Top Post Ad

कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा। छत्रपती शिवाजीचा ।।



 कुळवाडी भुषण: छत्रपती शिवाजी राजा !
शिवरायांचे आठवावे रूप। शिवरायांचा आठवावा प्रताप । 
शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी ।।

         छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सत्ता गाजविणारे राजे निझाम, आदिलशहा,तुर्की, मुगल आदि हे बाहेरचे होते.या काळात भारतीय लोकांचे दुहेरी शोषण होत होते. म्हणजे,बाहेरील राजांनी लावलेल्या करापेक्षा जे वतनदार - जहागिरदार, भ्रष्ट ब्राह्मण कारभारी होते ते जनतेला राजाचा धाक दाखवून दुप्पट-तिप्पट कर वसूल करायचे. भारतीय मुळ बहुजन समाजाला आपले सामाजिक व धार्मिक गुलाम बनवून त्यांचे आर्थिक शोषण करायचे. नापिकी,दुष्काळामुळे गरीब शेतकरी जेव्हा कर देऊ शकत नव्हते,तेव्हा हे लोक गरीब शेतकऱ्यांना  भयंकर यातना द्यायचे.एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या महिलांना सुध्दा नांगराला जुंपण्याचे प्रकार घडले.त्याही पलीकडे बाहेरील राजांना खुष करण्यासाठी गरीब शेतकऱ्यांच्या महिलांना जबरीने शेतातून उचलून नेऊ लागले.तेव्हा हा अन्याय  पाहून संत तुकाराम  म्हणत,‘ बुडती हे जन,न देखवे डोळा । म्हणून कळवळा येत असे।।’ संत तुकारामांना वाटायचे कोणीतरी यावे आणि आपल्या समाजाचे व देशाचे रक्षण करावे. 

              संत तुकाराम महाराज हे आताच्या सारखे पोटभरू,दिव्य दरबार भरविणारे, बाबा, बुवा, महाराज, बापू, ह.भ.प. सारखे नव्हते (अपवाद वगळून).संत तुकाराम हे शेतकरी कुटूंबातील सावकारी तसेच वाण्याचा व्यवसाय करणारे सज्जन व प्रतिष्ठीत व्यक्ती होते. लोकांचे शोषण व अमानुष लूट थांबविण्यासाठी त्यांनी अभंग रस्त्यावर येऊन लोकांच्या घोळक्यात किर्तनाच्या माध्यमातून  गाऊन लोक जागृती केली. 

       वडील शहाजीराजे व आई जिजाऊ बाल शिवाजीला सोबत घेऊन संत तुकोबांचे किर्तन ऐकण्यास जात. संत तुकाराम आपल्या एका अभंगात म्हणतात,‘‘ भेदाभेद भ्रम अमंगळ।’’ या अभंगातील समानतेचा विचाराने  शिवबाच्या बालमनावर स्वराज्य निर्मितीचा अंकुर फुटला. त्यांनी स्वराज्यासाठी परकीय सत्तेच्या विरोधात बंड पुकारले. बाल शिवाजी ने आपल्या समाज व्यवस्थेचा अभ्यास केला.तेव्हा त्यांच्या लक्षात आले कि जनतेचे शोषण थांबवायचे असेल तर कारभारी बदलणे आवश्यक आहे,त्यासाठी राजा बदलविणे आवश्यक आहे. यावर गंभीर चिंतन करून त्यांनी स्वतंत्र राज्य निर्मितीचा विचार सुरू केला.आणि त्यासाठी त्यांनी मनुस्मृतीवर आघात करून वर्ण व्यवस्थेला हादरा दिला. मनुस्मृतीनुसार शूद्राला स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचा व त्यासाठी शस्त्र हाती घेवून लढण्याचा अधिकार नव्हता.

      भारतीय इतिहासात मनुस्मृती काळानंतर शिवाजी हे पहिले राजे आहेत ज्यांनी  मनुस्मृती लाथाडून आपल्या बहुजन समाजातील हट्टे-कट्टे रामोशी,धनगर,महार, मांग,मेहतर, मुसलमान ईत्यादी. लोकांच्या हातात तलवार दिली.आपले स्वतंत्र लष्कर उभारून त्यांना प्रशिक्षण देऊन सैन्य उभे केले.व जूलुमशाहीच्या विरोधात पहिल्यांदा बंड पुकारले. 

