यशवंतराव चव्हाण सेंटर, पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने १३ वा ‘यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ दिनांक १३ ते १७ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला असल्याची घोषणा फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी केली. यावर्षी महोत्सवासाठी २० देशांतील ३५ चित्रपट दाखविले जाणार असल्याची माहितीही पटेल यांनी दिली. पुणे फिल्म फाऊंडेशन अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल, यशवंतराव चव्हाण सेंटरचे कोषाध्यक्ष हेमंत टकले, चव्हाण सेंटरचे विश्वस्त बीके अग्रवाल, चित्रपट समीक्षक गणेश मतकरी, महेंद्र तेरेदेसाई, चव्हाण सेंटरच्या विश्वस्त अदिती नलावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिप्ती नाखले आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
हा चित्रपट महोत्सव ऑफलाईन पद्धतीने होणार असून यावर्षीचा महोत्सव पाहण्यासाठीची ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया www.yiffonline.com या महोत्सवाच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि चव्हाण सेंटरवर स्पॉट नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्वसामान्य रसिक प्रेक्षकांसाठी सिनेमागृहात सिनेमा पाहण्यासाठी संपूर्ण महोत्सवासाठीचे नोंदणी शुल्क रुपये ३०० असून ज्येष्ठ नागरिक, चित्रपट क्लब सदस्य आणि विद्यार्थी यांच्यासाठी २०० रुपये असणार आहे, अशी माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली. या महोत्सवाची ओपनिंग फिल्म तोरी अँड लोकिता (दिग्दर्शक – जीन-पेरे अँड ल्युक दादेन, बेल्जियम, फ्रांस) ही असणार आहे. या महोत्सवात दरवर्षीप्रमाणे स्मिता पाटील स्मृती व्याख्यानमाला देखील आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये एकूण दोन पडद्यांवर सिनेमांचे प्रदर्शन करण्यात येणार आहे. यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला चित्रपटप्रेमींनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. पटेल यांनी केले आहे.
-----------------------------------------
शांघाय सहकार्य संघटना चित्रपट महोत्सवाची सांगता
एससीओ चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट गोदावरी ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट
शाओझी राओ यांना चीनी चित्रपट होमकमिंगसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार
0 टिप्पण्या