Top Post Ad

शशिकांत वारीसेनतर पुन्हा एकदा पत्रकाराला जीवे मारण्याचा प्रयत्न

 


 फलटण तालुक्यात पत्रकार शशिकांत वारीसे घडविण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला न्याय द्या अन्यथा आत्मदहन करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी पत्रकार संतोष बाळासाहेब बिचुकले यांनी केली. आज मुंबईत मराठी पत्रकार संघात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना ते पुढे म्हणाले,  दि.१०/०१/२०२३ रोजी जाधववाडी, फलटण येथील मोकळ्या प्लॉटमध्ये गौणखनिज असल्याचे निदर्शनास आले. त्याची बातमी आमच्या चैनलला लागली होती. त्याअनुषंगाने फलटणचे तहसिलदार यांनी आम्हाला त्या जागेचा पंचनामा करण्यास दि. १७/०९/२०२३ रोजी पाठविले होते व तेथे सरकारच्या निदर्शनास आले की, सदर गौणखनिजाचा कोणताही रॉयल्टी भरली गेली नव्हती. आम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सरकारच्या निदर्शनास सदर गोष्ट आणून दिली व सरकारचा बुडणारा महसुल सरकारला मिळवुन देण्यास मदत केली. परंतु दि. १७/०९/२०२३ रोजी सदर जागेचा पंचनामा करीत असतांना महसुल खाते व काही लोकांनी आमच्या हत्येचा कट त्याठिकाणी रचला होता व तशी तक्रारही आम्ही दि.१८/०१/२०२३ रोजी सातारा पोलीस अधिक्षक यांना पत्र दिले होते व आमच्या हत्येचा जो कट रचला गेला त्याचा गुन्हा नोंदविण्यात यावा, तसेच पत्र सातान्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब यांनाही आमच्या हत्येचा कट केला जात आहे. आमचा पत्रकार म्हणून गुन्हा नोव करून घेण्यात यावा. अशी मागणीही बिचकूले यांनी केली. 

माझ्यासोबत माझे सहकारी पत्रकार विजय माहे व पत्रकार सागर चव्हाण हेही त्या पंचनाम्याचे वेळेस त्याठिकाणी उपस्थित होते व आमच्या तिघांच्याही हत्येचा कट रचला गेला होता. तक्रारी अर्ज पत्रकार विजय गाडे यांच्या नावे दिला गेला होता. आजपर्यंत पोलीस प्रशासनाने कोणताही तक्रार घेतली नाही अथवा कोणतीही कारवाई केली नसून, उलटपक्षी आमच्यावर दि.०२/०२/२०२३ रोजी खंडणी व अँट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये मा.वि. २२३ ३४८००६ अनुसुचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ (१)(). २(१)(०), ३(२) (v) अन्वये गुन्हा दाखल केला. त्यामध्ये विजय गाडे यांना सि.आर.पी.सी. ४१७ प्रमाणे नोटीस दिली गेली आहे. तर पत्रकार सागर चव्हाण हा स्वतः अनुसूचीत जातीमध्ये असूनही हा गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्याचा अटकपूर्व जामीन दि. ०१/ ०३ / २०२३ रोजी मंजुर करण्यात आला. 

तसेच मला दि. १४/०३/२०२३ रोजी अटकपूर्व जामीन मंजुर करण्यात आला. यामध्ये मा.न्यायालयाने थेट आदेशामध्ये हा उल्लेख केला आहे राजकीय द्वेषापोटी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातील याची कल्पना या पत्रकारांनी पोलीस प्रशासन व राजकीय नेते यांना देण्यात आली होती. सदर एफ.आय.आर. दाखल झाल्यानंतर सातारा जिल्ह्यातील सर्वच महत्वाच्या पेपरमध्ये बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. एकप्रकारे महसुल खाते व काही लोकांनी आमच्या हत्येचा कट जो फसला गेला होता म्हणूनच आमच्यावर हा गुन्हा दाखल केलेला होता. परंतु मी जामीन घेऊन गेल्यानंतरही मला अज्ञात लोकांकडून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तु तालुक्यात पत्रकारीताच कशी करतो, तेच पाहतो, पत्रकार शशिकांत वारीसे यांना जसे अंगावर गाडी घालुन मारण्यात आले. तसेच तुझीही अवस्था केली जाईल.

तरी माझी मा.मुख्यमंत्री व मा. गृहमंत्री यांना विनंती आहे की, आपण आम्ही जी तक्रार दाखल केली गेली आहे ती तात्काळ दाखल करून घेण्यात यावी व ज्या अज्ञात लोकांकडून माझ्याजिवीताला धोका आहे, त्यापासून संरक्षण देण्यात यावे. आणि जर मला यामध्ये न्याय मिळणार नसेल तर मला कोणाच्यातरी गाडीखाली चिरडून मरण्यापेक्षा आत्मदहन करण्याची परवानगी देण्यात यावी, असे बिचूकले यांनी स्पष्ट केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

 READ / SHARE  / FORWARD 
JANATA  NEWS  xPRESS

निरंतर सेवेच्या आर्थिक मदतीकरिता 
for Donation
G pay 8108603260 

संपादक: सुबोध शाक्यरत्न  
M : 8108658970

Email- pr.janata@gmail.com