भारतीय राजकारण हे आजच्या घडीला सरमिसळीच व निती शून्य राजकारण झालेले आहे , कोणतीही विचारधारा ही शुद्ध स्वरूपात राहिलेली नाही , लोकशाहीच्या प्रदीर्घ वाटचाली नंतर त्यात प्रगल्भता येईल व माणसे अधिक सुज्ञ होतील याच्या ही श्यक्यता अंधुक झालेल्या आहेत भारतीयांच्या हातात पूर्ण स्वातंत्र्य द्यायचे का? या प्रश्नावर विस्टन चर्चिल म्हणाले होते
"भारतीय माणसांना स्वातंत्र्य बहाल करणे म्हणजे लहान मुलाच्या हातात भरलेलं पिस्तूल देण्या सारखे अविचारी कृत्य ठरेल ,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महत्प्रयासाने प्रौढ मतदान अधिकार दिला , त्या साठीचे कोणतेच निकष ठेवले नाहीत , तो अशिक्षित असला तरी त्याची सद सद विवेक बुध्दी आणि व्यवहारातून आलेले शहाणपण त्याला जाणकार बनवेल असा विश्वास त्यांना होता
परंतु त्या नंतर थोड्याच दिवसांनी बी बी सी ला दिलेल्या मुलाखतीतून ही बाब स्पष्ट झाली की , ते या सर्व प्रक्रियेवर उदास व निराश झाले होते ,
लोक उमेदवार बघून नाही तर पक्ष बघून मतदान करतात काँग्रेस ने सांगितले बैलावर मतदान टाका तर हे चिन्ह घेऊन गाढव उभे राहिले आहे का ? हे ही ते पाहत नाहीत
आदरणीय ऍड प्रकाश आंबेडकर यांचे व्हिडिओ मी अलीकडे पाहतो , काल परवा एक व्हिडिओ पाहिला , तुम्ही स्टेज वर एखाद्याचा सत्कार करा पण तो करताना हार घालू नका अस ते म्हणाले ही साधी कृती आहे परंतु याचा अर्थ मोठा आहे , एखाद्याला हार घालने म्हणजे , इतर समुहापेक्षा त्याचे मोठेपण बिंबवणे असा होतो. हे विभूती पूजन हा भारतीय माणसांच्या साठी घातक आहे त्याचे ही पेक्षा लोकशाही प्रक्रियेत व्यक्ती चे स्थान संघटना किंवा पक्षाचे दृष्टीने छोटे असते
प्रस्थापित राजकीय पक्षांनी निर्माण केलेली सत्तेची बेटे म्हणजे त्यांच्या नव जहागिरी आहेत आणि अश्या घराणे शाही भारत व प्रत्येक राज्यात प्रस्थापित पक्षांनी उभी केलेली आहेत , सत्ता या पक्षातून त्या पक्षात फिरताना दिसते हे तिचं फिरणं भासमान असच आहे , गाडीचे आस जसे स्थिर असतात व या आसा भौवती चाक फिरत असते परंतु आस नेहमीच स्थिर असतो , तशी प्रस्थापित राजकीय घराणी ही आस "सत्तेच केंद्रक"बनलेली आहेत , हवा बदलेल त्या दिशेने ही केंद्र आपली भूमिका बदलतात व सत्ता त्या प्रमाणे या ना त्या पक्षाची येत असते म्हणजेच या प्रस्थापितांचे धर्म निरपेक्षत्व, समाजवादी , विचारसरणी , पुरोगामित्व , प्रतिगामी पण सारे कांहीं सोई नुसार असते
उदाहरण द्यायचे झाले तर छगन राव भुजबळ शिवसेनेत असताना रिडल्स लढाई वेळी आंबेडकरी चळवळीचे लोक हुतात्मा पुतळ्याजवळ गेले म्हणून या महाशयानी गोमूत्र वापरून शुध्दीकरण केले होते , ते आज आपणास फुले शाहू आंबेडकर वाद सांगतात युती सरकारच्या काळात दलीत विद्यार्थी व सवर्ण विद्यार्थी असा भेद करणारा गणवेश जिल्हा परिषद शाळेत करण्यात आला होता , या प्रश्नांच्या विरोधात विधानसभेच्या हौद्यात उतरून जाहीर निषेध करणारे प्रा लक्ष्मण राव ढोबळे आज भाजपचे गुण गात आहेत आणि भाजपची रणनीती म्हणून नव बौद्धांना एकाकी पाडण्यासाठी एस सी वर्गातील 58जाती ना त्यांचे विरोधात एकत्रित करत आहेत ,
स्वतः पुढे कॉम्रेड उपाधी लावणारे भिसे जात संघटन करून नव बौद्ध समाजाचे विरोधात मातंग समाजाला उभे करू पाहत आहेत , त्यांचा वर्गीय सिद्धांत सोडा , शोषित असलेल्या एका समाजाचे विरोधात दुसरा शोषित उभा करू पाहत आहेत त्यांची लढाई त्या शोषक व्यवस्थेच्या विरोधात नाही ही बाब विशेष लक्षणीय आहे
माजी न्याय मूर्ती बी जी कोळसे पाटील ,हे लढवय्ये नेतृत्व आहे , परंतु त्यांची लढाई ही गैर भाजपा शासन म्हणून प्रस्थापितांचे बाजूनेच वळली गेली आहे , व यात डोळे झाकून प्रस्थापित घराण्याच्या मागे उभे राहण्याची ते ईच्छा प्रगट करतात , हीच बाब उपरा कार लक्ष्मणराव माने साहेब यांचे बाबतीत घडलेली आहे , व ते प्रस्थापित व्यवस्थेची तळी उचलून धरतात , शरद चंद्र जी पवार साहेब यांचे उपकारा खाली ते दबून गेलेले आहेत.आज अस्तित्वात असलेल्या अनेक बाबीत , धोरणात फारसा फरक करता येत नाही ,
खाजगीकरण ,ईव्हीएम, शेतीला कमी वित्त पुरवठा , मुक्त आर्थिक धोरण याचा अंगीकार जसा काँग्रेस ने केला तसांच अंगीकार भाजपचा ही आहे , यातील बहुतेक बाबी काँग्रेस पक्षाने त्यांच्या सरकारच्या काळात आखली आहेत व याच धोरणाचा अधिक चां कळस भाजपने गाठलेला आहे. प्रस्थापित काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असणारे "प्रस्थापित मराठा" नेतृत्व कायम स्वरुपी पुरोगामी व हिंदुत्व विरोधी राहील याची हमी कोणी देऊ शकेल काय? ते बहुजन विरोधी भूमिका घेणार नाहीत हे तरी ठामपणे आपण सांगू शकतो काय?
