ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या रविवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांना प्रत्येकी ४४ मते मिळाल्याने चिठी टाकण्यात आली त्यात कांबळे यांचे नाव आल्याने त्यांची एक वर्षासाठी निवड झाली. पुढच्या वर्षी हे पद दिलीप शिंदे यांना मिळणार आहे. ठाणे महापालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागुहत झालेल्या या निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून महेश राज दरेकर, रवींद्र मांजरेकर होते.
या निवडणुकीत अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आनंद कांबळे आणि दिलीप शिंदे यांना अनुक्रमे ४४ मते मिळाली. इतर उमेदवार दीपक दळवी यांना ३२, सुरेश साळवे यांना ५ मते मिळाले. कार्याध्यक्ष पदासाठी विकास काटे यांना ६० मते मिळून ते निवडून आले. विरोधक हेमा वाडकर यांना ४३, निलेश मंडलिक २४ मते मिळाली. उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत दीपक शेलार यांना ४२ मते मिळून ते विजयी झाले. अनिल शुक्ला यांना ४१ मते तर नितीन दूधसागर यांना ११ मते मिळाली. सरचिटणीस पदासाठी निलेश पानमंद यांची निवड झाली. त्यांना ६९ मते मिळाली. अतुल मळेकर यांना ५३ मते मिळाली. सह चिटणीस पदासाठी गणेश थोरात यांची निवड झाली. त्यांना ७७ मते मिळाली. सारिका साळुंखे यांना ४६ मते मिळाली. खजिनदार पदी विभव बिरवटकर बिनविरोध निवडून आले. सदस्य पदासाठी झालेल्या निवडणुकीत युनूस खान, प्रफुल्ल गांगुर्डे,अशोक गुप्ता, सचिन देशमाने,अमर राजभर, पंकज रोडेकर तर बिनविरोध म्हणून अनुपमा गुंडे यांची निवड झाली
0 टिप्पण्या