे नाव,आदेशानुसार लिहता येते.
मात्र जयस्तंभाकडे असे मोगम नाव 7/12 वर तलाठ्याने कसे लिहीले.? याचा अर्थ काय होतो.?
7/12 वर,मालक न दाखवता, दिशा दाखवत आहे काय.?
*मा.जिल्हाधिकारी पुणे,कु.का.शाखा यांनी जावक क्रमांक पी.टी.आय./कावी/2207/2016 दिनांक 18/6/2016 रोजी,जयस्तंभाकडे अशा नावानी आदेश केले काय.?
*मा.उपविभागीय अधिकारी हवेली यांनी,क्रमांक/आर.टी.एस./रीव्ही/02/2016 आदेश दिनांक 05/06/2017 मध्ये जयस्तंभाकडे अशा नावाने आदेश केले आहे काय.?
* मग तलाठ्याने व मंडळ अधिका-याने चुकीची नोंद.जयस्तंभाकडे अशी का घेतली.?
*महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे,व सुस्थितीत ठेवणे ) नियम 1971 यातील नियम 3,5,6,आणि 7,तसेच नियम 29 नुसार,त्या जागेवर असलेले विजय स्तंभ,किंवा जयस्तंभ,म्हणून नोंद का घेतली नाही.?
*जर त्याच जमीनीवर तलाठी यांनी 2022 च्या पेरेपत्रकात बाजरी 0.30 आर,मका 3.00 हे.आर.व पपई 0.30 आर ,विहीर, अशी 3.86 हे.आर.पैकी 3.60 आर जागेवर पीके दाखवली आहे.उर्वरित 0.26 आर जागा पडीत दाखवली आहे.
तर त्या जागेवर असलेला विजयस्तंभ,जयस्तंभ या बदमाश तलाठ्याला दिसला नाही काय.?
असे बोगस नोंदी तलाठी घेत असेल तर न्यायालयातुन न्याय कसा भेटेल.?
*डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांना हे दिसत नाही काय.?
त्यांनी हा विषय समाजापुढे 2018 पासून का ठेवले नाही.असा प्रश्न निर्माण होत आहे.
आंबेडकरी अनुयायी चुपचाप कशी आहेत.?
जे मला पुणे ते चंद्रपूर 1000 कि.मी.अंतर असुन 7/12 वर दिसते.तर पुणे व ईतर महाराष्ट्रातील जनतेला का दिसत नाही.असा प्रश्न निर्माण होतो.
या पुर्वी नागपूर शहरातील,अंबाझरी येथील 20 एकरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक *खालील आरोपी यांनी पाडल्यामुळे त्यांचावरही फौजदारी गुन्हे दाखल करन्यासाठी वरोरा पोलीस ठाण्यात व सहाय्यक पोलिस अधीक्षक वरोरा यांना आरोपींचा नावासह रिपोर्ट दिली आहे.
त्यामध्ये नागपूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी,रवींद्र ठाकरे,आयुक्त अनुपकुमार,तलाठी उज्वल पत्रुजी भोयर,मंडळ अधिकारी राजेश आंनदराव देठे,SDM नागपूर,तहसीलदार नागपूर,आयुक्त *महानगरपालिका नागपूर,पर्यटन मंत्री महाराष्ट्र,सह गरुड कंपनी ली. विरुद्ध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक अंबाझरी येथील बुलडोझर *लावून पाळल्यामुळे,व्यथित होऊन आज तलाठी विनोद खोब्रागडे यांनी त्यांचावर अँट्रासिटी कायद्याचा कलम 3(1) च,छ,क,ख,घ,ठ,ड, अंतर्गत व भादवी कलम 120ब, 420, 465, 468,
470, 471, 505 अ,ब, 153 ब,क, 298, 505(2), नुसार फौजदारी गुन्हे दाखल करन्याठी पुराव्यासह, सि.आर.पी.सी.कलम 154(3) नुसार IPS अधिकारी यांना रिपोर्ट दिली आहे.पोच पावती दिली आहे.