ना नारायण राणे , ना विखे पाटील , ते मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या रूपाने ही बाब स्पष्ट झालेली आहे तर अगदी "कोरेगाव भीमा "हल्ला प्रकरणी मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे यांचे विरोधात जाहीर स्टेटमेंट देणाऱ्या पवारनी आयोगाच्या पुढे साक्ष देताना ती ऐकीव बाब म्हणून साक्ष दिली , कोणताही पुरावा हा ऐकीव असेल तर तो ग्राह्य नसतो ही बाब ते जाणत नाहीत काय?
पहाटेचा शपथ विधी झाला तेंव्हा "राजकारणात कोणताच पक्ष अस्पृश्य नसतो "अस स्टेटमेंट आजचे विरोधी पक्ष नेते ना अजित पवार यांनी केले होते गैर ब्राम्हणी सत्ता स्थापित करण्यासाठी ते मराठा अस्मितेचे कार्ड खेळून सर्व सामान्य गरीब मराठा युवकास स्वतः कडे आकर्षित करतात परंतु या गरीब मराठा वर्गातील मुलासाठी कोणते दरवाजे त्यांनी मुक्त ठेवले आहेत? भारतीय राज्य घटना धोक्यात आहे व तिला वाचवण्याची जबाबदारी नवबौध्द समाजाची आहे , असही ते भासवतात परंतु ऍड प्रकाश आंबेडकर यांनी एक पाऊल पुढे टाकून महा विकास आघाडी तील घटक पक्ष असलेल्या शिवसेना सोबत आघाडी करून ही वंचित ला सामावून घेण्यास काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा च विरोध आहे ही बाब सुध्दा स्पष्ट झाली आहे
"त्यांना आम्ही गर्ल फ्रेंड म्हणून चालतो , जोडीदार म्हणून नाही" इतक्या स्पष्ट शब्दात आदरणीय ऍड प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्रातील जनतेला सांगितले आंबेडकरी विचार सरणी आधारे वाटचाल करून महाराष्ट्रात सर्वाधिक आंबेडकरी व पुरोगामी मताची टक्के वारी घेणारे ही दुर्लक्षित किंवा उपेक्षित प्रस्थापित मानणार असतील तर एक एकटे फुटकळ किरकोळ बाजारात सहज खरेदी केले जाऊ शकतील , इतकीच वास्तवातील आपली किंमत आहे , इतका सत्तेचा , अर्थ सत्तेचा दर्प पुरोगामी म्हणवणाऱ्या पक्ष नेतृत्वात ठासून भरलेला आहे
माझे संपर्कात अनेक जाती व धर्माचे लोक , चळवळीचे नेते आहेत ,, एस सी मधील एका जातीचे महाराष्ट्रातील नेतृत्व करणाऱ्या नेत्याने मला प्रश्न विचारला , आमच्या सारख्या लहान जाती चे तुमच्या राजकारणात स्थान काय? मी म्हणालो "ना आम्ही सत्ताधिश आहोत ना तुम्ही , आपण सगळेच सत्ता वंचित आहोत , व्यवस्थेचे शोषित आहोत , आपण एकत्रित येऊ ते या पायावर ,,,,,,! "2024ला भाजपा सत्तेत आली तर गावो गावी गोध्रा घडेल याची जाणीव मुस्लिम समाजाला आहे , ते भाजपला मतदान करणार नाहीत हा विश्वास मला आहे"अस विधान काल आंबेडकर यांनी केले पण त्यांनी गैर जिम्मेदार , आणि बेभरवशी असलेल्या काँग्रेस , राष्ट्रवादी ला ही करू नये त्या ऐवजी त्यांनी वंचित बहुजन आघाडी या विकलपाकडे वळावे संसदीय राजकारणात मी ही साधारण 1995पासून आहे , आणि अनेक अनुभव थेट गाठीशी आहेत , त्याचाच आधार व विश्लेषण करून मी ही वंचित बहुजन आघाडी त सक्रिय होण्याचे निश्चित केले आहे ,
उर्वरित आयुष्य याच पक्षासाठी समर्पित असणार आहे , हे मी ठरवलेले आहे , कारण हाच एक मात्र आपले सर्वांसाठी शेवटचा विकल्प (पर्याय ) आहे
- संकलन:- ॲड. विश्वनाथ तायडे
- कल्याण पश्चिम.* मो न 9960178213
- अकलूज तालुका , माळशिरस , जिल्हा सोलापूर ,
~~~~~~~~~~~~~~~~~~
0 टिप्पण्या