भारतरत्न लता मंगेशकर यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त, मुंबई मराठी पत्रकार संघा तर्फे ‘रागदारी स्वरलतेची’ या आगळ्या संगीत कार्यक्रमाचे आयोजन मुंबईतील पत्रकार भवनात करण्यात आले होते. ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत समीक्षक पं. अमरेंद्र धनेश्वर, संदीप मिश्रा (सारंगी), मुक्ता रास्ते (तबला), जयंत नायडू (तानपुरा) आदी कलाकारांनी यावेळी लतादिदींच्या स्मृतिना उजाळा दिला, लतादिदींच्या अजरामर चित्रपट गीतांमधील रागदारीच्या प्रात्यक्षिकांसह त्यांनी अनेक गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.. अवीट गोडीच्या या गीतांची पार्श्वभूमी, इतिहास आदींबाबतही रंजक माहिती यावेळी देण्यात आली. काही गीते ध्वनीफितीच्या माध्यमातून दिदींच्या आवाजात ऐकविल्याने कार्यक्रमामध्ये अधिक रंग भरला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पद्मजा दिघे यानी केले.
पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अजय वैद्य यांनी सुरुवातीला लतादिदींच्या आठवणी सांगितल्या. लता मंगेशकर याना पद्मविभूषण पुरस्काराने गौरव करण्यात आला तेव्हा मी लता दिदीना म्हटले भारत सरकारने खरं तर तुम्हाला भारतरत्न द्यायला हवा. त्यावर लतादिदी हसत हसत म्हणाल्या तुम्हाला वाटतं ना मला भारतरत्न मिळावा तर तो मला मिळाल्याप्रमाणे आहे. अशा तऱ्हेने दिदी सहज हसत म्हणाल्या ही एक माझ्यासोबत दिदींची मोठी आठवण असल्याचा उल्लेख वैद्य यांनी आवर्जून केला. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वि. वाबळे यांनी लतादिदींबाबत स्तृतिसुमने वाहिली. आणि यापुढेही संघाच्या वतीने लतादिदींवर आधारीत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे सांगितले. यावेळी संघाचे माजी उपाध्यक्ष संजय परब यांच्यासह अनेक आजी-माजी पदाधिकारी तसेच मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या