टिप:-भीमाकोरेगाव ईतिहास साक्षी आहे,स्वाभिमानी लोकच ईतिहास घडविले आहे.आणि घडवित आहे.
बाकीचे फक्त फोकनाळ भाषणे,देऊन अनुयायी यांना गुमराह करत आहेत,समाजाने सावध राहावे.
आणि डोळ्यानी नाही तर डोक्याने विचार करावे धन्यवाद.
जनहीतार्थ जारी.
फिर्यादी कायद्याचा अभ्यासक,संविधान सैनिक,
जबाबदार व जागृत नागरिक,तलाठी
विनोद खोब्रागडे वरोरा-चंद्रपूर
मो.9850382426
-----------------------------------------
१ जानेवारीचा दिवस. आंबेडकरवाद मेंदूत मुरलेल्या माणसांना १ जानेवारी म्हणजे काय , हे सांगावे लागत नाही. शेतकऱ्यांच्या बेंबीत दारूगोळा ठासून त्यांच्या चिंधड्या चिंधड्या करणाऱ्या निर्दयी पेशवाईचा निःपात ज्या दिवशी झाला तो १ जानेवरी ! ब्राह्मणांसारखे धोतर नेसले म्हणून सोनारांचे कुल्ले कापणाऱ्या जुलमी पेशवाईच्या नरडीचा घोट घेणाऱ्या शूर वीर सैनिकांना मानवंदना देण्याचा दिवस म्हणजे १ जानेवारी !
कायस्थांवर ग्रामण्ये भरवून त्यांना माणसांतून उठवण्याचे षडयंत्र करणाऱ्या कपटी पेशवाईला चूड लावल्याचा दिवस म्हणजे १ जानेवारी ! मातंगांची मुंडकी छाटून गुलटेकडीवर त्यांच्या निर्जीव मस्तकांचा अवमान करणाऱ्या मस्तवाल पेशवाईचा शेवट म्हणजे १ जानेवारी ! नग्न स्त्रियांची शर्यत लावण्याची महाजंगली प्रवृत्ती ज्या बाईलवेड्या पाजी बाजीरावाने जोपासली त्याला ढुंगणाला पाय लावून रणांगणातून पळायला लावणारा दिवस म्हणजे १ जानेवारी !
अशा तऱ्हेने शेतकरी , सोनार , कायस्थ , मातंग , सर्व बहुजन समाज व ब्राह्मण स्त्रियांसह समस्त महाराष्ट्राला ब्रह्मराक्षसी पेशवाई अन्यायअत्याचारांतून मुक्त केल्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी १ जानेवारी रोजी लाखोंच्या संख्येने जनता भीमा कोरेगाव येथे जमा होते. कालही झाली होती. परंतु या एवढ्या मोठ्या प्रसंगाची बातमी कोणी कोणी छापली ? कोणी कोणी दाखवली ? यांकडे आपले लक्ष आहे का ?
ज्या वृत्तपत्रांनी कालच्या भीमा कोरेगाव विजय दिनाची बातमी आज छापली नाही ती वृत्तपत्रे पेशवाईची समर्थक आहेत, ती आम्हाला शत्रू समजतात. अशा मनुवादी वृत्तपत्रांची जाहीर होळी करा ! ज्या न्यूज चॅनेल्सनी कालच्या भीमा कोरेगाव विजय दिनाची बातमी सांगितली नाही त्यांचा निषेध करा ! त्यांची वर्गणी भरू नका !!
- जे पेशवाईचे विरोधक आहेत ते आमचे मित्र !
- म्हणून आपणांस शत्रू समजणाऱ्या पेशवाई समर्थक दैनिकांना विकत घेऊन वाचू नका !
- आपणांस शत्रू समजणारी न्यूज चॅनेल्स बघू नका !
- ब्राह्मण्यवादी वृत्तपत्रांवर बहिष्कार टाका !!!
- ब्राह्मण्यवादी न्यूज चॅनेल्सवर बहिष्कार टाका !!
- Boycott Brahminical Media !!!!
0 टिप्पण्या