‘मी सुरुंगांवरून चालून पाहिले
ज्वालामुखीवर मी फुलून पाहिले
मी पुनःपुन्हा जहर खाऊन पाहिले
मला नाकारणारे जगणे मी जगून पाहिले
मी जळत्या सूर्याला उराशी कवटाळून पाहिले
मी सुखांना खूपदा दुखवून पाहिले
खूप जखमांनी घरटी बांधली माझ्यावर
खूपदा मी जगण्याशिवाय जगून पाहिले’’
0 टिप्पण्या