Top Post Ad

कोरोना पेक्षा भयंकर स्थितींत जगताहेत कोविड योद्धे

 


कोरोनाची लाट ओसरताच या कोरोना योद्धांना सरकार, आरोग्य विभाग आणि हे ज्या - ज्या ठिकाणी सेवा देण्याचे काम करीत होते. त्या त्या ठिकाणावरुन त्या सर्वांना खड्यासारखे बाहेर काढले. हे कोरोना योद्धे आज बेरोजगारीत हलाखीचे जीवन जगत आहेत. महाराष्ट्र सरकारने गरज सरो वैद्य मरो याप्रमाणे त्यांना वाऱ्यावर सोडले असून आज ते कोरोना पेक्षा भयंकर स्थितींत जगत असल्याचा आरोप म्युनिसिपल कामगार एकता युनियनचे शैलेश कांबळे यांनी केला. 

कोरोना काळात आपल्या प्राणाची पर्वा न करता रुग्णसेवा करणाऱ्या कोरोना योद्धांच्या न्याय मागण्यासाठी 2 मार्च रोजी  प्रचंड मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.याबाबत प्रसिद्धी माध्यमांशी आज पत्रकार भवन, मुंबई येथे युनियनच्या वतीने  संवाद साधण्यात आला. यावेळी युनियनचे अध्यक्ष मनोज यादव, सरचिटणीस जगनारायन गुप्ता, उपाध्यक्ष शैलैद्र कांबळे, अशोक पवार, अभिजित जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.

सरकारी नोकरीत कोव्हीड योद्धांना सामावून घ्या, कोव्हीड भता अन बोनस द्या, कोव्हीड योद्धांना सैनिकांचा दर्जा द्या. कारण ते एक महा भयंकर युद्धच लढले आहेत. आदी मागण्यासाठी हा मोर्चा जे. जे. रुग्णालय सिग्नल, रिचर्डसन अँड कृडास कंपनी येथून स. 11 वाजता निघून आझाद मैदान या ठिकाणी पोहचणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात साऱ्या शासकीय व प्रशासकीय, आरोग्य यंत्रणा धडाधड ढासळत होत्या. रुग्णालयामधील व्यवस्था तर अतिशय गंभीर होती. अतिशय प्रशिक्षित स्टाफ ही गोंधळलेल्या अवस्थेत होता. अशा वेळी रुग्णांच्या मदतीला धावून आला, तो कोरोना काळात ज्यांनी सेवा दिली ते रुग्ण सेवक, त्यांना आपण कोरोना योद्धा म्हणतो. कारण ही महामारी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापेक्षाही भयानक व भयंकर होती. हे आपण सर्वानी पाहिले आहे. रुग्णालयातील कोसळलेल्या साऱ्या व्यवस्थेला संभाळून रुग्णांना सेवा देण्याचे काम याच योद्धांनी केले. म्हणूनच शासनाने यांना कोरोना योद्धा म्हणून संबोधले. मात्र आज त्यांना नोकरीत सामावून घेण्याबाबत शासन टाळाटाळ करीत  असून या योद्धाना बेरोजगाराच्या खायीच लोटले आहे. महापालिकेच्या आरोग्य सेवेत कंत्राटदारामार्फत नियमितपणे भरती केली जात आहे. मात्र यामध्ये कोरोना योद्धांना जाणिवपूर्वक वगळले जात आहे. आज त्यांना कामाचा अनुभव, शिक्षण अथवा अन्य कारणे देऊन डावलले जात आहे. मात्र ज्यावेळेस शासनाला यांची गरज होती. त्यावेळेस या अटी व शर्ती का तपासण्यात आल्या नाहीत असा सवालही यावेळेस करण्यात आला.

३० हजाराहून अधिक कोरोना योद्धे अख्या महाराष्ट्रभर पसरले असून या सर्वांना एकत्र करून त्यांना त्यांचे न्याय हक्क व अधिकार मिळवून देण्याचा निश्चय " म्युनिसिपल कामगार एकता युनियन'ने केला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यांपासून या योद्यांना एकत्र करून त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र भर दौरे केले आहेत. विभागीय व जिल्हा पातळीवर अनेक बैठका, मेळावे, परिषदा घेण्यात आल्या आहेत. मुंबई, नाशिक, पुणे,, अलिबाग, नंदूरबार,, नागपूर, यवतमाळ, सांगली, कोल्हापूर, आदी ठिकाणी या बैठका, मेळावे घेण्यात आले आहेत. यामध्ये कोरोना योद्धांच्या समस्या प्रामुख्याने पुढे आल्या, त्या म्हणजे त्यांना तडका फडकी कामावरून कमी करण्यात आले. त्यांना देण्यात येणारे वेतन योग्य त्या प्रकारे दिले गेले नाही, कोव्हीड भत्ता मिळालेला नाही. तो कंत्राटदार व व्यवस्थापनाने खाल्ला आहे. या काळात या योद्धांना बोनस देण्यात येणार होता. तो ही अद्याप मिळालेला नाही.

दरम्यानच्या काळात राज्यात सतांतर झाल्यानंतर नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारताच या कोव्हीड योद्धांना सरकारी नोकरीत प्राधान्य देऊन कायम करण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीच कृती केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांना   त्यांच्या या लोकप्रिय घोषणेची आठवण करून देण्यासाठी या मोर्चाचे आयोजन म्युनिसिपल कामगार एकता युनियनच्या नेतृत्वाखाली करण्यात आले असून संपूर्ण महाराष्ट्रातून या मोर्चात कोव्हीड योद्धे सामिल होणार आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com