मला पडलेला आज सर्वात मोठा प्रश्न
थायलंड वरून पहिल्यांदाच भगवान बुद्धांच्या अस्थी भिक्खु संघाच्या बरोबरीने औरंगाबाद येथे उतरवण्यात आल्या आणि परभणीहून त्यांच्या अस्थींची यात्रा चैत्यभूमी मुंबई पर्यंत नियोजित पद्धतीने सुरू झाली
यामध्ये वीचार करण्यासारखे मुद्दे म्हणजेच
बाबासाहेबांनी 1956 ला आपणास तमाम भारतीयाना या पीढ्यान पीढ्या अडकलेल्या दलदलीतुन बाहेर काढले आणि त्यांच्या पश्चात संविधानात सर्वांना समानतेचा हक्क देऊन सर्व भारतीयांचा उद्धार केला ही गोष्ट तमाम भारत वासियानी विसरून कसे चालेल. त्यातले त्यात म्हणजे OBC/ SC / ST इत्यादी सर्वांना माणुस म्हणुन जगण्याचा हक्क मिळवून दिला .
का ?
तर त्याना माहीत होते की या जगाला तारणारा एक आणि एकच मार्ग आहे तो म्हणजे बुद्ध धम्म
महाचक्रवर्ती सम्राट अशोक यांनी सुध्या बुद्ध धम्माचा स्वीकार करून स्तः चा मुलगा महेद्र व मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत बुद्ध धम्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी पाठवले म्हणूनच आज श्रीलंकेमध्ये सुद्धा 99% लोक बुद्धीस्ट आहेत तसेच बुद्ध तत्वज्ञान चिरकाल टिकावे त्यासाठी याच सम्राट अशोकानी सर्व आपल्या अधिपत्याखाली असलेल्या जंबुद्वीपात( आजचे 11 देश मिळुन म्हणजेच जंबुद्वीप) भगवान गौतम बुद्धाच्या अस्थीवर 84 हजार स्तुप (थुब) बांधुन घेतले त्याकाळी सर्व जंबुद्वीपात सम्राट अशोकाला पियदस्सी ही पदवी होती आणी त्याचेच पुरावे /दाखले आपणास इतर लेणी/ शीलालेख/ स्तुप/ विहार/ उत्खननात सापडलेले विवीध मजकुर इत्यादी
म्हणुनच आज जगा मध्ये धर्माच्या बाबतीत वीचार केला तर सर्वात्त पहीला मान हा बौद्ध धम्माला मिळाला आहे आणि बौद्ध धर्म आज जगात सर्वश्रेष्ठ ठरला आहे .आपले प्रधानमंत्री सुद्धा बाहेर देशात गेल्यावर बोलतात की मै बुद्ध की धरती से आया हुँ I बुध ने पुरे विश्व को धम्म दीया !
या संपुर्ण विश्वाला शांततेचा संदेश देऊन जगला धम्म अर्पन करणाऱ्या भगावान बुद्धांच्या अस्थी आज थायलंडहुन भारत देशात मायभुमी येतात म्हणजे ही एक ऐतीहासीक गोष्ट असतांना त्याचा गाजावाजा महाराष्ट्रात नव्हे तर संपुर्ण भारतामध्ये कसा असायला पाहीजे तो दिसुन येत नाही
आज छोट्या छोट्या खेड्यातील वाडी / वस्तीवरचा व्यक्ती आनंदाने अभिमानाने जयभीम/ नमो बुद्धाय म्हणतो आणी लहाण मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वच बुद्ध वंदना घेतात हे सुद्धा तेवढेच खरे आहे . पण या मागचा इतिहास बऱ्याच जणांना माहीत नसेल .फक्त आपल्या समाजाचे जयभीम / नमो बुद्धाय म्हणतात म्हणून आपणही म्हणायचे!
ज्या एका राजाचा मुलगा सिद्धार्थ हा तथागत बुद्ध होतो आणि आपणास जे काही ज्ञानमार्ग देतो त्याच्या सुमारे 2500 हजार वर्षापुर्वीच्या आतापर्यंत जतन करून ठेवलेल्या अस्थी आपल्याला प्रत्यक्ष पाहण्याचा योग येत आहे हे भारतातील खेडेगावात राहणाऱ्या सामान्य लोकांना माहीतही नसेल (त्यांना दींडीच्या तारखा दींडीचे मुक्काम हे न अडखडकता एकदम डीटेल सांगता येतील )
माझ्यामते भारतातल्या प्रत्येक व्यक्तीने हा आलेला योगायोग सोडू नये हीच अपेक्षा
तर यासाठी आपण कोठे कमी पडत आहोत का?
बाबासाहेबांनी सर्वांना शिक्षणाचा अधिकार दिला आपण शिकलोही परंतु त्या शिक्षणाचा उपयोग आपण कशासाठी करत आहेत पोथी पुराण वाचण्यासाठी/ उपवासाच्या तारखा शोधण्यासाठी ?
शिक्षण घेऊन जे कोणी मोठे इंजीनीयर डॉक्टर वकील झाले त्यांनी समाजाकडे पुर्ण पाठ फीरवल्या सारखी दिसते (मोजकेच त्यास अपवाद आहेत )
भगवान बुद्धांच्य अस्थी या भारतात येणार म्हटल्यावर सगळीकडे भुकंप झाल्यासारखी वार्ता पसरायला हवी होती तसे होताना दिसले नाही , कींवा कोणत्याच TVन्यूज चैनेल वाल्याने तसे काही दाखवले नाही ( दाखवणारही नाही कारण तो विकलेला आहे. त्यांना सुशांत सिंग दोन महीणे दाखवता येतो)प्रींट मीडीया पण चुप्पी धरून आहे राहीला सोशल मीडीया तो सुद्धा म्हणावा तसा अॅक्टीव वाटत नाही म्हणून जे काही IT सेक्टर मध्ये काम करणारे माझे बांधव कींवा IT सेक्टरचे ज्यांच्याकडे ज्ञान आहे त्या सर्वांनी अशा इतर गोष्टी करणे अपेक्षीत होते / आहे उदा :
1)अस्थी करंडक भारतात येण्यापुर्वी त्याचे शॉर्ट व्हीडीओ बनवणे आणि ते प्रसारीत करणे
2) अस्थी कडंडकाचे रथाचे रसत्याचे व्यवस्थीत मॅप - तयार करून त्यांचे नियोजीत थांबे नकाशात दाखवणे
3) शक्य झाल्यास एखादी लींक बनवून त्याचे Live लोकेशन कोठे आहे हे पाहता येणे
4) कोणत्या शहरात रस्त्यावर कीती गर्दी असेल त्याचा आढावा घेऊन त्याला मॅप मध्ये समाविष्ठ करणे आणि सोशल मीडीयावर टाकणे
5) सर्वांनी अस्थी करडकाचे दर्शन का घ्यावे त्याचे काही महत्व आहे का? असे मुद्दे थोडक्यात दाखवणे
असो - -..-..
आजच्या शिकल्या सवरल्या IT सेक्टर वाल्यांनी हे छोटेसे काम जर केले असते तर आज याच रस्त्यावर कमीत कमी 3 X गर्दी पाहण्यास मीळाली असती आणी या ऐतीहासीक अस्थीरथाचे सर्वांना दर्शन झाले असते आणि हेच खरे भगवान बुद्धाना सर्वांत मोठे त्रीवार वंदन असेल
पुर्ण लेख वाचला असेल तर प्रतीक्रीया आवश्यक आहे
बुद्धं नमामी
धम्मं नमामी
संघ नमामी
---- --- मधुकर घोडेराव
0 टिप्पण्या