शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवगर्जना अभियानांतर्गत आज ठाण्यात ठाणे शिवसेना जिल्हा शाखेच्या वतीने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. खासदार राजन विचारे यांनी तलावपाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून बाईक रॅलीचा प्रारंभ केला.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीमुळे संपूर्ण ठाणे शहरात नागरिकांचा शिवसेना पक्षाला मिळणारा पाठिंबा लक्षात घेऊन पक्षाला नवी उभारी मिळाली आहे. आज शिवसैनिकांमध्ये एक नवचैतन्य दिसून आले आहे. आज शिवसेनेची बाईक रॅलीत शिवसेने पक्षाशी गद्दारी करणाऱ्या गद्दारांच्या विरोधात घोषणा दुमदुमल्या आज पुन्हा एकदा ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी“शिवसेनेचे ठाणे… ठाण्याची शिवसेना..” ब्रीदवाक्य खरे करून दाखवले
सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्रातील राजकारणात भाजपाने केंद्रीय यंत्रणांचा वापर करून शिवसेना पक्ष फोडून शांतता पूर्वक सुरू असलेल्या महाराष्ट्र राज्यात सत्तापालट करून देश लोकशाही कडून हुकूमशाहीकडे नेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. शिवसेना पक्ष फोडीनंतर निष्ठावंत शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न मिंधे गटाकडून सुरू आहे.
त्याविरोधात आवाज उठविण्यासाठी शिवगर्जना अभियानाला उद्यापासून गडकरी रंगायतन येथे सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव , खासदार अरविंद सावंत ,माजी आमदार योगेश घोलप , राजाभाऊ वाजे, विभाग संघटक राजुल पटेल , युवा सेनेची सक्रिय कार्यकारी सदस्य शितल देवरुखकर शेठ उपस्थित राहणार आहेत
0 टिप्पण्या