Top Post Ad

पर्यावरणीय महासंकटांमुळे, आम्ही आतून कमालीचे अस्वस्थ आहोत!"*

 

 गेली चार दशके कामगारक्षेत्रात, तसेच दोन दशकांपासून 'धर्मराज्य पक्षा'च्या माध्यमातून अग्रस्थानी राहून, पीडित-शोषित, कष्टकरीवर्गासाठी आणि निसर्गरक्षण व "पुढच्या पिढीसमोरील कंपनी-दहशतवादातून (कॉर्पोरेट-टेरिरिझम) उद्भवलेली असुरक्षितता व शोषण आणि पर्यावरणीय महासंकटांमुळे, आम्ही आतून कमालीचे अस्वस्थ आहोत!"  'नवरत्न' पुरस्कार स्विकारताना, राजन राजे यांनी व्यक्त केली खंत...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाणे-लोकसभा खासदार राजन विचारे यांनी, 'आनंद चॅरिटेबल ट्रस्ट' या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून, ठाण्याच्या शिवाजी मैदानात आयोजित केलेल्या "चैत्र नवरात्रौत्सव-२०२३" या कार्यक्रमात २९ मार्च, चैत्र अष्टमीला राजन राजे यांचा इतर मान्यवरांसह, 'नवरत्न' पुरस्कार देऊन सत्कार केला गेला.

 गेली चार दशके कामगारक्षेत्रात, तसेच दोन दशकांपासून 'धर्मराज्य पक्षा'च्या माध्यमातून अग्रस्थानी राहून, पीडित-शोषित, कष्टकरीवर्गासाठी आणि निसर्गरक्षण व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लोकशाहीमार्गाने संघर्ष करणारा 'समाजनेता' अशी राजन राजे यांची ओळख याप्रसंगी करुन देण्यात आली आणि उपस्थितांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला.

 आपल्या सत्काराला उत्तर देताना राजन राजे म्हणाले की, "मासुंदा तलाव, जांभळी-नाका, दगडी शाळा आणि मालतीबाई चिटणीसांचं प्रसूतिगृह... ही त्यावेळच्या ठाण्याची प्रमुख ओळख होती आणि मी स्वतः ६६ वर्षांपूर्वी त्या मालतीबाई चिटणीसांच्या इस्पितळात जन्मलो, बाजुच्याच महापालिकेच्या दगडी शाळेत शिकलो, मासुंदा तलाव हा आमचा बालपणीचा विरंगुळा; तर, जांभळी नाक्याची भेळपुरी व जगन्नाथ सरबतवाल्याचं स्वादिष्ट सरबत ही आमची देवदुर्लभ मेजवानी असायची... त्याच आपल्या ठाणे शहरातील आपल्या प्रेमाच्या ठाणेकरांच्या हातून अशातऱ्हेचा सत्कार स्विकारणं, याचं खचितच फार अप्रूप आहे... म्हणून, खासदार राजनजी राजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद"!

ते पुढे म्हणाले की, "भांडवलशाहीच्या विरोधात व्यवस्था-विद्रोही भूमिका घेताना... शोषण, अन्याय-अत्याचार, कॉर्पोरेट-टेरिरिझम हे विषय तर, आमच्या नजरेसमोर होते व आहेतच; पण, त्याहीपेक्षा जी पर्यावरणीय महासंकटं या भांडवलशाहीतल्या 'कार्बनकेंद्री' अर्थव्यवस्थेतून व जीवनशैलीतून उभी ठाकलीयत... त्यामुळेच, प्रामुख्याने आम्ही भांडवलशाहीशी कडवा संघर्ष करत आलोत, करत आहोत. प्रश्न, केवळ भांडवली-व्यवस्थेद्वारे होणाऱ्या अन्याय-अत्याचार-शोषणाचा असता; तर, आमच्यासारख्यांना आमचं आयुष्य पणाला लावायची तितकीशी गरज भासली नसती... एखादा कार्ल मार्क्स, गांधी, लोहिया, आंबेडकर त्याची सहजी एकहाती काळजी वाहू शकले असते... पण, 'कार्बन-उत्सर्जना'च्या मोठ्या पाऊलखुणा, हा जो भांडवलशाहीचा अंगभूत गुणधर्म आहे; त्यातून, अनाकलनीय वातावरण-बदल होत जाऊन पुढच्या पिढ्यांचा संभाव्य विनाश स्पष्टपणे दिसायला लागल्यामुळेच, आम्ही आतून अस्वस्थ आहोत व त्यामुळेच, भांडवली-व्यवस्थेविरुद्ध शड्डू ठोकून उभे आहोत!"

यावेळी, आपल्या सत्काराला उत्तर देताना राजन राजे पुढे म्हणाले की, "व्यवस्थेतील दहशतवाद-विकृतीला सहन करीत असताना, आम्ही कायम पोलिसांच्या लाठ्या खाल्ल्या, पोलिस-कोठड्या भोगल्या, व्यवस्थेकरवी अवहेलना, उपेक्षा, बडगे तर कायमच सहन केले. त्यामुळे, अशा पुरस्कारांची आम्हाला अजिबात सवय नाही आणि तो आमच्या वैचारिक-बैठकीचा कधिही एक भाग नसल्यानेच, हा 'सांस्कृतिक-बदल' पेलताना चांगलंच गोंधळल्यासारखं झालं. 

मात्र, शिवसेनेला सुरुवातीच्या काळात ठाण्यात उभे करणाऱ्या पहिल्या फळीतले नेते श्री. चिंतामणीजी कारखानीस यांनी फोन केला आणि त्यांचा आग्रहच नव्हे; तर, या पंचाहत्तरीतल्या ज्येष्ठ शिवसेना-नेत्याने एकप्रकारे केलेला प्रेमळ हुकूमच, मला काहीकेल्या मोडवेना आणि म्हणूनच, आज मी इथे पुरस्कार स्विकारण्यासाठी उभा आहे, एवढंच", अशा शब्दात राजन राजे यांनी, आपल्या भावभावना बोलून दाखवल्या.

'अलिबाबाच्या मोहमयी गुहे'त न शिरता, मा. उद्धवजी ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याबद्दल, राजन राजे यांनी, खा. राजन विचारे यांचे तोंडभरुन कौतुक तर केले. "आपण माझ्याविषयी खूप बोललात. लोकं म्हणतात, मी खूप काही चांगलं काम केलेलं आहे वगैरे; पण, ही तरुणपिढी आणि त्यांच्यापुढील 'कंत्राटीकरणा'चा प्रश्न, NEEM, 'अग्निपथा'वरचे अग्निवीर कसले 'भग्नवीर' असलेल्या तरुणांचं अधांतरी आयुष्य, आऊटसोर्सिंगमधलं टोकाचं शोषण वगैरे, समस्यांवर, हाती राजकीय-सत्ता नसल्यानेच, आम्ही फार काही इलाज करु शकलेलो नाही, याची फार मोठी खंत आहे. कारण, कामगार चळवळच आता, 'व्यवस्थे'द्वारे फारच दुबळी केली गेलीय. हे कार्य भविष्यात पूर्ण व्हावं, ही देवीचरणी प्रार्थना", असं अखेरीस आपलं मनोगत राजन राजे यांनी व्यक्त केलं.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com