      बाल शिवाजींनी वयाच्या सोळाव्या वर्षी  स्वराज्यासाठी हातात तलवार घेतली. आपल्या तारूण्याचे २८ वर्षे (१६४६ ते १६७४) कठोर संघर्ष केला. म्हैसूर कर्नाटकापासून गुजरातच्या सुरतपर्यंत त्यांनी  स्वतःचे फार मोठे साम्राज्य निर्माण केले.तसेच उत्तेरेकडे दिल्लीच्या मुगल सत्तेला हादरे दिले.दिल्लीचे सुलतान षिवरायांच्या नावाने थरथर कापत होेते.आणि गरीब, शेतकरी, कष्टकरी शांतपणे सन्मानाने जीवन जगत होते.शिवरायांनी कल्याणकारी राज्यव्यवस्था निर्मितीसाठी काही  फर्मान काढणे सुरू केले.तेव्हा शिवरायांविषयीचा रोष व्यक्त करून भट-ब्राह्मण  उर्मटपणे म्हणायला लागले, ‘‘शिवाजी तुम्ही आमचे राजे नाहीत.आम्ही तुमचे आदेश पाळणार नाही.तुम्हाला आमच्या धर्मक्षेत्रात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.तुम्हाला ब्राह्मणांना शिक्षा करण्याचा काहीही अधिकार नाही.कारण तुमचा राज्यभिषेक झालेला नाही.तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले,ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करतो,माझ्या राज्यात सर्वत्र सर्वांना समान न्याय व अधिकार आहेत. अन्याय करणाऱ्या व कायद्याचे पालन न करणाऱ्यांना सुध्दा शिक्षा करण्याचा अधिकार आहे. शिवरायांना वाटले आपला राज्यभिषेक न केल्यामुळे आपले आदेश न मानण्याचा दुस्साहस ब्राह्मण करीत असावे, म्हणून शिवरायांनी आपला राज्यभिषेक करण्याचे ठरविले.

       महाराष्ट्रातील एकही ब्राह्मण शिवरायांचा राज्यभिषेक करण्यास तयार झाला नाही,तेव्हा काशीच्या गागाभट्टाला पाहीजे तेवढी दक्षिणा देऊन जबरदस्तीने शिवरायांनी ६ जून १६७४ रोजी  स्वतःचा राज्यभिषेक करून घेतला.

     शिवाजी महाराजांना  ब्राह्मण  पुन्हा उर्मटपणाने बोलायला लागले.”शिवाजी तुम्ही कितीही शूर असाल, तरी तुम्ही आमचे राजे होऊ शकत नाही.कारण तुम्ही शूद्र,कुणबी आहात. आमच्या वैदिक हिंदू धर्मशास्त्रानुसार क्षत्रिय व ब्राह्मण कुळातील लोकच राजेपदी विराजमान होऊ शकतात. तुम्ही हे मिळविलेले स्वराज्य आम्हाला अर्पण करा.आणि आमची सेवा करा.हे ऐकूण शिवाजी महाराज खवळले आणि म्हणाले,हे राज्य मी तुमच्या सेवेसाठी मिळविलेले नाही,हे ‘रयतेचे राज्य’आहे.माझ्या जनतेच्याअधिकारासाठी, सेवेसाठी मी निर्माण केलेले आहे.

      महाराष्ट्रातील कट्टरपंथी ब्राह्मणांनी विरोध केल्यामुळे शिवाजी महाराज संतापले होते.त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली होती.  जिजामाता आपल्या बहादूर मुलाची भटांकडून चालू असलेली ही घोर उपेक्षा,छळ व अपमान  सहन करू शकल्या नाही. आणि दहा दिवसातच १७ जून १६७४ ला त्यांचा  मृत्यू झाला.

     शिवाजी महाराजांनी प्रतिशोध केला.त्यानंतर ते राजसिंहासनावर बसले नाही.त्यांनी कठोर आत्मचिंतन केले.साडेतीन महिन्यानंतर २४ सप्टेंबर १६७४  रोजी  शाक्तपंथ (अवैदिक) विधी पध्दतीने आपला दुसरा राज्यभिषेक करून घेतला. यावेळी निश्चलपुरी गोसावी यांनी पौराहित्य केले. शाक्तपंथ हा इतर पंथाप्रमाणे कोणत्याही देवाधर्माशी संबंधित नसून तो सामाजिक समता आणि एकतावादावर, बुध्दाच्या, चार्वाकाच्या विचारसरणीवर प्राचीन काळापासून चालत आलेला पंथ आहे.आपल्या राजसिंहासनाची पुजा त्यांनी आपल्या सेनेतील मुस्लीम सैनिकांच्या हाताने केली. तेव्हा त्यांनी आपल्या शूद्र, अतिशूद्र, लोकांना संदेश दिला कि, तुम्ही आजपासून राजकीय गुलामगिरीतून मुक्त व्हा, स्वतंत्र राज्यकारभार करणे शिका.त्या दिवसाची आठवण ठेवण्यासाठीच महात्मा फुलेंनी दोनशे वर्षांनंतर त्याच दिवशी म्हणजे २४ सप्टेंबर १८७३ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली.आणि भारतीय मुळ शूद्र,अतिशूद्र समाजाला सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्याचे आवाहन केले.

