एससी एसटी समाजातील उद्योजक निर्माण व्हावे या पंतप्रधान योजनेची पूर्णतः अंमलबजावणी करण्यासाठी झटणारे -महेंद्र मालवीय
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑक्टोंबर २०१६ राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब सुरू केला. विशिष्ट प्रवर्गासाठी सुरू केलेल्या हब च्या माध्यमातून आणि नव संकल्पना राबविण्याचा प्रयत्न केला जात असून यामध्ये प्रामुख्याने नवीन उद्योजक, मार्केटिंग, सरकारचे व्यापार विषयक धोरण, बँकांबरोबरचे व्यवहार इत्यादी बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष पुरवले जाते. राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती हब चे मुंबई शाखेचे प्रमुख अधिकारी महेंद्र मालवीय यांनी आत्तापर्यंत विविध ठिकाणी विविध सेमिनार आयोजित करून शासनाच्या योजनेचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत फायदा पोहोचावा असा त्यांचा कल असतो. याकरिता त्यांच्या विविध माध्यमातून प्रयत्न सुरू असतो, हा त्यांचा उत्साह वाखण्याजोगा आहे.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार क्षमता बांधणी आणि विकास कौशल्य भागीदारी, ई निविदा, व्यवसायभिमुख आणि व्यवस्थापकीय शिक्षणाकरिता पंधरा व सात दिवस निवासी शिक्षणाची सोय केली जाते. यामध्ये कोणतेही शुल्क प्रशिक्षणार्थी कडून घेतले जात नाही. संपूर्ण भारत देशात या हब ची विविध राज्यात सोळा केंद्र असुन केंद्रीय मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार योजना राबविल्या जात आहे. विक्रेता विकास कार्यक्रमातून देशभरातील विक्रेता व खरेदीदार यांच्यासाठी अनेक सोयी सवलती उपलब्ध करून दिल्या जातात ज्यामध्ये देशभरात कोठेही प्रदर्शनामध्ये व आंतरराष्ट्रीय स्तरावर सहभाग घेता येतो ज्याचा खर्चही हब च्या माध्यमातून दिला जातो.
मुख्यत विशेष विपण सहाय्य योजना उत्पादनाची स्पर्धात्मकता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ वाढविण्यासाठी विशेष सहाय्य. सिंगल पॉइंट नोंदणी योजना अंतर्गत नोंदणीसाठी खास सबसिडी. बँक लोन प्रक्रिया फी प्रतिपूर्ती योजना. बँक हमी शुल्क प्रतिपूर्ती योजना. चाचणी शुल्क. निर्यात प्रोत्साहन परिषदेचे शुल्क प्रतिपूर्ती योजना. क्षमता बांधणी व्यवस्थापन अभ्यासक्रमासाठी प्रतिपूर्ती योजना. B2B पोर्टलची सदस्यता फी ची प्रतिकृती योजना. इत्यादी योजनांचा उद्योजक व नव उद्योजक लाभ मिळू शकतो. गरजूंनी संकेतस्थळwwwscsthub.in ला भेट दिल्यास अधिक माहिती मिळू शकते. असे आवाहन मुंबई विभागीय अधिकारी महेंद्र मालवीय यांनी केले. एससी एसटी राबविल्या जाणाऱ्या उद्योजक व नवउद्योजकांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा असं मनोदयही त्यांनी व्यक्त केला.
0 टिप्पण्या