डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1923 ला हे पुस्तक लिहिले आज 2023 या वर्षात शंभर वर्ष पूर्ण होत आहेत..
या पुस्तकाचा आधार घेऊन भारताची रिझर्व बँक ऑफ इंडिया स्थापित झाली.... 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' ग्रंथाचा शतक महोत्सव
भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी नागरिकांनी वर्तमान काळात जागून भविष्याचा वेध घ्यायला हवा. आजच्या जगण्याचा प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. सामजिक प्रश्न जवळपास सुटलेले आहेत. बेरोजगारी, महागाई, खासगीकरण या समस्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे खऱ्या अर्थाने जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो सध्या सोडवणे महत्त्वाचे आहे. शंभर वर्षापूर्वी लिहिलेल्या बाबासाहेबांच्या 'प्रॉब्लेम ऑफ रुपी' या ग्रंथातील अक्षरे जरी जुनी झाली असतील मात्र पुस्तकातला सिद्धांत अतिशय ताजा आहे, असे मत अँड. बाळासाहेब आंबेडकर त्यांनी पुस्तकाच्या शतकमहोत्सवी चर्चासत्र कार्यक्रमात ग्रंथाबद्दल आपले मत मांडले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स विद्यापीठामध्ये डॉक्टरेट मिळवताना सादर केलेल्या प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन हा ग्रंथ (प्रबंध) १९२३ साली सादर केला होता. या वर्षी त्याला शंभर वर्षे पूर्ण होण्याच्या घटनेनिमित्त वंचित बहुजन आघाडी पुणे शहराच्या वतीने आयोजित शतकोत्तर चर्चासत्राचे प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड सोल्युशन (रुपयाची समस्या) आंबोधित आर्थिक प्रश्न या विषयी आयोजन नेहरू मेमोरिअल हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. कैलास ठावरे पुणे, प्रा. किसन इंगोले मुंबई या वक्त्यांनीदेखील आपले विचार यावेळी व्यक्त केले.
अर्थव्यवस्थेवर काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचारी, नागरिकांनी फिलॉसॉफिकल असायला हवे, असे डॉ. आंबेडकर म्हणायचे, त्याची जाणीव आज भारतातील अर्थव्यवस्थेची अवस्था पाहून प्रकर्षाने होत आहे अनेक नागरिक बोलतात आम्ही टॅक्सपेअर आहोत, अर्थव्यवस्था बळकट करतो. मला त्यांना सांगणे आहे की, मग सामान्य नागरिक काय करतो. तोही सरकारचा ५% ते १८% पर्यंत खरेदीवर टॅक्स भरतोच की. त्यात नवल काय, जर तुम्हाला टॅक्स नकोय तर मला सत्ता द्या, इन्कम टॅक्स माफ करतो.
महागाईचे मुख्य कारण आपण म्हणजे आपण लोकांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही हेच आहे, भारताची आंतरराष्ट्रीय व्यापार नीतीही चुकीची आहे. भारत मालाची निर्यात करण्यास कमी पडत असून केवळ माल आयात करण्यावर भर देत आहे. या सर्व अर्थविषयक धोरणांवर आपली मते आणि उपाययोजना बाबासाहेबांनी शंभर वर्षांपूर्वी 'प्रॉब्लेम ऑफ रूपी' या ग्रंथात करून ठेवल्या आहेत ज्याचे आज जग अनुकरण करतेय आणि भारत मात्र त्यात अपयशी ठरत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अँड प्रियदर्शिनी तेलंग यांनी केले
---------------------------------
‘प्रॉब्लेम ऑफ रुपी’ हा मूळ इंग्रजी ग्रंथ मराठीत लोकांपर्यंत यावा, अशी अनेकांची इच्छा होती. त्याला प्रचंड मागणी होती. त्या दिशेने बरेचसे कामही झाले होते. परंतु ते शक्य होऊ शकले नाही. बाबासाहेबांचे नवीन खंड प्रकाशित व्हावे, यासाठी लोकांचा रेटा वाढत चालला आहे. प्रकाशन समितीकडे यासंदर्भात अनेक निवेदने रोज पाठवली जात आहेत. सन २००४ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एकही नवीन खंड शासन प्रकाशित करू शकले नाही. तसेच आजवर प्रकाशित एकाही इंग्रजी खंडाचा मराठी अनुवाद करण्यासही शासन अपयशी ठरले. दरम्यान, उच्च न्यायालयानेसुद्धा याची गंभीर दखल घेत शासनाला जाब विचारला आहे,
0 टिप्पण्या