    राजांनी कधीच शूभ, अशुभ, ज्योतिष, मूहूर्त, पोथ्या, पुराणे,कर्मकांड यावर विश्वास ठेवला नाही.२४ फेब्रूवारी १६७० रोजी रायगडावर सोयराबाई बाळंत झाल्या. त्यांच्या राजाराम नावाच्या मुलाचा जन्म पालथा झाला.शिवाजीराजे रायगडावर आले.त्यांना पाहताच एक भटजी  म्हणाला,‘‘मुलगा पालथा जन्मला आहे, अपशकून आहे ’’असे म्हटल्याबरोेबर शिवराय भटाला म्हणाले,‘‘ज्याअर्थी माझा मुलगा पालथा जन्मला त्याअर्थी तो दिल्लीची पातशाही नक्कीच पालथी घालील.’’हे ऐकून भटजी गार पडला. 

     शिवरायांना स्त्रियांविषयी आदर, समानतेची भावना ठेवण्याचे पाठ जर कुठे मिळाले असतील तर ते आपल्या मातेच्या पाठशाळेतच मिळाले होते. दस्तरखुद्द महाराज मातोश्रींचा सल्ला आणि उपदेश प्रमाण मानत. मातेला माँसाहेब म्हणणारे, सती जाण्यापासून रोखणारे इतिहासात शिवरायांसारखे कोणीही झाले नाही. कल्याणच्या मुसलमान सुभेदाराची तरूण सून आबाजी सोनदेव या ब्राह्मणाने शिवाजी महाराजांना खूष करण्यासाठी उचलून आणली होती.महाराजांनी माफी मागून तिला आईचा दर्जा देऊन सन्मानाने बोळवण करून परत पाठविले.हिरकणीच्या शौर्याचा गौरव म्हणून शिवरायांनी बुरूजाला  हिरकणी नाव दिले.शिवरायांचे स्त्रियांप्रती असलेल्या आदराचे अनेक पुरावे आहेत.

     किती महान व दिलदार राजे होते शिवाजी! .परंतु या महान जगप्रसिध्द राजाला ब्राह्मणांनी राजा म्हणून स्विकारले नाही. शिवाजी राजांची वक्ती वाढल्यामुळे त्यांना उघडपणे विरोध न करता ब्राह्मणांनी त्यांची शिवशाही,मराठाशाही पोखरून काढण्याचा सपाटा लावला. शिवाजी राजांच्या वाडयांना आग लावून अपशकून झाला म्हणून बोंब मारली. धर्माचा अपमान करून जबरीने राज्यभिषेक केल्यामुळे शिवाजींच्या राज्यात असे होत आहे असे लोकांना सांगून जनतेमध्ये असंतोष पसरवला. त्यांना राज्यभिषेक झाल्यावर जास्त दिवस राज्य करू दिले नाही. धूर्त इतिहासकारांनी गुडघ्याच्या बिमारीने शिवाजी राजांचा मृत्यू झाल्याचे लिहून ठेवले.अवघे पन्नास वर्षांचे हट्टे- कट्टे राजे गुडघ्याच्या बिमारीने मरण पावले असे मानने आपला मूर्खपणा आहे. जहर देऊन शिवाजी राजांना मारल्याचे आता सिध्द झाले आहे.

     पुढे १७ व्या शतकानंतर संपूर्ण मराठेशाही,शिवशाहीवर कब्जा करून ब्राह्मणांनी पेशवाई निर्माण केली. त्यांनी शिवाजी महाराजांना इतिहासातून गायब केले.पेशवाईच्या १५० वर्षाच्या काळात शिवाजी महाराजांची जयंती,पुण्यतिथी साजरी केली नाही.शिवाजी महाराजांची समाधी कोठे आहे.याचा सुध्दा पत्ता  लागू दिला नाही.एवढेच काय शिवाजी महाराज व संत तुकाराम यांचे नाव उच्चारण्यावर पेशवाईत बंदी आणल्या गेली.मग हे ‘छत्रपती शिवाजी द ग्रेट’आपल्याला पुन्हा मिळाले कसे?

