Top Post Ad

आता मुंबई ते सोलापूर.... मुंबई ते शिर्डी होणार जलद प्रवास


 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी आज दि. 10.फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन मुंबई येथून दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. एकनाथ शिंदे,मुख्यमंत्री, महाराष्ट्र; अश्विनी वैष्णव, केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री;  नारायण राणे, माननीय केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री;  रामदास आठवले, माननीय केंद्रीय सामाजिक सक्षमीकरण राज्यमंत्री;  कपिल पाटील, माननीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री;   देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र,  राहुल नार्वेकर, माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा,;   दीपक केसरकर, माननीय मंत्री शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, महाराष्ट्र सरकार;   रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री, महाराष्ट्र सरकार यांच्यासह अनिल कुमार लाहोटी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्ड; श्री नरेश लालवानी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे;  अशोक कुमार मिश्र, महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे आणि मध्य व पश्चिम रेल्वेच्या विभागांचे प्रमुख, इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि निमंत्रित याप्रसंगी उपस्थित होते.. इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

महाराष्ट्रातील विविध शाळांमधील सुमारे 32,000 विद्यार्थ्यांनी वंदेभारत या थीमवर चित्रकला, लेखन आणि भाषण स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धांमधील विजेत्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून वंदेभारत एक्सप्रेस ट्रेनने प्रवास केला.  

मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सोलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल. व्यापारी राजधानी असलेल्या मुंबईला जागतिक दर्जाच्या नवीन ट्रेनने महाराष्ट्रातील कापड आणि हुतात्मा शहराशी जोडले जाईल. यामुळे सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी ही तीर्थक्षेत्रेही जलदगतीने जोडली जातील. वंदे भारत एक्स्प्रेस गाडी जी सोलापूरहून गुरुवार वगळता दररोज  सकाळी 6.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, वंदे भारत ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बुधवार वगळता दररोज सायंकाळी 4.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहोचेल. ती दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथे थांबेल. मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 6 तास 30 मिनिटांत 455 किमी अंतर पर करेल तर सध्याच्या सुपरफास्ट ट्रेनला 7 तास 55 मिनिटे लागतात त्यामुळे प्रवासाचा 1 तास 30 मिनिटांचा वेळ वाचतो. आपल्या वाटेवर ही गाडी एकाच दिवशी भोर घाटावर चढेल आणि उतरेल, म्हणजे लोणावळा-खंडाळा घाट विभागात, ज्याचा सर्वात उंच उतार 37 मीटरवर 1 मीटर आहे.

 मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन ही देशातील १०वी वंदे भारत ट्रेन असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि साईनगर शिर्डी दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल. नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनि शिंगणापूर या महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांशी व्यापारी राजधानी जोडली जाईल. मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मंगळवार वगळता दररोज सकाळी 6.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे सकाळी 11.40 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात साईनगर शिर्डी येथून मंगळवार वगळता दररोज सायंकाळी 5.25 वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 10.50 वाजता पोहोचेल. ती दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल. मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ५ तास २० मिनिटांत ३४३ किमी अंतर कापेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सध्या थेट ट्रेन नाही. आपल्या वाटेवर ही गाडी एकाच दिवशी थुल घाटावर चढेल आणि उतरेल. म्हणजे कसारा-इगतपुरी घाट विभागात, ज्याचा सर्वात उंच उतार 37 मीटरवर 1 मीटर आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com