       महात्मा फुलेंनी १८६९ मध्ये शिवाजी महाराजांना समाधीतून बाहेर काढून इतिहासात पुनर्जिवीत केले.हा इतिहास महाराष्ट्र सरकारने छापला आहे.ग्रँड डफ नावाच्या एक इंग्रज इतिहासकाराने १८२६ साली ‘मराठेकालीन इतिहास’ नावाने एक शोध  प्रबंध इंग्लंडमध्ये प्रसिध्द केला.महात्मा फुलेंनी तो मिळवून त्यावरून संशोधन केले व स्वतः रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधली. समाधी पाण्याने स्वच्छ धुवून काढली.त्यावर फुले टाकून पुजा केली व शिवरायांना पहिली मानवंदना दिली.ही वार्ता ऐकून तेथील भटांनी गडावर येऊन जोडयाच्या लाथेने शिवाजी महाराजांच्या समाधीवरील फुले उधळून दिली.ते दृष्य पाहून महात्मा फुलेंच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ते म्हणाले,‘‘ज्या शिवरायांच्या पुण्याईने या भटांना राज्य मिळाले, यांना केवढी मस्ती! त्याच दिवशी म.फुलेंनी शिवाजी महाराजांची जयंती उत्सव समिती बनविली.आणि तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सुरू झाली. 

        शिवाजी महाराजांविषयी अपार प्रेम व आदर निर्माण व्हायला लागला,तेव्हा म. फुलेंच्या कुळवाडी भूषण रयतेच्या राजाला ‘गो-ब्राह्मण प्रतिपालक’ राजा केले.पुढे त्यांनी शिवाजी महाराजांना ‘हिंदूधर्मरक्षक’ सांगून हिंदू मुस्लीम द्वेष पसरविण्याचे तसेच शिवाजी राजाला मराठयांचा राजा सांगून इतर भारतीय मूळ लोकांशी नाळ तोडण्याचा प्रयत्न केला.आजही संत तुकाराम,छत्रपती शिवराय,महात्मा फुले, सावित्रीआई फुले,कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरील द्वेषापोटी  त्यांचा अपमान वारंवार होतांना दिसत आहे. आपण मात्र नेहमीप्रमाणे  सो कोल्ड,,, समाजाला आजही प्रश्न पडत  नाही  की, शिवाजी महाराज जर हिंदूधर्मरक्षक होते तर हिंदू धर्माचे रक्षण करणाऱ्या राजाचा हिंदूत्ववाद्यांनी राज्यभिषेक का केला नाही.?

      शिवराय स्वतः तसेच त्यांचे मावळे मराठी बोलणारे होते.म्हणून औरंगजेब ‘मराठा द किंग’ असे म्हणायचे.शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य म्हणजे  हिेंदू धर्माचे राज्य नव्हते.तर ते या देशातील हीन,दीन,दुर्बल लोकांच्या अधिकाराचे राज्य होते. शिवाजी महाराज हे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी लढत नव्हते तर,ते या देशातील बहूजन समाजावर होणाऱ्या  अत्याचाराच्या विरोधात लढत होते.आणि हेच  सहन होत नव्हते.म्हणून मोठया कष्टाने, शौर्याने निर्माण केलेली शिवशाही कपटाने नष्ट केली आणि पेशवाई आणली.

आदर्शपूत्र, कुशल संघटक,स्वराज्यरक्षक,- राज्यकारभाराच्या व्यवस्थापनासाठी अष्टप्रधान मंडळ नेमणारा सावध नेता,हिकमती लढवय्या ,दूर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी ,नव्या युगाचा निर्माता, रयतेचा लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी राजांचा १९ फेब्रूवारी १६३० ला शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला आणि ३ एप्रिल १६८० रोजी  हा शिवधर्माचा तेजस्वी तारा निखळला.

  आद्यशिवचरीत्रकार म.जोतीराव फुले आपल्या पवाडयात म्हणतात,

माते पायी ठेवी डोई गर्व नाही काडीचा ।
आशिर्वाद घेई आईचा।।
आलाबला घेई आवडता होता जिजीचा ।
पवाडा गातो शिवाजीचा ।।
कुळवाडी-भूषण पवाडा गातो भोसल्याचा।
छत्रपती शिवाजीचा ।।

  • छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त मानाचा त्रिवार मुजरा!!!
  •  डाॅ.स्मिता निशिकांत मेहेत्रे
  • अध्यक्षा, अखिल भारतीय सावित्री ब्रिगेड नागपूर
  •  मो.नं.9823414865
--------------------------------------------------------------------

छत्रपती शिवाजी महाराज आणि बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले एक गुढ!
शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी...
एकोणीस हजार प्रतींच्या विक्रमी यशानंतर मराठीतील बेस्टसेलर कादंबरी!
लेखक: डॉ. प्रकाश कोयाडे (MBBS)
प्रकाशन: न्यू इरा पब्लिशिंग हाऊस, शनिवार पेठ, पुणे.
प्रकार: मराठी शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी
पाने: ४४०
price 390 rs

एक शिवकालीन रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांचे आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या ‘ग्रॅंडफादर्स क्लॉक’ किंवा ‘8 डे क्लॉक’ या घड्याळीचा याच्याशी काय संबंध?
छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘आठ’ या अंकाचा संबंध!
राजभवनात एका ब्रिटीश अधिकाऱ्याने सव्वाशे वर्षांपूर्वी कोणती मौल्यवान वस्तू भिंतीत लपवून ठेवली आहे?
राजभवनच्या खाली जमिनीत नेमकं कोणतं रहस्य काळाने दडवून ठेवलं आहे?
बहिर्जींनी आठ शिलेदारांच्या हाती सोपविलेली ‘ती चावी’ कुठे आहे?
मंत्रालयाला २०१२ मध्ये लागलेल्या आगीत नेमकी कोणती महत्त्वाची कागदपत्रे जळाली?
छत्रपती शिवाजी महाराजांकडील जगदंबा तलवारीवर तीन वेळेस कोरलेले ‘IHS’ हे इंग्रजी शब्द कोणते रहस्य बाळगून आहेत?
स्वराज्याचा मानबिंदू...बत्तीस मण सुवर्ण सिंहासन ज्यासाठी महाराष्ट्राची अख्खी एक पिढी लढून मेली, ज्याबद्दल किती भ्रम आजवर पसरवण्यात आले आणि सध्या ते सिंहासन कुठे असावं?
एक सायक्याट्रिस्ट डॉक्टर एका न्यायाधीशांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होतो आणि सुरू होतो एक अद्भुत, अनाकलनीय एक ऐतिहासिक प्रवास कलेकलेने वाढत जाणाऱ्या प्रतिपदेच्या चंद्राचा प्रवास!
विजयनगर साम्राज्याकडून स्वराज्याच्या खांद्यावर आलेली एक जबाबदार
भारताच्या भुमीत लपलेल्या, जगातील सर्वात मोठ्या खजिन्याची कहाणी!
महाराष्ट्रातील आजवरचे सर्वात मोठे रहस्य… प्रतिपश्चंद्र !
चौदावे शकत, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’! भरभराटीच्या उंचीवर असतानाच लयास गेलेले ‘विजयनगर साम्राज्य’ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना जोडणारा 'तो' गुप्त दुवा कोणता?
राज्याभिषेकानंतर झालेल्या दक्षिण दिग्विजयामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना हाती कोणती गोष्ट लागली होती? तामीळनाडूमधील चिदंबरम मंदिरातील नटराजाची मुर्ती सातशे वर्षांपासून कोणते रहस्य उजागर होण्याची वाट पाहत आहे?
अशा शेकडो गूढ प्रश्र्नांची उत्तरे म्हणजे प्रतिपश्चंद्र! गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईकांचे आजवर कधीही बाहेर न आलेले रूप, कल्पनाशक्ती आणि अचूक नियोजाचा संगम म्हणजे प्रतिपश्चंद्र !
इतिसातील घटना आणि त्याभोवती गुंफलेली लेखकाची अफाट कल्पनाशक्ती, तितकेच प्रबळ प्रत्येक पात्र, ओघवती भाषा, वेगवान घटनाक्रम, डोके बधीर करून टाकणारे सस्पेन्स, अद्भुत निसर्गवर्णन आणि अचूक आयुष्याचे तत्वज्ञान… एक अद्भुत मिश्रण!
दर्जेदार मराठी लिखाण तेही खुद्द #रायगड सांगतोय.
प्रत्येक मराठी माणसाने वाचलंच पाहिजे.
🚩दोन वर्षांत एकोणीस हजार प्रतींच्या विक्रमी यशानंतर आपल्यासाठी ही नवीन विसावी आवृत्ती.
टीप: मुंबईतील जे. जे. हॉस्पिटलच्या खाली एक भुयार ४ नोव्हेंबर २०२२ रोजी सापडले. या भुयाराचा उल्लेख चार वर्षांपूर्वीच प्रतिपश्चंद्र मध्ये करण्यात आला आहे. अशी अजून बरीच रहस्य बाहेर येणार आहेत.
.........................................................................................................................
कादंबरी मागवण्यासाठी संपर्क किंवा व्हाट्सअप्प करा :
आपलं पूर्ण नाव ,अड्रेस पिंनकोड ,मोबाईल नंबर सेंड करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com